रितेश विरुद्ध केतन !

फोंड्यात रंगणार थरारक लढत

गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी)

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भाजपने अखेर फोंड्याचे नगरसेवक व माजी मंत्री स्व. रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांना फोंडा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. काँग्रेसतर्फे डॉ. केतन भाटीकर आणि भाजपतर्फे रितेश नाईक अशी ही लढत रंगण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने सर्वप्रथम मगो पक्षातून आलेले डॉ. केतन भाटीकर यांची उमेदवारी जाहीर केली होती. २०२२ च्या निवडणुकीत ते केवळ ७७ मतांनी रवी नाईक यांच्याकडून पराभूत झाले होते. दरम्यान, आम आदमी पार्टीने गीतेश नाईक यांचा आकस्मिक प्रवेश घडवून आणत त्यांची उमेदवारी जाहीर केली. भाजपने मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रितेश नाईक यांना उमेदवारी दिली.
रितेश नाईक यांच्या उमेदवारीमुळे रवी नाईक समर्थकांत आनंद व्यक्त होत असला तरी भाजप गोटात नाराजीचे वातावरण आहे. गेली अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. विश्वनाथ दळवी हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते; मात्र भंडारी समाजाकडून आलेल्या दबावामुळे ही उमेदवारी रितेश नाईक यांना देण्यात आली, अशी माहिती मिळते.
मगोची निर्णायक भूमिका
फोंडा मतदारसंघ हा मगो पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. विशेषतः वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा या मतदारसंघावर प्रभाव आहे. २०२२ साली डॉ. केतन भाटीकर हे मगोचे उमेदवार होते आणि त्यांनी रवी नाईक यांना जोरदार टक्कर दिली होती. यावेळी ढवळीकर सरकारात मंत्री असल्यामुळे ही जागा भाजपसाठी राखून ठेवावी लागली.
मगो पक्षाने प्रारंभीपासूनच रितेश नाईक यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी अट्टाहास धरला होता. त्यामुळे आता रितेश नाईक यांच्या विजयाची जबाबदारी मगो पक्षावरच राहणार आहे. भाजप–मगो युतीमुळे रितेश नाईक यांना फायदा होऊ शकतो; मात्र सरकारविरोधातील वातावरण आणि राज्यभरातील विविध कारणांमुळे सुरू असलेली सरकारची बदनामी याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • Related Posts

    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार!

    ‘गोंय राखण यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; खाणबंदी, संजीवनी साखर कारखाना, आदिवासी कल्याण निधी आणि पाणीटंचाईवरून भाजप सरकारवर हल्लाबोल. सांगे मतदारसंघात काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार! ‘गोंय राखण यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; खाणबंदी, संजीवनी साखर कारखाना, आदिवासी कल्याण निधी आणि पाणीटंचाईवरून भाजप सरकारवर हल्लाबोल

    सांगे मतदारसंघात गेल्या २६ वर्षांपासून असलेला काँग्रेसचा राजकीय दुष्काळ २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत संपुष्टात आणण्याचा निर्धार काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला. ‘गोंय राखण यात्रे’च्या २२व्या दिवशी सांगेत झालेल्या सभेत खाणबंदी, संजीवनी साखर कारखाना, आदिवासी कल्याण निधीचा कथित गैरवापर, बेरोजगारी आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यांवरून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

    You Missed

    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार!

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 14 views
    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार!

    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार! ‘गोंय राखण यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; खाणबंदी, संजीवनी साखर कारखाना, आदिवासी कल्याण निधी आणि पाणीटंचाईवरून भाजप सरकारवर हल्लाबोल

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 20 views
    सांगेत काँग्रेसचा २६ वर्षांचा राजकीय दुष्काळ संपविण्याचा निर्धार! ‘गोंय राखण यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; खाणबंदी, संजीवनी साखर कारखाना, आदिवासी कल्याण निधी आणि पाणीटंचाईवरून भाजप सरकारवर हल्लाबोल

    शिरोड्यात हिमालयन समर्पण ध्यानस्थळी शारदीय नवरात्र अनुष्ठान

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 13 views
    शिरोड्यात हिमालयन समर्पण ध्यानस्थळी शारदीय नवरात्र अनुष्ठान

    15/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 24 views
    15/10/2026 e-paper

    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 28 views
    राज्यावर ३८ हजार कोटींचे कर्ज

    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 15, 2026
    • 26 views
    जमीन, घरांची मालकी सत्तरीत पेटणार