कुठे आहे ‘इंडिया’ आघाडी?

आरजीच्या आक्रमकपणाची लोक आठवण काढतात खरे पण ही आठवण केवळ या क्रांतीकारकांच्या कामाकडे मनोरंजन म्हणून पाहण्यासाठीची आहे की खरोखरच गोव्याला या क्रांतीकारकांची खरी गरज असल्याच्या भावनेतून आहे, हे कोण सांगणार ?

लोकसभा निवडणूकीसाठी इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आलेले घटक लोकसभेच्या निकालानंतर पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत, यावरून या आघाडीची विश्वासाहर्ता किती पोकळ आहे, हेच दिसून येते. अशावेळी लोकांनी या आघाडीवर विश्वास ठेवून सत्ताधारी घटकांशी पंगा कसा घ्यावा, याचे उत्तर विरोधकांचे नेते देऊ शकणार काय. राज्यात भुरूपांतरे, नोकरी विक्री प्रकरणे, मेगा प्रकल्प तसेच सर्वंत्र ठिकाणी सुरू असलेले वादग्रस्त जमीन विक्री व्यवहार सुरू असताना विरोधक म्हणून सर्व आघाडीचे घटक अपयशीच ठरल्याचे दिसते. अर्थात ३३ विरूद्ध ७ हा आकडा खूपच मर्यादित आहे हे जरी मान्य असले तरी प्रामाणिकता आणि शुद्ध हेतू असल्यास या नगण्य आकड्याचाही फरक पडणार नाही. पण ही प्रामाणिकताच आघाडीच्या विश्वासाहर्तेची मोठी बाधा आहे. विरोधी काँग्रेस पक्षातील आमदार आणि संघटनेत दोन गट पडले आहेत. एक गट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत आहे तर दुसऱ्या गटाचे प्रमुख शत्रू विश्वजीत राणे आहेत. या दोन्ही गटांत अप्रत्यक्ष स्पर्धा सुरू आहे. भूरूपांतराचे सुत्रधार विश्वजीत असल्यामुळे विरोधकातील अनेकांची हवाच गेली आहे तर नोकरी विक्री प्रकरणात मुख्यमंत्रीच अधिक लक्ष्य बनत असल्यामुळे एक गट थंडावला आहे. सत्ताधारी पक्षाचे एक आमदार आपल्याच एका कार्यकर्त्याला फोनवर धमकावत असतानाचा आणि एका मंत्र्याला आपण ७ लाख रूपये दिल्याचा दावा करत असल्याचे ऑडिओ रिलीज झाले आहे. या ऑडीओवर काँग्रेसची काहीच प्रतिक्रिया नसणे हे कशाचे द्योतक आहे. त्या ऑडीओमध्ये उल्लेख झालेल्या मंत्र्यांची विरोधकांशी मैत्री असल्यामुळेच ते प्रकरण त्यांनी दुर्लक्षीत केले असावे, अशी शक्यता आहे. विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव हे तर भूमीगत असल्यागत कुठेच दिसत नाहीत. त्यांचे वडिल आणि माजीमंत्री जॉकीम आलेमाव हे आजारी असल्यामुळे ते त्यांची काळजी वाहत आहेत,अशी खबर आहे. परंतु राज्याचे विरोधी पक्षनेते या नात्याने आपली कौटुंबिक जबाबदारी आणि संविधानिक जबाबदारी याची सांगड घालण्याची परिपक्वता त्यांना अवलंबवावीच लागणार आहे. हळदोण्याचे आमदार कार्लूस फरेरा आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी चक्क विश्वजीतांच्या प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र देणारे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. या उभयतांनी त्याचा नकार केला नाही, याचा अर्थ त्यांची भूमीका स्पष्ट आहे. विजय सरदेसाई हे आपल्यापरीने आक्रमक विधाने करतात पण भाजप सरकारातील कित्येकांकडे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्यामुळे ते किती थरापर्यंत जाऊन सत्ताधाऱ्यांशी पंगा घेणार, याबाबतही लोक साक्षंक आहेत. आम आदमी पार्टीचे दोन आमदार प्रयत्न करताना दिसतात पण पक्षाचे निमंत्रक एड.अमित पालेकर हे वकिली करत असताना राज्यातले बडे बिल्डर आणि राजकारणी हे त्यांचे क्लाईंट होते. आता सरकारशी दोन हात करताना या क्लाईंटचे संबंध आड येऊ शकतात,असाही संशय लोकांना वाटतो. आरजीपी हा पक्ष इंडिया आघाडीचा घटक नाही. मनोज परब अज्ञातवासात गेल्यानंतर आमदार विरेश बोरकर यांचाही आवाज मंदावलेला दिसतो. आरजीच्या आक्रमकपणाची लोक आठवण काढतात खरे पण ही आठवण केवळ या क्रांतीकारकांच्या कामाकडे मनोरंजन म्हणून पाहण्यासाठीची आहे की खरोखरच गोव्याला या क्रांतीकारकांची खरी गरज असल्याच्या भावनेतून आहे, हे कोण सांगणार ?

  • Related Posts

    ऑर्डर.. ऑर्डर…

    केवळ भावना किंवा आपल्याला काय वाटते याला अर्थ नाही तर ते सिद्ध करण्याची किंवा त्याबाबतचे पुरावे हाती असण्याची गरज आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सनबर्न महोत्सवाला सशर्त मान्यता दिली…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    हायकोर्टाने शर्ती आणि अटींची बंधने जी सरकार आणि आयोजकांना घातली आहेत त्यांचे खरोखरच पालन होते काय हे न्यायदेवता आता डोळ्यांवरील पट्टी हटविल्यामुळे पाहु शकेल, एवढीच काय ती अपेक्षा सर्वसामान्य नागरिक…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    21/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 7 views
    21/12/2024 e-paper

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 8 views
    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 7 views
    ऑर्डर.. ऑर्डर…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 5 views
    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    20/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 6 views
    20/12/2024 e-paper

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 8 views
    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?
    error: Content is protected !!