रेईस मागोस–वेरेंमध्ये अवाजवी वीजबिलांचा प्रश्न

सामूहिक तांत्रिक चौकशीची ग्राहकाची मागणी
——————————-
गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी)
रेईस मागोस–वेरें आणि आसपासच्या परिसरातील ग्राहकांना अचानक वाढीव वीजबिले येत असल्याच्या तक्रारींची वीज खात्याने सामूहिक तांत्रिक चौकशी करावी, अशी मागणी एका ग्राहकाने केली आहे.
संबंधित ग्राहकाच्या तक्रारीला उत्तर देताना वीज खात्याने ३०४ युनिट वीज वापराची नोंद योग्य असल्याचे आणि बिलाची गणना नियमानुसार केल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, घरगुती वापराच्या तुलनेत वीज वापरात अचानक झालेली वाढ हा मूळ प्रश्न असून, केवळ मीटर रीडिंग आणि बिलाची गणना योग्य असल्याचे सांगून त्याचे निराकरण होणार नाही, असे ग्राहकाने म्हटले आहे.
मीटर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचा सल्ला खात्याने दिला असला, तरी एकाच परिसरातील अनेक ग्राहकांना अशाच समस्येला सामोरे जावे लागत असल्यास प्रत्येकाने स्वतंत्र तपासणी करण्याऐवजी खात्याने सामूहिक चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
परिसरातील वीजपुरवठा यंत्रणेत काही तांत्रिक दोष आहे का किंवा वीज वापरात असामान्य वाढ होण्यामागे अन्य सामूहिक कारण आहे का, याचा शोध घेऊन मागील बिलिंग कालावधीशी तुलनात्मक तपासणी करावी, असेही ग्राहकाने सुचविले आहे. बिलाची गणना योग्य असल्याचे सांगण्यापलीकडे जाऊन ग्राहकांना वाढीव वीज वापराचे समाधानकारक स्पष्टीकरण द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

  • Related Posts

    काँग्रेसच्या ‘गोंय राखण अभियाना’चा शुभारंभ

    भाजपच्या १४ वर्षांच्या कारभारावर टीका; २०२७ मध्ये सत्तेत येण्याचा निर्धार ———————————————————————————– गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) संविधान दिनाचे औचित्य साधून गोवा प्रदेश काँग्रेस समितीने मडगाव येथील ऐतिहासिक लोहिया मैदानावर ‘संविधान रक्षा…

    न्यायमूर्ती महेश सोनक: एक उत्कृष्ट आणि प्रतिभावान न्यायमूर्ती

    अवघ्या ६२व्या वर्षी निवृत्त होत असलेल्या न्यायमूर्ती महेश सोनक यांच्या मनात समाजसेवेच्या आणखी काही योजना नक्कीच असतील. वाचनाची प्रचंड आवड, विपुल लेखन आणि प्रभावी वक्तृत्वाची देणगी लाभलेले न्यायमूर्ती सोनक हे…

    You Missed

    रेईस मागोस–वेरेंमध्ये अवाजवी वीजबिलांचा प्रश्न

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 27, 2026
    • 8 views
    रेईस मागोस–वेरेंमध्ये अवाजवी वीजबिलांचा प्रश्न

    काँग्रेसच्या ‘गोंय राखण अभियाना’चा शुभारंभ

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 27, 2026
    • 12 views
    काँग्रेसच्या ‘गोंय राखण अभियाना’चा शुभारंभ

    न्यायमूर्ती महेश सोनक: एक उत्कृष्ट आणि प्रतिभावान न्यायमूर्ती

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 27, 2026
    • 10 views
    न्यायमूर्ती महेश सोनक:  एक उत्कृष्ट आणि प्रतिभावान न्यायमूर्ती

    27/11/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 27, 2026
    • 14 views

    ३२ मडगावकरांचा विश्वास सार्थ ठरतोय : प्रभव नायक

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 27, 2026
    • 15 views
    ३२ मडगावकरांचा विश्वास  सार्थ ठरतोय : प्रभव नायक

    आगरवाडा – चोपडे पठारावर हरित महाप्रकल्प

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 27, 2026
    • 15 views
    आगरवाडा – चोपडे पठारावर हरित महाप्रकल्प