जेनिटोच्या मालमत्तेची होणार चौकशी?

राजकीय नेत्यांसाठी खंडणी गोळा करत असल्याचा संशय

गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी)

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा आरोप असलेला कुख्यात गुंड जेनिटो कार्दोझो याच्या मालमत्तेची चौकशी होणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. राजकीय नेत्यांसाठी खंडणी गोळा करण्याचे काम जेनिटो करत असल्याची चर्चा असून, त्याच्या मालमत्तेची चौकशी झाल्यास त्याच्या राजकीय आश्रयदात्यांचा पर्दाफाश होईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
राज्यातील गुंडगिरीचा बिमोड करू, अशी घोषणा केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ जेनिटो कार्दोझोला अटक केली, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील गुन्हेगारी विश्वातील पहिल्या क्रमांकाच्या गुंडाला पोलिसांनी हात घालून लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. मात्र काही निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या कारवाईबाबत साशंकता व्यक्त केली आहे. जेनिटोला अटक झाली की तो शरण आला, याचा शोध लावा, असे या पोलिसांचे म्हणणे आहे.
रामा काणकोणकर हल्ला प्रकरणामुळे राजकीय नेते आणि गुंडांच्या साटेलोट्यांचा विषय चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर हे साटेलोटे उघड करणारे अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. अशा परिस्थितीत या चर्चेचे किंवा आंदोलनाचे केंद्रबिंदू राजकीय नेते ठरू नयेत, म्हणूनच जेनिटोला अटक करून राजकीय नेत्यांना अभय देण्यात आले असावे, अशी शक्यता काही पोलिसांनी व्यक्त केली आहे.
जेनिटोची मालमत्ता तपासण्याची गरज
राज्यातील किनारी भागातील अनेक आस्थापनांकडून राजकीय नेत्यांचे हप्ते गोळा करण्याचे काम जेनिटो करत असल्याची माहितीही समोर आली आहे. जेनिटोच्या अधीन गुंडांची मोठी फौज कार्यरत असून, या फौजेच्या माध्यमातून तो आपल्या आश्रयदात्या राजकीय नेत्यांना संरक्षण पुरवतो. तसेच, या नेत्यांना अडसर ठरणाऱ्यांना धमक्या देणे किंवा त्यांचा काटा काढणे हे कामही तो करतो.
जेनिटो कार्दोझो सध्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे. ही मालमत्ता त्याच्याकडे कशी आली, याची चौकशी होणे अत्यावश्यक आहे, असेही मत व्यक्त केले जात आहे.

  • Related Posts

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    South Goa MP Capt. Viriato Fernandes on Monday strongly raised the issue of families who surrendered their land for railway projects, demanding that Konkan Railway give them priority in manpower recruitment as well as allotment of shops at railway stations.

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    खासगी बस वाहतूकदारांची सरकारला नोटीसगांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्यातील खासगी बस व्यावसायिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या सात दिवसांत सोडवाव्यात; अन्यथा गोव्यात येणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना…

    You Missed

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 10 views
    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    24/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 23 views
    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 16 views
    24/08/2026 e-paper

    कारापूरवासीयांची सुटका करा

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 19 views
    कारापूरवासीयांची सुटका करा

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 18 views
    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 18 views
    गडकरींना काळे झेंडे दाखवणार