बदली आदेशांना पोलिसांचा विरोध

बरीच वर्षे एकाच ठिकाणी ‘ठाण’ मांडले!

गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी)

गोवा पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदली आदेश तातडीने अंमलात येत असताना, हवालदार आणि त्याखालील पोलिस शिपाई मात्र या आदेशांकडे दुर्लक्ष करत जुन्याच ठिकाणी कार्यरत राहण्याचा प्रयत्न करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या काही वर्षांत अनेकदा बदली आदेश जारी करण्यात आले, मात्र अनेक पोलिस कर्मचारी नव्या ठिकाणी हजर न राहता जुन्याच ठिकाणी कार्यरत राहिले आहेत. विशेषतः एकाच ठिकाणी अनेक वर्षे कार्यरत असलेल्या काही पोलिस शिपायांनी त्या परिसरात स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे.
बदली आदेशांची अवहेलना
गेल्या पाच महिन्यांत विभागाने तीन वेळा बदली आदेशांच्या अमलबजावणीसंबंधीची स्मरणपत्रे पाठवली असून, वेतन कपातीचा इशारा दिला आहे. मात्र, अनेक कर्मचारी या आदेशांकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
एक हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी कागदपत्रांमध्ये नवीन पद स्वीकारल्याची नोंद दाखवली आहे, परंतु प्रत्यक्षात ते जुन्याच ठिकाणी हजेरी लावत आहेत.
एप्रिल २०२५ मध्ये पोलिस मुख्यालयाने २०२० ते २०२५ दरम्यान बदली करण्यात आलेल्या सर्व अधिकाऱ्यांना त्वरित कार्यमुक्त करण्याचा आदेश जारी केला आहे.
पोलिस विभागात मोठे बदल
नव्याने भरती झालेले आणि प्रशिक्षण पूर्ण केलेले ८५९ पोलिस शिपाई विविध पोलिस ठाण्यांत नियुक्त झाले आहेत.
त्याशिवाय २ निरीक्षक, ३४ उपनिरीक्षक आणि ५६५ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ६० पोलिस कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे, ज्यामुळे व्यवस्थापन सुधारण्यात मोठी मदत होणार आहे.
आगशीच्या शिपायाचा विक्रम
आगशी पोलिस स्थानकावर एक शिपाई गेली १२ वर्षे ह्या पोलिस स्थानकावर ठाण मांडून आहे. आत्तापर्यंत त्याची बदली झालेल्या ठिकाणी न जाता तो एकाच ठिकाणी आहे. वरिष्ठांची खास मर्जी प्राप्त या शिपायाने आपली झालेली बदली रद्द करून आता नव्या बदली आदेशात पुन्हा आपली बदली आगशीतच करून दाखवत आपल्या ताकद दाखवून दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

  • Related Posts

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांचे खरमरीत पत्र गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी) गोवा विधानसभेने मंजूर केलेले नगर नियोजन कायद्याचे कलम ३९ (ए) हे पूर्णपणे बेकायदेशीर असून मनमानी स्वरूपाचे आहे. या कायद्याअंतर्गत…

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    राजकीय शक्तीचे पाठबळ, स्थानिकांची नाराजी गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) वास्को येथे विरोध झाल्यानंतर फॉर्म्युला-४ स्ट्रीट रेस स्पर्धा आता मोपा विमानतळ परिसरात आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने मोपा भूपीडित…

    You Missed

    Justice Ferdino Rebello Sounds Alarm: Goa’s Agricultural Lands at Risk Under Section 39-A

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 6, 2026
    • 8 views
    Justice Ferdino Rebello Sounds Alarm: Goa’s Agricultural Lands at Risk Under Section 39-A

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 6, 2026
    • 15 views
    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 6, 2026
    • 22 views
    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    06/02/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 6, 2026
    • 27 views
    06/02/2026 e-paper

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 5, 2026
    • 28 views
    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 5, 2026
    • 20 views
    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल