गोव्याची तुकड्या तुकड्यात विक्री करण्याचा डाव

हायकोर्टाच्या निवाड्याने जनतेच्या हक्कांना संरक्षण

म्हापसा, दि. १५ (प्रतिनिधी) –

नगर नियोजन खात्याच्या कलम १७(२) अंतर्गत जमिनींची तुकड्या तुकड्यात विक्री करण्याचा घाट अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने उधळून लावला आहे. या निवाड्यातून जनतेच्या हक्कांना संरक्षण मिळाल्याचे गोवा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस एड. श्रीनिवास खलप यांनी सांगितले.
उत्तर गोवा जिल्हा प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी गोवा प्रदेश काँग्रेसचे सचिव विजय भिके, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विरेंद्र शिरोडकर आणि युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष विवेक डिसिल्वा उपस्थित होते. विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गोवा वाचवण्यासाठी सुरू केलेल्या लढ्यामुळे हे शक्य झाले आहे, असेही यावेळी एड. खलप म्हणाले.
भाजप सरकारने मोठ्या प्रमाणात जमिनींचे रूपांतर, डोंगर कापणी आणि बेकायदेशीर पद्धतीने मोठमोठ्या प्रकल्पांना परवानगी देऊन गोव्याच्या पर्यावरणाचा नाश करण्याचे कारस्थान सुरू केले आहे. राज्याचे पर्यावरण आणि ओळख जपणाऱ्या कायद्यांना फाटा देऊन जमिनी लाटण्यासाठी तयार केलेल्या कायद्यांचा या निकालाने पर्दाफाश केल्याचा आरोप काँग्रेसने केला.
भाजपचा हेतू नियोजनबद्ध आणि शाश्वत विकास करणे नाही, तर त्यांच्या उद्योगपती मित्रांना फायदा मिळवून देण्यासाठी गोव्याच्या नाशाला चालना देणे हा आहे. गोमंतकीयांनी आता अधिक सावध आणि एकजूट राखून गोवा विरोधी या धोरणांना विरोध करायला हवा. काँग्रेस पक्ष हे षड्यंत्र उघड करण्यासाठी आणि भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लढण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

  • Related Posts

    बेकायदा बांधकामे: राज्य सरकारसमोर पेच

    सरकारी अधिकाऱ्यांवर न्यायालयीन अवमानाची तलवार पणजी, दि. १४ (प्रतिनिधी) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायाधीश बी.पी. देशपांडे यांनी स्वेच्छा दखल घेतलेल्या बेकायदा बांधकामाच्या विषयावर अखेर गोवा…

    टीसीपीच्या वादग्रस्त १७ (२) कलमाची होळी

    मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचा सरकारला दणका पणजी, दि. १३ (प्रतिनिधी) प्रादेशिक आराखडा-२०२१ मध्ये अधिसूचित केलेल्या भूवापर तरतुदीत बदल आणि दुरुस्ती करण्याची मोकळीक देऊन सरसकट जमीन रूपांतराचे रान खुले करणाऱ्या…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    15/03/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 15, 2025
    • 1 views
    15/03/2025 e-paper

    गोव्याची तुकड्या तुकड्यात विक्री करण्याचा डाव

    • By Gaonkaari
    • मार्च 15, 2025
    • 7 views
    गोव्याची तुकड्या तुकड्यात विक्री करण्याचा डाव

    पणजीकर इतके गप्प का?

    • By Gaonkaari
    • मार्च 15, 2025
    • 10 views
    पणजीकर इतके गप्प का?

    14/03/2025 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 14, 2025
    • 6 views
    14/03/2025 e-paper
    error: Content is protected !!