‘कॅश फॉर इव्हेंट’, तिकिट घोटाळा

स्पेसबाउंड कंपनीविरोधात सायबर विभागाकडे तक्रार

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी)

राज्यात पेडणे तालुक्यातील धारगळ येथे २८ ते ३० डिसेंबर २०२४ रोजी सनबर्न महोत्सव आयोजित करण्याच्या नावाखाली सरकारची परवानगी नसताना बुक माय शो या संकेतस्थळावरून तिकिट विक्री सुरू केल्याप्रकरणी स्पेसबाऊंड कंपनीविरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी तक्रार मिशन फॉर लोकल, पेडणेचे संस्थापक तथा मगोचे नेते राजन कोरगांवकर यांनी दाखल केली आहे.
सरकारच्या डोळ्यांदेखत घोटाळा
राज्यात सरकारी नोकऱ्यांसाठी तसेच विविध कारणांसाठी लोकांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घालण्याची विविध प्रकरणे उघडकीस येत आहेत. पोलिसांकडून या सर्व प्रकरणांचा तपास सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या प्रकरणी चौकशीची मोकळीक पोलिसांना दिल्याची कबुली दिली आहे. सरकारची परवानगी न मिळवताच सनबर्न आयोजकांनी ऑनलाईन तिकिट विक्री सुरू करण्याचा प्रकार हा देखील सायबर गुन्हाच ठरतो. एक तर आयोजकांना सरकारचा छुपा पाठींबा आहे किंवा आयोजक सरकारला गृहीत धरून हे करत आहे. न्यायालयात परवानगी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करूनही सरकार हा प्रकार कसा काय सहन करून घेत आहे, असा सवाल राजन कोरगांवकर यांनी केला आहे.
न्यायालयाची निरीक्षणे
धारगळचे सामाजिक कार्यकर्ते भारत बागकर यांनी दाखल केलेल्या जनहीत याचिकेत सनबर्न आयोजकांकडून सुरू असलेल्या तिकिट विक्रीला स्थगीती देण्याची मागणी केली होती. यावेळी न्यायालयाने केलेल्या निरीक्षणांत परवाना नसलेल्या आणि आयोजनाची खात्री नसलेल्या एखाद्या कार्यक्रमाच्या तिकिट प्रेक्षकांकडून खरेदी केल्या जात असतील तर त्याला काय म्हणावे,असा प्रश्न उपस्थित केला होता. सनबर्न महोत्सवाचा पूर्वोतिहास पाहील्यास शेवटच्या क्षणी आयोजकांना परवाने दिले जाते. सरकारने तशी हमी आयोजकांना दिलेली असायला हवी. मग परवाना दिला नाही,अशी भूमीका घेणे हे सरकारकडून न्यायालयाची दिशाभूल ठरत नाही का,असाही सवाल कोरगांवकर यांनी उपस्थित केला.

पेडणेत आज महत्वाची बैठक
पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर यांनी सनबर्न महोत्सवावरून निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पेडणे मतदारसंघातील सर्व सरपंच, उपसरपंच, पंचायत मंडळ, नगराध्यक्ष, नगरसेवक, पालिका मंडळ, भाजप मोर्चाचे पदाधिकारी तथा बुथ समिती पदाधिकारी यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सनबर्न महोत्सवाच्या धारगळ येथील नियोजित आयोजनाबाबत चर्चा करून भूमीका जाहीर केली जाणार असल्याची खबर आहे.
पेडणे भाजपात दुफळी
सनबर्न आयोजकांनी धारगळ पंचायतीकडे परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या एका गटाला हा महोत्सव धारगळीत हवा आहे तर उर्वरीतांना हा महोत्सव नको आहे. पेडणे भाजप मंडळाचे अध्यक्ष तथा चांदेल- हंसापूरचे सरपंच तुळशीदास गांवस यांनी सनबर्नबाबत आपली अधिकृत भूमीका जाहीर केलेली नाही. अलिकडे त्यांचे आणि आमदारांचे आपापसात बिनसदल्याने त्यांनी स्वताःला दूर ठेवले आहे. मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री यांचा सनबर्न महोत्सवाला पूर्ण पाठींबा असून त्यांच्याकडून गांवस यांच्यामार्फत या महोत्सवाला पेडणेतील पंचायत, पालिका तथा अन्य लोकांकडून समर्थन मिळवून देण्याची जबाबदारी सोपवलेली असल्याचीही खबर चर्चेत आहे. तुळशीदास गांवस यांनी मात्र आपली भूमीका अद्याप जाहीर केली नसली तरी हा महोत्सव धारगळ गावांत आयोजित होत असल्यामुळे धारगळ पंचायत आणि धारगळवासियांनी आपली भूमीका जाहीर केल्यानंतर पेडणेतील इतर पंचायतींना आपली भूमीका मांडणे अधिक सोपे ठरेल,असे म्हटले आहे.

  • Related Posts

    चिरेखाणी; मशीनमागे ७० हजारांचा हप्ता !

    महसूल, पोलिस, वन, वाहतूक, खाण अधिकारी वाटेकरी गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) रेती आणि चिरे हे बांधकामासाठी आवश्यक घटक असले तरी अधिकृत परवाने नसल्याने या दोन्हीच्या उपलब्धतेत मोठी अडचण आहे. त्यामुळे…

    राजधानीला ‘मुंबई’ बनवण्याचा घाट का ?

    पूरप्रवण क्षेत्रात उंच इमारतींना परवानगी – गोवा बचाव अभियानाचा आरोप गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) पणजी शहरात सध्या बाह्य विकास आराखड्यातील झोन बदलून मोठ्या प्रमाणात सरकारी जमिनीतील अधिसूचित पूरप्रवण क्षेत्रात उंच…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    24/04/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • एप्रिल 24, 2025
    • 3 views
    24/04/2025 e-paper

    माणसासम वागणे… हीच प्रार्थना!

    • By Gaonkaari
    • एप्रिल 24, 2025
    • 4 views
    माणसासम वागणे… हीच प्रार्थना!

    चिरेखाणी; मशीनमागे ७० हजारांचा हप्ता !

    • By Gaonkaari
    • एप्रिल 24, 2025
    • 4 views
    चिरेखाणी; मशीनमागे ७० हजारांचा हप्ता !

    23/04/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • एप्रिल 23, 2025
    • 3 views
    23/04/2025 e-paper
    error: Content is protected !!