पणजीत उसळणार जनसागर

‘इनफ इज इनफ’ संघटनेची जोरदार तयारी

गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी)

राज्य सरकारने विधानसभा अधिवेशन पुन्हा बोलावून गोवा कृषी जमीन संरक्षण विधेयकावर चर्चा करावी, अन्यथा राजधानी पणजीत भव्य मोर्चा काढण्याचा इशारा चळवळीचे नेते निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी दिला आहे. संघटनेचे कार्यकर्ते या मोर्चासाठी सज्ज झाले असून ठिकठिकाणी जागृती सभांचा धडाका सुरू आहे.
सांगे येथे झालेल्या जाहीर सभेत न्यायमूर्ती रिबेलो यांनी सरकारला १५ दिवसांची मुदत दिली. गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी दीर्घकाळ अधिवेशन घेण्याचे केलेले आवाहन कौतुकास्पद असल्याचे सांगत, राज्यपालांनीच पुढाकार घेऊन विधानसभा पुन्हा बोलवावी, अशी मागणी त्यांनी केली.
मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन ६ ते २७ मार्चपर्यंत नियोजित होते. मात्र १६ मार्च रोजी फोंडा पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ते अचानक स्थगित करण्यात आले. त्यानंतर २४ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने ही पोटनिवडणूक रद्द केली. त्यामुळे आचारसंहिता लागू नसल्याने सरकारने स्थगित केलेले अधिवेशन नव्याने बोलवावे, अशी मागणी सभेत करण्यात आली.
जनशक्तीचा महासागर लोटणार
सरकारने अधिवेशन बोलावले नाही तर संपूर्ण गोव्यातून जनशक्तीचा महासागर राजधानीत लोटणार आहे. जमिनींचे व्यवहार, त्यांचे रूपांतरण, मेगा प्रकल्पांना दिल्या जाणाऱ्या मंजुरी, डोंगरकापणी, नद्यांचे प्रदूषण, नैसर्गिक जलस्त्रोतांचा नाश आणि जंगलतोड यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या सगळ्या गोष्टींचे गंभीर परिणाम गोव्याच्या भवितव्यावर होणार असल्याने वादग्रस्त ३९(ए) कलम रद्द करणे ही काळाची गरज आहे, असे रिबेलो यांनी स्पष्ट केले.
प्रत्येकाने घ्यावी जबाबदारी
ही चळवळ गोव्याचा सांभाळ करण्यासाठी आहे. यात सर्व राजकीय पक्षांचे, बिगर राजकीय संघटनांचे तसेच सर्वसामान्य गोंयकार सहभागी होत आहेत. सरकारला केवळ जनशक्तीची भाषा समजते. त्यामुळे गावागावांतून प्रत्येकाने पुढाकार घेऊन राजधानीत जाहीर केलेल्या दिवशी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. यासंबंधीची तारीख लवकरच जाहीर केली जाईल, असेही सांगण्यात आले.

  • Related Posts

    बेफाम पोलिसांवर कारवाईचा बडगाचार पोलिस कर्मचारी निलंबित; उपनिरीक्षकाची बदली

    गोवा पोलिसांनी गैरवर्तन, भ्रष्टाचार आणि सेवाशिस्तीच्या उल्लंघनाविरोधात कडक भूमिका घेतली आहे. पाच पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात विभागीय कारवाई सुरू करण्यात आली असून, त्यापैकी चार जणांना निलंबित करण्यात आले आहे, तर एका उपनिरीक्षकाची बदली करण्यात आली आहे.

    Dr Sanjay Desai Appointed Regular Principal of Shree Damodar College, Margao

    Dr Sanjay Desai has been formally appointed as the regular Principal of Shree Damodar College, Margao, after fulfilling all university and DHE requirements, following a period as Officiating Principal.

    You Missed

    बेफाम पोलिसांवर कारवाईचा बडगाचार पोलिस कर्मचारी निलंबित; उपनिरीक्षकाची बदली

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 2, 2026
    • 11 views
    बेफाम पोलिसांवर कारवाईचा बडगाचार पोलिस कर्मचारी निलंबित; उपनिरीक्षकाची बदली

    Dr Sanjay Desai Appointed Regular Principal of Shree Damodar College, Margao

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 2, 2026
    • 14 views
    Dr Sanjay Desai Appointed Regular Principal of Shree Damodar College, Margao

    पोलीस भरतीपासून धनगर एसटी दर्जापर्यंत; विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणा

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 2, 2026
    • 16 views
    पोलीस भरतीपासून धनगर एसटी दर्जापर्यंत; विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या घोषणा

    Goa Government Withdraws Two Key Bills During Monsoon Session

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 1, 2026
    • 20 views
    Goa Government Withdraws Two Key Bills During Monsoon Session

    Goa Assembly Passes Nine Bills During Ongoing Session

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 1, 2026
    • 14 views
    Goa Assembly Passes Nine Bills During Ongoing Session

    AAP MLAs Demand Choice Between E20 and Pure Petrol, Seek Assembly Resolution

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 1, 2026
    • 20 views
    AAP MLAs Demand Choice Between E20 and Pure Petrol, Seek Assembly Resolution