४५८ शिक्षक – कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने द्या

आमदार विजय सरदेसाईंचे मुख्य सचिवांना पत्र

गांवकारी,दि. ८ (प्रतिनिधी)

डायोसेसन सोसायटी ऑफ एज्युकेशनच्या ४५८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन तातडीने वितरित करण्याची मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी गोव्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

डायोसेसन सोसायटीच्या शाळांमध्ये सेवा बजावत असलेल्या ४५८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांना सरकारकडून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यांचे वेतन प्रलंबित असल्याचे सरदेसाई यांनी पत्रात म्हटले आहे. या विलंबामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

सरदेसाई यांनी ३१ ऑगस्ट रोजी विधानसभेच्या शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यास प्रलंबित वेतन दोन दिवसांत देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, सरदेसाई यांनी ९ सप्टेंबर रोजी मुख्य सचिवांना दिलेल्या पत्रात या आश्वासनानंतरही वेतनाबाबत कार्यवाही झालेली नसल्याचा दावा केला आहे.

या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी नियुक्ती मंजुरीशी संबंधित महत्त्वाचा निर्णय दिला होता. या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

सरकार आणि डायोसेसन सोसायटी व्यवस्थापनामधील वादाचा फटका कर्मचाऱ्यांना बसू नये, अशी भूमिका सरदेसाई यांनी मांडली. “सरकार आणि व्यवस्थापनातील वादामुळे कर्मचाऱ्यांना अनिश्चित काळ वेतनापासून वंचित ठेवता येणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य सचिवांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देऊन ४५८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सर्व प्रलंबित वेतन विनाविलंब वितरित करावे, तसेच प्रलंबित नियुक्ती मंजुरींची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कोणत्याही कर्मचाऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागू नये, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

  • Related Posts

    तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर ध्येयप्राप्तीचा मार्ग सुकर करतो : डॉ. समर्थ बोरकर – इतिहासाचे ज्ञान चुकांची पुनरावृत्ती टाळण्यास उपयुक्त; फोंड्यात २३५ गुणवंत विद्यार्थी व ५२ शिक्षकांचा गौरव

    आधुनिक तंत्रज्ञानामुळे आज घरबसल्या जगाशी संपर्क साधणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानाचा सकारात्मक संकल्पना आणि योग्य दृष्टिकोनातून वापर केल्यास कठीण वाटणारे ध्येयही सहज साध्य करता येते. त्याचबरोबर इतिहासाची जाण आणि ज्ञान असल्यास भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती टाळता येते, असे प्रतिपादन गोमंतकीय साहित्यिक तथा गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. समर्थ बोरकर यांनी केले.

    Goa Fire Emergency Helpline 101 Merged With 112; Public Asked to Dial Single Emergency Number

    Goa’s Fire and Emergency Services have been integrated with ERSS-112, unifying fire, rescue, and other emergency calls under the single number 112. The existing 101 helpline will now reroute to 112, improving monitoring and response efficiency.

    You Missed

    तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर ध्येयप्राप्तीचा मार्ग सुकर करतो : डॉ. समर्थ बोरकर – इतिहासाचे ज्ञान चुकांची पुनरावृत्ती टाळण्यास उपयुक्त; फोंड्यात २३५ गुणवंत विद्यार्थी व ५२ शिक्षकांचा गौरव

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 8, 2026
    • 9 views
    तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर ध्येयप्राप्तीचा मार्ग सुकर करतो : डॉ. समर्थ बोरकर – इतिहासाचे ज्ञान चुकांची पुनरावृत्ती टाळण्यास उपयुक्त; फोंड्यात २३५ गुणवंत विद्यार्थी व ५२ शिक्षकांचा गौरव

    पाळोळे बांधकाम प्रकरणी ३९(ए) अंतर्गत अर्ज

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 8, 2026
    • 16 views
    पाळोळे बांधकाम प्रकरणी ३९(ए) अंतर्गत अर्ज

    08/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 8, 2026
    • 24 views
    08/09/2026 e-paper

    ४५८ शिक्षक – कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने द्या

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 8, 2026
    • 24 views
    ४५८ शिक्षक – कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने द्या

    भ्रष्टाचाराचा वाढता पसारा

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 8, 2026
    • 21 views
    भ्रष्टाचाराचा वाढता पसारा

    Goa Fire Emergency Helpline 101 Merged With 112; Public Asked to Dial Single Emergency Number

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 8, 2026
    • 19 views
    Goa Fire Emergency Helpline 101 Merged With 112; Public Asked to Dial Single Emergency Number