कदंबमध्ये वरिष्ठ पदांच्या भरतीला ब्रेक ?

गांवकारी,दि. २ (प्रतिनिधी) : कदंब वाहतूक महामंडळातील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी महामंडळाच्या संचालक मंडळाने एप्रिल महिन्यात मान्यता दिली असतानाही उप सरव्यवस्थापक (तांत्रित) या महत्त्वाच्या पदाची जाहिरात न काढल्याने भरती प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. इतर मंजूर पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असताना हे एकमेव पद वगळण्यात आल्याचा आरोप होत आहे.

महामंडळातील उप सरव्यवस्थापक (तांत्रिक) पद महेंद्र पेडणेकर यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झाले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी वर्कशॉप व्यवस्थापकपदी बढती मिळालेले रॉक लुईस यांनी या पदावर पदोन्नती मिळावी यासाठी महामंडळाकडे निवेदन दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

कदंबच्या भरती नियमांनुसार वर्कशॉप व्यवस्थापक पदावरून उप सरव्यवस्थापक (तांत्रिक) पदावर बढतीसाठी किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक असल्याचे सांगितले जाते. तसेच सातव्या वेतन आयोगाच्या निकषांनुसार लेव्हल ११ वरून लेव्हल १२ वर जाण्यासाठी पाच वर्षांच्या अनुभवाची अट असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्याकडे सध्या केवळ एका वर्षाचा अनुभव असल्याने त्यांच्या संभाव्य पदोन्नतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

या पार्श्वभूमीवर मंजूर असूनही उप सरव्यवस्थापक (तांत्रिक) पदाची जाहिरात रोखण्यात आली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कदंब महामंडळातील भरती प्रक्रियेबाबत यापूर्वीही गंभीर आरोप झाले आहेत. भरती समितीतील काही अधिकारी आपल्यापेक्षा वरिष्ठ पदासाठी पात्र उमेदवार पुढे आल्यास त्यांच्या अर्जावर प्रतिकूल शेरा नोंदवून जाहिरात रद्द करण्यास भाग पाडतात, असा आरोप करण्यात आला आहे.

महामंडळातील कंपनी सेक्रेटरी, पर्सनल मॅनेजर, कंट्रोलर ऑफ परचेस आणि फायनान्शियल कंट्रोलर यांसारखी महत्त्वाची पदेही अनेक वर्षांपासून नियमित स्वरूपात भरली नसल्याचा दावा आहे. कनिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांकडे वरिष्ठ पदांचा अतिरिक्त कार्यभार देऊन रिक्त पदे कायम ठेवली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

  • Related Posts

    राहुल गांधी येणार; काँग्रेसमध्ये जोश

    गोंय राखण यात्रेत मडगावांत घेणार सहभाग गांवकारी, दि. १७ ( प्रतिनिधी) गोवा प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या ‘गोय राखण यात्रे’च्या समारोपाला पक्षाचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी…

    RANE ORDERS INSPECTION OF COMBA SEWAGE MENACE, ASSURES SGDH UPGRADATION

    Health Minister Vishwajit Rane has directed the Margao Municipal Council to inspect the persistent sewage leakage problem in Comba and assured that steps were being taken to upgrade the South Goa District Hospital into a fully equipped tertiary care facility, including a Cath Lab and neurosurgery unit.

    You Missed

    फातोर्ड्यात वोट चोरी उघड

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 17, 2026
    • 15 views
    फातोर्ड्यात वोट चोरी उघड

    उपनिरीक्षक सपना गावस यांच्या तपासाला अखेर यश

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 17, 2026
    • 10 views
    उपनिरीक्षक सपना गावस यांच्या तपासाला अखेर यश

    राहुल गांधी येणार; काँग्रेसमध्ये जोश

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 17, 2026
    • 18 views
    राहुल गांधी येणार; काँग्रेसमध्ये जोश

    गोव्याची वाटचाल कट्टरतेकडे ?

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 17, 2026
    • 15 views
    गोव्याची वाटचाल कट्टरतेकडे ?

    RANE ORDERS INSPECTION OF COMBA SEWAGE MENACE, ASSURES SGDH UPGRADATION

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 17, 2026
    • 24 views
    RANE ORDERS INSPECTION OF COMBA SEWAGE MENACE, ASSURES SGDH UPGRADATION

    17/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 17, 2026
    • 23 views
    17/10/2026 e-paper