‘बहाणे नको, परिणाम दाखवा’

महिला सुरक्षा, बेरोजगारी, ड्रग्स, जमीन रूपांतरणावरून अलका लांबा कडाडल्या

गांवकारी,दि. ७ (प्रतिनिधी)

गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या भाजपच्या ‘डबल इंजिन’ सरकारला आता अपयशाची कारणे आणि बहाणे सांगण्याचा अधिकार उरलेला नाही. गोमंतकीयांना आता केवळ उत्तरे आणि ठोस परिणाम हवेत, अशा शब्दांत अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

पणजीतील काँग्रेस हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना लांबा यांनी महिला सुरक्षा, बेरोजगारी, कथित नोकरी घोटाळा, अमली पदार्थ, संघटित गुन्हेगारी, जमीन रूपांतरण, भ्रष्टाचार, पर्यटन आणि पर्यावरण या मुद्द्यांवर सरकारला दहा प्रश्न विचारले.

“आम्हाला तुमची ‘मन की बात’ नको; आमच्या दहा प्रश्नांची उत्तरे द्या. बहाणे नकोत, परिणाम दाखवा,” असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.

गेल्या चार वर्षांत गोव्यात महिलांविरोधातील गुन्ह्यांची ९२२ प्रकरणे नोंद झाली असून त्यात बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांचाही समावेश असल्याचा दावा लांबा यांनी केला. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा देणाऱ्या भाजप सरकारच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.

नोकरीसाठीच्या कॅश फॉर जॉबचे पुढे काय झाले. पात्र गोमंतकीय तरुणांना नोकरीपासून वंचित ठेवून सरकारी नोकऱ्यांचा बाजार मांडला जात असल्याचा आरोप त्यांना केला.

“आमदार चोरले जातात, पक्षचिन्हे चोरली जातात, ‘व्होट चोरी’ होते आणि इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून पैसा गोळा केला जातो. भाजप लोकशाहीसमोरील मोठा धोका बनला आहे,” असा आरोप लांबा यांनी केला.

गोवा एकेकाळी शांतता, संस्कृती आणि पर्यटनासाठी ओळखला जात होता; मात्र आता राज्यात गुन्हेगारी आणि अमली पदार्थांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. “ड्रग्स पकडल्याच्या बातम्या येतात; पण तस्करांवर पुढे काय कारवाई होते? दोषींना शिक्षा का होत नाही? सरकार नेमके कोणाला संरक्षण देत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “हे सरकार जनतेच्या पैशांचे रक्षण करण्याऐवजी त्याची लूट करीत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
गोव्याची जमीन, पर्यावरण आणि नैसर्गिक वारसा वाचविण्याची वेळ आली असून विकासाच्या नावाखाली गोव्याची ओळख नष्ट होऊ देता कामा नये, असे त्या म्हणाल्या.
“हे जमीन-चोर, वोट-चोर, चंदा-चोर आणि पेपर-चोर सरकार आहे. यांना आता थांबवले नाही, तर गोव्याचा आत्माही लुटला जाईल,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

“गोव्याला गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्याचा संकल्प गोमंतकीयांनी केला पाहिजे. अपयशी ठरलेल्या या डबल इंजिन सरकारला सत्तेतून हद्दपार करण्याची वेळ आली आहे,” असे आवाहन लांबा यांनी केले.

पत्रकार परिषदेला काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप, सरचिटणीस अॅड. शबनम खान तसेच अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अन्य पदाधिकारी उपस्थित होत्या.

  • Related Posts

    Soliye Villagers Unanimously Oppose Proposed Mining Activity in Sattari

    Villagers and members of the local tribal community of Soliye in Honda, Sattari, have unanimously opposed the proposed mining activity by M/s Agrawanshi Pvt. Ltd. in Survey No. 123/1, raising concerns over its potential impact on forests, biodiversity and their traditional livelihoods.

    पुढील २५ वर्षांसाठी लोकसहभागी, उत्तरदायी विधानसभेचा आराखडा तयार करा : ओम बिर्ला

    लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गोवा विधानसभेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात पुढील २५ वर्षांसाठी लोकसहभागी, उत्तरदायी विधानसभेचा आराखडा तयार करण्याचे आवाहन केले, ज्यात राज्याची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, वारसा आणि नैसर्गिक पर्यावरणाचे संवर्धन महत्त्वाचे असेल.

    You Missed

    डंपला हात लावाल तर पस्तावाल

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 7, 2026
    • 18 views
    डंपला हात लावाल तर पस्तावाल

    07/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 7, 2026
    • 19 views
    07/10/2026 e-paper

    ‘बहाणे नको, परिणाम दाखवा’

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 7, 2026
    • 33 views
    ‘बहाणे नको, परिणाम दाखवा’

    हे खरंच शोभतंय का?

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 7, 2026
    • 27 views
    हे खरंच शोभतंय का?

    Soliye Villagers Unanimously Oppose Proposed Mining Activity in Sattari

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 7, 2026
    • 22 views
    Soliye Villagers Unanimously Oppose Proposed Mining Activity in Sattari

    पुढील २५ वर्षांसाठी लोकसहभागी, उत्तरदायी विधानसभेचा आराखडा तयार करा : ओम बिर्ला

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 6, 2026
    • 42 views
    पुढील २५ वर्षांसाठी लोकसहभागी, उत्तरदायी विधानसभेचा आराखडा तयार करा : ओम बिर्ला