पाळोळे बांधकाम प्रकरणी ३९(ए) अंतर्गत अर्ज

पश्चिम बंगाल सभापतींच्या गोवा भेटीचे रहस्य उघड

गावंकारी, दि. २५ (प्रतिनिधी)

पश्चिम बंगाल विधानसभेचे सभापती रथिंद्र बोस यांच्या आर. बोस हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीतर्फे पाळोळे-काणकोण येथील सर्व्हे क्रमांक १४८/६ मधील ४८८ चौ. मी. जमीन ओलीत क्षेत्रातून सेटलमेंट क्षेत्रात रूपांतरित करण्यासाठी कलम ३९(ए) अंतर्गत अर्ज करण्यात आला आहे. हा अर्ज संतोष सांगेलकर यांच्या नावे सादर करण्यात आला आहे.
रथिंद्र बोस यांनी नुकतीच गोवा भेट देऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे आणि सभापती डॉ. गणेश गावकर यांची भेट घेतली होती. पाळोळे येथील कथित अनधिकृत बांधकामाचा विषय मार्गी लावण्यासाठीच ही भेट असल्याची चर्चा होती. आता ३९(ए) अंतर्गत अर्ज दाखल झाल्याने या चर्चेला पुष्टी मिळाल्याचे बोलले जात आहे.
देवबाग-पाळोळे येथे कंपनीने भातशेतीच्या जमिनीत आवश्यक परवानग्या व रूपांतरण सनद न घेता व्यावसायिक इमारत उभारल्याचा आरोप आहे. तसेच जलसंपदा खात्याच्या सिंचनासाठी संपादित जमिनीवर अतिक्रमण करून नाला तोडल्याचा आरोपही आहे. बांधकामामुळे पावसाळी नाले अडवल्याने शेतांमध्ये पाणी शिरून नुकसान होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
काणकोण पालिकेने बांधकाम पाडण्याचे आदेश दिले असतानाही अद्याप कारवाई झालेली नाही. नगर नियोजन विभागानेही बांधकामास मंजुरी तसेच नियमितीकरणास विरोध दर्शविला आहे. दरम्यान, बांधकाम कायदेशीर करण्यासाठी कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला असून, त्यानुसार काणकोण उपजिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • Related Posts

    चीनचे विनाशकारी ‘वॉटर बॉम्ब’!

    नेपाळमधील महापुरानंतर हिमनदीजन्य तलावांचा धोका चर्चेत; भारतासाठीही सतर्कतेचा इशारा नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, सात जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला…

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    “महात्म्यांचा परस्परविरोध म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती! तुमच्या-आमच्यासारख्या पामरांनी भूलोकावरूनच त्यांच्याकडे पाहावं, आणखी त्यांच्या तेजानं आपला मार्ग शोधून काढावा.” जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनामुळे सरकारसमोर अभूतपूर्व संकट निर्माण झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र…

    You Missed

    तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर ध्येयप्राप्तीचा मार्ग सुकर करतो : डॉ. समर्थ बोरकर – इतिहासाचे ज्ञान चुकांची पुनरावृत्ती टाळण्यास उपयुक्त; फोंड्यात २३५ गुणवंत विद्यार्थी व ५२ शिक्षकांचा गौरव

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 8, 2026
    • 9 views
    तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर ध्येयप्राप्तीचा मार्ग सुकर करतो : डॉ. समर्थ बोरकर – इतिहासाचे ज्ञान चुकांची पुनरावृत्ती टाळण्यास उपयुक्त; फोंड्यात २३५ गुणवंत विद्यार्थी व ५२ शिक्षकांचा गौरव

    पाळोळे बांधकाम प्रकरणी ३९(ए) अंतर्गत अर्ज

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 8, 2026
    • 17 views
    पाळोळे बांधकाम प्रकरणी ३९(ए) अंतर्गत अर्ज

    08/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 8, 2026
    • 25 views
    08/09/2026 e-paper

    ४५८ शिक्षक – कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने द्या

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 8, 2026
    • 24 views
    ४५८ शिक्षक – कर्मचाऱ्यांचे वेतन तातडीने द्या

    भ्रष्टाचाराचा वाढता पसारा

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 8, 2026
    • 21 views
    भ्रष्टाचाराचा वाढता पसारा

    Goa Fire Emergency Helpline 101 Merged With 112; Public Asked to Dial Single Emergency Number

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 8, 2026
    • 19 views
    Goa Fire Emergency Helpline 101 Merged With 112; Public Asked to Dial Single Emergency Number