संकल्प आमोणकर बनले बारावे मंत्री

आज नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर शपथविधी
………………………………………………………………………..
गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी)
आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे तीन महिने शिल्लक असताना मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांची अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली. नरकचतुर्दशीच्या मुहूर्तावर आज त्यांचा मंत्रिपदाचा शपथविधी पार पडला. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी कृषिमंत्री रवी नाईक यांचे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाल्यानंतर मंत्रिमंडळातील एक पद वर्षभराहून अधिक काळ रिक्त होते. या रिक्त जागेवर कुणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. महिला आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. मात्र, अखेर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी संकल्प आमोणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

संकल्प आमोणकर यांच्या समावेशामुळे सावंत सरकारचे बारा सदस्यीय मंत्रिमंडळ पूर्ण झाले आहे. मुरगाव तालुक्यातून मॉविन गुदिन्हो यांच्यानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळविणारे आमोणकर हे दुसरे मंत्री ठरले आहेत.

काँग्रेसमधून आलेल्यांपैकी तिसरे मंत्री

१४ सप्टेंबर २०२२ रोजी काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापैकी मंत्रिपदाची संधी मिळालेले संकल्प आमोणकर हे तिसरे आमदार ठरले आहेत. सर्वप्रथम १९ नोव्हेंबर २०२३ रोजी नीलेश काब्राल यांच्या राजीनाम्यानंतर आलेक्स सिक्वेरा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये सिक्वेरा यांच्या राजीनाम्यानंतर झालेल्या फेरबदलात दिगंबर कामत यांना मंत्रिपद मिळाले. आता संकल्प आमोणकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

मूळ भाजपमधील केवळ तीन मंत्री

सावंत सरकारच्या सध्याच्या बारा सदस्यीय मंत्रिमंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाजपमधूनच राजकीय कारकीर्द सुरू केलेल्या नेत्यांपैकी केवळ तीन जणांचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई आणि आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर हे ते दोन मंत्री आहेत. उर्वरित नऊ मंत्री हे पूर्वी अन्य राजकीय पक्षांशी संबंधित राहिलेले आहेत.
इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात स्थान मिळत असल्यामुळे पक्षातील मूळ कार्यकर्ते आणि काही नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

निवडणुकीच्या तोंडावर राजकीय गणिते

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संकल्प आमोणकर यांचा मंत्रिमंडळात समावेश महत्त्वाचा मानला जात आहे. मुरगाव तालुक्यात आधीच मॉविन गुदिन्हो मंत्री असताना आता आमोणकर यांनाही संधी देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मुरगाव तालुक्याला मंत्रिमंडळात दुहेरी प्रतिनिधित्व दिले आहे.

वर्षभराहून अधिक काळ रिक्त ठेवलेले मंत्रिपद निवडणुकीला अवघे तीन महिने शिल्लक असताना भरण्याच्या निर्णयामागील राजकीय गणितांबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

  • Related Posts

    मध्यरात्री १२ ते पहाटे ६ पर्यंत ध्वनिक्षेपकांवर संगीताला बंदी; उच्च न्यायालयाचा कडक आदेश. ध्वनिप्रदूषण रोखण्याची जबाबदारी दोन्ही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांवर; नियमभंग करणाऱ्यांची नावे थेट न्यायालयाला कळविण्याचे निर्देश

    गोवा खंडपीठाने ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ८ नोव्हेंबरच्या पहाटे ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांवर संगीत वाजविण्यास बंदी घातली आहे. ध्वनिप्रदूषण रोखण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांवर असून, नियमभंग करणाऱ्यांची नावे थेट न्यायालयाला कळविण्याचे निर्देश दिले आहेत.

    Tuem Citizens Vow Legal Battle Against ₹140-Crore Convention Centre; Accuse Government of Ignoring Gram Sabha Mandate

    Fresh tender offering 60-year concession sparks opposition; Tuem Nagrik Samiti warns investors of legal challenges and democratic protests

    You Missed

    07/11/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 7, 2026
    • 11 views
    07/11/2026 e-paper

    संकल्प आमोणकर बनले बारावे मंत्री

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 7, 2026
    • 20 views
    संकल्प आमोणकर बनले बारावे मंत्री

    मंत्रिपदाची माळ की राजकीय डाव?

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 7, 2026
    • 21 views
    मंत्रिपदाची माळ की राजकीय डाव?

    मध्यरात्री १२ ते पहाटे ६ पर्यंत ध्वनिक्षेपकांवर संगीताला बंदी; उच्च न्यायालयाचा कडक आदेश. ध्वनिप्रदूषण रोखण्याची जबाबदारी दोन्ही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांवर; नियमभंग करणाऱ्यांची नावे थेट न्यायालयाला कळविण्याचे निर्देश

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 7, 2026
    • 21 views
    मध्यरात्री १२ ते पहाटे ६ पर्यंत ध्वनिक्षेपकांवर संगीताला बंदी; उच्च न्यायालयाचा कडक आदेश. ध्वनिप्रदूषण रोखण्याची जबाबदारी दोन्ही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांवर; नियमभंग करणाऱ्यांची नावे थेट न्यायालयाला कळविण्याचे निर्देश

    Tuem Citizens Vow Legal Battle Against ₹140-Crore Convention Centre; Accuse Government of Ignoring Gram Sabha Mandate

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 7, 2026
    • 15 views
    Tuem Citizens Vow Legal Battle Against ₹140-Crore Convention Centre; Accuse Government of Ignoring Gram Sabha Mandate

    निवडणुकीच्या तोंडावर ‘माझे घर’चे बिगुल!

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 6, 2026
    • 13 views
    निवडणुकीच्या तोंडावर ‘माझे घर’चे बिगुल!