५०० कोटींचा हिशेब!

रोहन, मायकल निरुत्तर

गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी)

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्येक आमदाराला दरवर्षी १०० कोटी रुपयांचा विकासनिधी दिल्याचे जाहीर केले होते. मग गेल्या पाच वर्षांत कळंगुट मतदारसंघात ५०० कोटी रुपयांची नेमकी कोणती विकासकामे झाली, त्याचा हिशेब द्या, असा थेट सवाल हडफडेचे माजी सरपंच रोशन रेडकर यांनी ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमात उपस्थित केला. या प्रश्नावर पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांना तत्काळ ठोस उत्तर देता आले नाही. अखेर विविध खात्यांकडून विकासकामांची माहिती गोळा करून ती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.

कळंगुट मतदारसंघासाठी आयोजित ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रमाला पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार मायकल लोबो, उपजिल्हाधिकारी, मामलेदार तसेच विविध सरकारी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात नागरिकांच्या समस्या आणि विकासकामांचा आढावा घेतला जात असतानाच रोशन रेडकर यांनी थेट ५०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा मुद्दा उपस्थित केला.

मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक आमदाराला दरवर्षी १०० कोटी रुपये दिल्याचे सांगितले असेल, तर पाच वर्षांत ५०० कोटी रुपयांतून कोणकोणती कामे करण्यात आली, याची सविस्तर यादी जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी रेडकर यांनी केली.

यावर मंत्री रोहन खंवटे यांनी अशा स्वरूपाची उत्तरे या कार्यक्रमात दिली जात नसल्याचे सांगितले. मात्र, रेडकर यांनी त्याला आक्षेप घेतला. अखेर सर्व संबंधित खात्यांकडून विकासकामांची यादी तयार करून ती नंतर पाठविण्यात येईल, असे खंवटे यांनी स्पष्ट केले.

आमदार मायकल लोबो यांनीही रेडकर यांना आपल्या कार्यालयात येण्यास सांगितले. कार्यालयात आल्यास विकासकामांची यादी तयार करून दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. विकासासाठीचा निधी विविध सरकारी खात्यांकडे वर्ग केला जातो आणि त्या खात्यांमार्फत विकासकामे राबविली जातात, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

  • Related Posts

    फातोर्ड्यात वोट चोरी उघड

    आमदार विजय सरदेसाई यांचा आरोप गांवकारी,दि.१७(प्रतिनिधी) फातोर्डा मतदारसंघातील मतदारयादीतून तब्बल साडेचार हजार पात्र मतदारांची नावे वगळण्यात आली असून, मागील दोन निवडणुकांत कुडतरी मतदारसंघात मतदान केलेल्या ५० मतदारांची नावे फातोर्डा मतदारसंघात…

    उपनिरीक्षक सपना गावस यांच्या तपासाला अखेर यश

    बलात्कारप्रकरणी दोषीला जन्मठेप! गांवकारी, दि.१७ (प्रतिनिधी) अवघ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीला पणजी येथील गोवा राज्य बाल न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून दोन लाख…

    You Missed

    Over Two Lakh Women Still Await ₹3,000 Assistance: Vijai Sardesai Slams BJP Government

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 24, 2026
    • 11 views
    Over Two Lakh Women Still Await ₹3,000 Assistance: Vijai Sardesai Slams BJP Government

    ५०० कोटींचा हिशेब!

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 24, 2026
    • 16 views
    ५०० कोटींचा हिशेब!

    23/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 23, 2026
    • 13 views
    23/10/2026 e-paper

    23/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 23, 2026
    • 14 views
    23/10/2026 e-paper

    साडेचार हजार कोटींसाठी सुर्लाचा बळी ?

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 23, 2026
    • 17 views
    साडेचार हजार कोटींसाठी सुर्लाचा बळी ?

    निवाड्याविरोधात फेरविचार याचिका ?

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 23, 2026
    • 24 views
    निवाड्याविरोधात फेरविचार याचिका ?