लुथ्रा बंधूंना गोव्यात आणले… पुढे काय?

पोलिस कारवाईकडे सर्वांच्या नजरा

गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी)

हडफडे येथील वादग्रस्त बर्च बाय रोमीओ लेनचे मालक सौरव आणि गौरव लुथ्रा यांना अखेर आज पोलिसांनी गोव्यात आणले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना हणजूण पोलिस स्थानकात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना म्हापसा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे.
हडफडेतील अग्निकांडानंतर हे दोघे बंधू रातोरात दिल्लीमार्गे थायलंडला पळाल्याचे सांगण्यात येते. गोवा पोलिसांनी इंटरपोलच्या माध्यमातून लुक-आऊट नोटीस बजावल्यानंतर त्यांना फुकेट येथे ताब्यात घेण्यात आले. केंद्र सरकारच्या मदतीने थायलंड सरकारशी चर्चा करून त्यांना भारतात पाठविण्याची सोय करण्यात आली. काल ते दिल्लीत दाखल झाले, तर आज सकाळी त्यांना दिल्लीतून गोव्यात आणण्यात आले. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोलिसांचे पथक सकाळी १०.३० वाजता त्यांना घेऊन दाखल झाले.

लुथ्रा बंधूंना कुणाचे प्रोटेक्शन?
हडफडे येथील मूळ मालक प्रदीप घाडी आमोणकर आणि सुनील दीवकर यांनी ही जमीन सुरेंद्रकुमार खोसला यांना विक्री कराराद्वारे दिली होती. हा करार रद्द करण्यासाठी जमीनमालकांनी नोटीस बजावली होती; मात्र हे प्रकरण गेली २० वर्षे न्यायप्रविष्ट आहे. तरीदेखील खोसला यांनी ही जागा बेकायदेशीररीत्या लीजवर दिली असून सरकारी खात्यांनी ती लीज स्वीकारून विविध परवाने दिले आहेत.
लुथ्रा बंधूंनी ही जागा खोसला यांच्याकडूनच लीजवर घेतली आहे. त्यामुळे या लीजच्या विषयाचा सखोल तपास आता सुरू होणार आहे. किनारी भागात राजकीय आशीर्वादाशिवाय व्यवसाय करणे अशक्य असल्याने लुथ्रा बंधूंचा राजकीय गॉडफादर कोण, हे तपासातून उघड होण्याची शक्यता आहे. परवाने नसताना हा नाईटक्लब सुरू होता, याबाबत लुथ्रा बंधू पोलिस तपासात नेमकी काय माहिती देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कुणाला देत होते हप्ते?
किनारी भागातील स्पा, मसाज पार्लर, नाईटक्लब, पब आदींकडून दर महिन्याला हप्ते गोळा केले जातात, अशी जोरदार चर्चा आहे. लुथ्रा बंधूंकडून हे हप्ते कोण गोळा करत होते, याची माहिती पोलिस मिळवतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हा तपास नेमका कोण करणार, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे दिल्लीवाल्यांशी साटेलोटे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पोलिस राजकीय दबावाखाली खरोखरच निपक्षपातीपणे तपास करू शकतील का, याबाबत लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे.

  • Related Posts

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    मडगाव,दि.२२ जून : कारे कायदा महाविद्यालयातील बीएएलएलबी प्रवेश प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीत तत्कालीन प्राचार्य साबा डीसिल्वा यांना जबाबदार धरण्यात आले असून, विद्या विकास मंडळाने त्यांना सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगितल्याची…

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival

    Goan filmmaker Sainath S. Uskaikar’s documentary ‘Waai’ has won the prestigious Silver Conch for Best Documentary at the Mumbai International Film Festival (MIFF), an honour regarded as one of Asia’s leading festivals. The film, produced by Bharatbala, chronicles the lives of the last four Waai singers in India.

    You Missed

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    प्रवेश प्रक्रियेत गैरव्यवहाराचा ठपका; प्राचार्य साबा डीसिल्वा यांना सक्तीची निवृत्ती

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival

    Goan Filmmaker Sainath S. Uskaikar’s ‘Waai’ Wins Top Honour at Mumbai International Film Festival

    योग दिनानिमित्त भाजप सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणावरून टीका

    योग दिनानिमित्त भाजप सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल; भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणावरून टीका

    Chief Minister Leads International Yoga Day Celebrations at Bambolim Stadium

    Chief Minister Leads International Yoga Day Celebrations at Bambolim Stadium

    Congress Alleges NDZ Proposal is ‘Environmental Greenwashing’; Amit Patkar Questions Role of Section 39A

    Congress Alleges NDZ Proposal is ‘Environmental Greenwashing’; Amit Patkar Questions Role of Section 39A

    EIE Welcomes Supreme Court Verdict on Pedestrian Rights, Demands Removal of Casino Encroachments

    EIE Welcomes Supreme Court Verdict on Pedestrian Rights, Demands Removal of Casino Encroachments