खाजगी कार्यालयात कांजिण्याची साथ

आरोग्य खात्याकडून होणार रुग्णांची तपासणी

गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी)

येथील एका खाजगी मल्टीनॅशनल कंपनीच्या कार्यालयात अचानकपणे सुमारे १५ ते २० कर्मचाऱ्यांना कांजिण्याची लागण झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. एकाच वेळी अनेकांना कांजिण्याची लागण झाल्याने ही साथ नेमकी कशी आली, याचा शोध आरोग्य खाते घेणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, पणजी येथे तीन मजल्यांवर एका खाजगी मल्टीनॅशनल कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीत शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील काही कर्मचाऱ्यांना अचानक कांजिण्याची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली. कांजिण्याची लागण झाल्याचे माहित असूनही व्यवस्थापनाकडून त्यासंबंधी कोणतीही काळजी घेण्यात आली नाही. संसर्गजन्य आजार असूनही इतर कर्मचाऱ्यांना बैठकीसाठी एकत्र बोलावण्यात आल्यामुळे कर्मचारी नाराज झाले आहेत. नोकरीच्या भीतीने त्यांना या बैठकांना हजर राहावे लागल्याने नाराजी अधिक वाढली आहे.
आरोग्य खात्याकडून दखल
या खाजगी कंपनीच्या कार्यालयातील कांजिण्याची साथ पसरल्याची माहिती मिळताच आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. तिथे माहिती घेतल्यानंतर कांजिण्याची लागण झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी रजा घेतल्याचे समजले. यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी कार्यालयात औषधाची फवारणी केली. तसेच रजेवरील कर्मचाऱ्यांची माहिती व्यवस्थापनाकडून मिळवून त्यांच्या घरी जाऊन तपासणी करण्याचे ठरवले आहे.
अचानकपणे कांजिण्याची साथ कशी आली, याचे कोडे सर्वांनाच पडले आहे. हे प्रकरण आरोग्य सचिवांकडे पोहोचल्याने त्यांनी याचा शोध घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

  • Related Posts

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    काँग्रेस नेत्यांनी आरोप केला आहे की, गेल्या पंधरा वर्षांत उत्तर गोव्यात सत्ताधारी नेत्यांचाच विकास झाला असून, गोव्याच्या जमिनी बिल्डर लॉबी आणि खासगी विद्यापीठांच्या घशात घालण्याचे काम केले जात आहे.

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    रमेश तवडकर यांना पूर्ण विश्वास गांवकारी,दि.३०(प्रतिनिधी) राज्यातील अनुसुचित जमातीला राजकीय आरक्षणाच्या विषयावर आपण केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी उपेंद्र जोशी यांच्यामार्फत या गोष्टीकडे आपण जातीने लक्ष ठेवून…

    You Missed

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 11 views
    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    30/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 22 views
    30/09/2026 e-paper

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 20 views
    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 24 views
    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 28 views
    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 19 views
    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain