एडीईआय, ग्रेड- १ शिक्षकांची १११ पदे जाहीर

गोवा लोकसेवा आयोगातर्फे होणार भरती

गांवकारी,दि.१६(प्रतिनिधी)

गोवा लोकसेवा आयोग (जीपीएससी) तर्फे शिक्षण खात्यातील सहाय्यक जिल्हा निरीक्षक (एडीईआय)/ ग्रेड -१ शिक्षकांच्या १११ जागांवर भरती होणार आहे. यापैकी ६० जागा खुल्या प्रवर्गासाठी तर ५१ जागा आरक्षित असणार आहेत. सर्व जागांसाठी आयोगाच्या संकेस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे.
मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध रिक्त पदांची भरती केली जाणार असल्याचे सुतोवाच अलिकडेच केले होते. पावसाळी अधिवेशनातही त्यांनी यासंबंधीचे आश्वासन दिले होते. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अखेर ही पदे जाहीर करण्यात आली.
एकूण जागांपैकी सर्वाधिक ११ जागा इंग्रजी विषयाच्या आहेत. यानंतर गणित विषयाच्या १०, अर्थशास्त्राच्या ९, हिंदी भौतिकशास्त्र, रसायशास्त्राच्या प्रत्येकी ८, भूगोल आणि इतिहासाच्या प्रत्येकी ७, कोकणी, मराठी आणि जीवशास्त्राच्या प्रत्येकी ६, समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि सेक्रेटेरीअल प्रॅक्टिस, बुक किपिंग अँड अकाऊंटिंगच्या प्रत्येकी ५ तर बिझनेस स्टडीजच्या ४ जागांचा समावेश आहे.
सर्व पदांसाठी उमेदवार ५० टक्के किंवा अधिक गुण घेऊन पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही जागांसाठी बीएड, बीएबीएड किंवा बीएससी बीएड उत्तीर्ण असणे ग्राह्य धरले जाणार आहे. अर्जाचे शुल्क ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरल्यावर अर्ज गृहीत धरण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावरील सूचना वाचणे आवश्यक आहे

  • Related Posts

    HC Restrains Further Circulation of Allegedly Defamatory Video Statements Against HOABL

    The Bombay High Court has issued an interim order restraining the further circulation of statements made in a video allegedly defamatory to House of Abhinandan Lodha Private Limited (HOABL). The order was passed during a hearing of an interim application against activist Swapnesh Sherlekar, with the court also granting permission to amend the plaint to include another individual.

    COMMUNAL HARMONY IS GOA’S TRUE STRENGTH: AIRES RODRIGUES

    Social activist and lawyer Aires Rodrigues urged Goans to preserve communal harmony, secularism, and peaceful coexistence, highlighting Goa’s tradition of unity and warning against divisive forces.

    You Missed

    HC Restrains Further Circulation of Allegedly Defamatory Video Statements Against HOABL

    HC Restrains Further Circulation of Allegedly Defamatory Video Statements Against HOABL

    COMMUNAL HARMONY IS GOA’S TRUE STRENGTH: AIRES RODRIGUES

    COMMUNAL HARMONY IS GOA’S TRUE STRENGTH: AIRES RODRIGUES

    09/05/2026 e-paper

    09/05/2026 e-paper

    सामाजिक वास्तवातील भीषणता

    सामाजिक वास्तवातील भीषणता

    महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत चुकीचा अर्थबोध

    महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत चुकीचा अर्थबोध

    सर्वण कोमुनिदादकडून जमिनी विक्रीप्रकरणी स्पष्टीकरण; बेकायदेशीर व्यवहाराचा इन्कार

    सर्वण कोमुनिदादकडून जमिनी विक्रीप्रकरणी स्पष्टीकरण; बेकायदेशीर व्यवहाराचा इन्कार