हरमल, वझरीत रविवारी जनउठाव

भूरूपांतर आणि कोर्ट रिसिव्हरविरोधात एल्गार


गांवकारी, दि. २० (प्रतिनिधी)

पेडणे तालुक्यातील भटवाडी–हरमल येथे परप्रांतीयांनी विकत घेतलेल्या सुमारे ३ लाख ५ हजार चौ. मीटर जमिनीचे भूरूपांतर आणि वझरीवासियांनी कोर्ट रिसिव्हर नामक भाटकाराविरोधात दाखल केलेली ऐतिहासिक याचिका यावरून रविवार, दि. २८ रोजी दोन्ही गावांत जनउठाव होणार आहे.
हरमलात एकजुटीचे भव्य दर्शन घडणार ?
भटवाडी–हरमल येथे सर्वे क्रमांक २७५/० आणि २४२/० याठिकाणी किशोरकुमार काया आणि कैलाश राजेंद्र सिंग यांनी विकत घेतलेल्या सुमारे ३ लाख ५ हजार चौ. मीटर जमिनीच्या झोन बदलासाठी नगर नियोजन खात्याने कलम ३९(ए) अंतर्गत अधिसूचना जारी केली आहे. या भूरूपांतरामुळे भटवाडीसह सभोवतालची सर्व गावे धोक्यात येणार आहेत. या मशाल मिरवणुकीला संपूर्ण हरमलवासीयांनी पाठींबा दिल्यास ती अभूतपूर्व ठरणार आहे. गावाच्या रक्षणार्थ मोठ्या संख्येने घराबाहेर पडून या मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन भटवाडीवासीयांनी केले आहे.
आश्वासनपूर्ततेची प्रतिक्षा
भटवाडीवासीयांनी जिल्हा पंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मध्यस्थी करून हे भूरूपांतर रद्द करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपला पवित्रा बदलला. आता निवडणुका संपून निकालही जाहीर झाले आहेत. त्यामुळे आश्वासनपूर्ततेची वेळ आली आहे. या शब्दाची आठवण करून देण्यासाठीच मशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
वझरीचा ऐतिहासिक लढा
पेडणे तालुक्यातील वझरी गावच्या जमिनी पोर्तुगीज काळात कोर्ट रिसिव्हरच्या नावे लागल्याने या कोर्ट रिसिव्हरकडून भाटकारशाही गाजवली जात आहे. संपूर्ण वझरी गाव आपला असल्याचा दावा करून आता कोर्ट रिसिव्हर कुटुंबाकडून या जमिनी परप्रांतीयांना विकण्यास प्रारंभ झाला असून हा वझरी गावावरच संकटकाळ ठरणार आहे. या जमिनीच्या विक्रीखताला आव्हान देणारी याचिका वझरी शेतकरी नागरिक कृती समितीने दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी सुरू झाली आहे. ही याचिका ऐतिहासिक ठरणार असून पोर्तुगीज काळात तत्कालीन अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य बहुजन समाजाच्या जमिनी गिळंकृत करण्याचा पोर्तुगीजधार्जिण्यांचा डाव आता न्यायालयासमोर उघड होणार आहे. ही याचिका ग्रामस्थांच्या बाजूने झाल्यास त्याचे पडसाद संपूर्ण गोव्यावर उमटतील, असा विश्वास समितीचे निमंत्रक निलेश शेटये यांनी व्यक्त केला. या विषयावरून वझरी गावची अभूतपूर्व एकजूट पाहायला मिळते, असेही ते म्हणाले.
लढ्यानिमित्त मशाल मिरवणूक
वझरीवासियांनी सुरू केलेल्या या लढ्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी रविवार, दि. २८ रोजी वझरीत मशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी समितीची सर्वसाधारण बैठक आयोजित केली असून या बैठकीत नव्या समितीची नियुक्ती होईल. त्यानंतर संध्याकाळी मशाल मिरवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

युनिटी मॉलविरोधात
चिंबलवासीयांचा मोर्चा

गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी)

चिंबल येथील नियोजित युनिटी मॉलचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात न्यायप्रविष्ट असताना, तिथे काम सुरू झाल्याने चिंबलवासीयांनी तीव्र हरकत घेतली आहे. याविरोधात रविवारी धरणे आंदोलन केले जाणार असून ४ जानेवारी रोजी भव्य मिरवणूक काढण्याचे ठरले आहे.
तलाव नष्ट होण्याची भीती
चिंबल येथे पर्यटन खात्यातर्फे हे बांधकाम केले जात आहे. याठिकाणी तोयार तलाव असून, हा प्रकल्प उभा राहिल्यास तलाव नष्ट होईल आणि त्याचे विपरीत परिणाम संपूर्ण चिंबल गावावर होतील, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. आज स्थानिकांनी प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन जाब विचारला. सरकार आपली मनमानी करत असून हे काम बंद झाले नाही, तर चिंबल गावात जनउठाव होईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
आंदोलन आणि मिरवणुकीचे आयोजन
या प्रकरणी रविवार, दि. २८ रोजी चिंबल गावात धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे, तर ४ जानेवारी रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या विषयावरून आता माघार नाही, असा ठाम निर्धार चिंबलवासीयांनी व्यक्त केला आहे.

  • Related Posts

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    Indian squash player Yash Fadte reached the quarterfinals of the PSA Aramis Club Open in Belgium, demonstrating resilience in a grueling five-game battle against Scottish No. 1 John Meehan, following a remarkable comeback victory in the pre-quarterfinals.

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    मडगावातील प्रस्तावित बहुमजली पार्किंग प्रकल्पाच्या पायाभरणीला ११ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधत ‘मडगांवचो आवाज’चे युवा नेते प्रभव नायक यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. कोसळलेल्या शिलान्यास फलकाला पुष्पहार अर्पण करून त्यांनी या प्रकल्पाला ‘अपयशाचे स्मारक’ असे संबोधले.

    You Missed

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 18, 2026
    • 13 views
    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 18, 2026
    • 11 views
    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    1526–2026: 500 Years of the Foral

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 16, 2026
    • 20 views
    1526–2026: 500 Years of the Foral

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 14, 2026
    • 31 views
    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 14, 2026
    • 27 views
    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 12, 2026
    • 35 views
    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM