पीडितांचा कैवारी, श्रमिकांचा आधारवड सुदीप ताम्हणकर

! ! सुदीप ताम्हणकर वाढदिन विशेष !!

अनेकांना ते रूक्ष वाटतात, कारण ते सडेतोड बोलतात. पण जो त्यांना जवळून ओळखतो तोच त्यांच्या प्रामाणिकपणाची खरी जाण ठेवतो. आजच्या घडीला सामान्य लोकांना, पीडितांना आणि श्रमिकांना ते आधारवड ठरले आहेत.

बार्देश तालुक्यातील शिवोली गावचे हे चळवळी व्यक्तिमत्त्व. एक टॅक्सीचालक आणि संवादिनीवादक (पेटीमास्तर) यांचा पुत्र. बालपणापासूनच वडिलांचा व्यवसाय आणि कलेचा वारसा त्यांनी अंगीकारला. पदवी शिक्षणानंतर सहजपणे सरकारी नोकरी मिळवता आली असती, पण त्यांच्या मनात टॅक्सी व्यवसायाचे वेड होते. घरचा विरोध मोडून त्यांनी घर सोडले आणि या व्यवसायात उतरले.
गोव्याच्या पारंपारिक टॅक्सी व खाजगी प्रवासी वाहतूक व्यवसायात सुशिक्षितांनी प्रवेश केल्यास या व्यवसायाचे नियमीतीकरण होईल, शिस्त आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल, या उद्देशाने त्यांनी एक बस खरेदी केली. मात्र या व्यवसायात कायदेशीर कामांसाठी लाच मागितली गेली आणि ती देणे शक्य नसल्याने संकट ओढवले. त्यातूनच त्यांनी माहिती अधिकार कायद्याचा (RTI) उपयोग करून पहिला विजय मिळवला आणि एक सामान्य RTI कार्यकर्ता म्हणून या लढवय्याचा प्रवास सुरू झाला.
पणजी आझाद मैदानावर विविध विषयांवर आवाज उठवताना ताम्हणकरांना अनेकदा पाहिले असेल. काही मोजकेच सोशल मीडिया पत्रकार त्यांचे विषय लोकांपर्यंत पोहोचवतात. मुख्य प्रवाहातील अधिकतर वर्तमानपत्रे आणि मीडियाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे, कारण ते उघड, प्रखर आणि सामान्यांच्या वेदना व्यक्त करतात जे त्यांना परवडत नाही.
एक सामान्य बसकार खाण, म्हादई, व्याघ्र क्षेत्र, भ्रष्टाचार, सरकारी सेवावाढ, बेकायदा नोकरभरती यांसारखे मोठे विषय हाताळतो हे काही पत्रकारांना पटत नाही. पण त्यांच्या शिक्षण, अभ्यास आणि तळमळीची दखल घेण्याची त्यांना गरज वाटत नाही. चांगल्या पोशाखात कुणी अनाडी काहीही बोलले तरी चालते, पण सामान्य पोशाखात आणि गोंयकारांच्या भाषेत गंभीर विषय मांडणाऱ्या या कार्यकर्त्यांचा मात्र ते द्वेष करतात.
ताम्हणकर मात्र सातत्याने आपले काम करत राहतात. सर्वोच्च न्यायालयातील खाण प्रकरणी गोवा फाउंडेशनबरोबर ते याचिकादार होते. म्हादईप्रश्नी त्यांनी दाखल केलेली याचिका आजही सुनावणीस आहे आणि गोवा सरकारसाठी उपयुक्त ठरली आहे. वाहतूक व्यवसायाशी संबंधित अनेक विषय त्यांनी न्यायालयापर्यंत पोहोचवून न्याय मिळवून दिला आहे.
कदंब पास योजनेमुळे खाजगी बस व्यवसायिकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न झाला. ताम्हणकरांनी न्यायालयात जाऊन हा विषय स्पष्ट केला आणि न्यायालयाने खाजगी बस व्यवसायिकांना अनुदान देण्याचे आदेश दिले. सरकारने टाळाटाळ केली, पण त्यांच्या सचोटी व सातत्याने पाठपुराव्यामुळे अनुदान मिळवण्यात यश आले.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ब्लू कॅब टॅक्सी व्यवसायिकांना न्याय मिळवून देणे, पर्यटन टॅक्सी व्यवसायिकांच्या मीटर व अन्य विषयांवर लोकायुक्त व उच्च न्यायालयापर्यंत लढा देणे, स्मार्ट सिटीच्या नावाखाली खाजगी बस व्यवसायिकांना उपाशी मारण्याचा प्रयत्न हाणून पाडणे—अशा अनेक लढ्यांत त्यांनी यश मिळवले.
राजकारण त्यांना मानवत नाही, म्हणून राजकीय पक्षांना ते आवडत नाहीत. तरीही ते आपले काम थांबवत नाहीत. आंदोलने, भाषणे याबरोबरच सरकारशी संवाद साधून विषय सोडवणे आवश्यक आहे, हा त्यांचा युक्तिवाद आहे.
दिल्लीपर्यंत धाव घेऊन त्यांनी राहूल गांधी, नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधला. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारे वाहतूक व्यवसायाशी संबंधित अनेक विषय त्यांनी सोडवले. निवडणूक रोखे प्रकरणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आजही सुनावणीस आहे.
अनेकांना ते रूक्ष वाटतात, कारण ते सडेतोड बोलतात. पण जो त्यांना जवळून ओळखतो तोच त्यांच्या प्रामाणिकपणाची खरी जाण ठेवतो. आजच्या घडीला सामान्य लोकांना, पीडितांना आणि श्रमिकांना ते आधारवड ठरले आहेत.
गोव्याला लाभलेले हे व्यक्तिमत्त्व म्हणजे एक रत्न आहे. समाजाने या रत्नाची पारख करणे आवश्यक आहे. त्यांच्या वाढदिनी शुभेच्छा—त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यश, कीर्ती लाभो आणि त्यांच्या हातून समाजाची सेवा उत्तरोत्तर घडत राहो हीच सदिच्छा.
एक शुभचिंतक

  • Related Posts

    Mirabag Dam: A Battle Between People and Power

    The Mirabag dam project in Savorde constituency has ignited a storm of resistance. For over a year, the issue has been simmering, but after the success of the Chimbel agitation,…

    The Feudalization of Governance

    In today’s India, the machinery of government increasingly resembles a private court rather than a public institution. For even the smallest matters, citizens are compelled to approach legislators and ministers…

    You Missed

    18/02/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 18, 2026
    • 3 views
    18/02/2026 e-paper

    आमचे काही खरे नाही…

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 18, 2026
    • 6 views
    आमचे काही खरे नाही…

    मोन्सेरातांची घराणेशाही संपवणार !

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 18, 2026
    • 8 views
    मोन्सेरातांची घराणेशाही संपवणार !

    17/02/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 17, 2026
    • 9 views
    17/02/2026 e-paper

    फोंड्याचा गड भाजप राखणार ?

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 17, 2026
    • 9 views
    फोंड्याचा गड भाजप राखणार ?

    पणजीकरांनाच कॅसिनो हवेत?

    • By Gaonkaari
    • फेब्रुवारी 17, 2026
    • 7 views
    पणजीकरांनाच कॅसिनो हवेत?