टॅक्सीकारांच्या उद्रेकाचा ज्वालामुखी

जीएमआरच्या सतावणुकीविरोधात संयमाचा कडेलोट

गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी)

जीएमआर कंपनीकडून टॅक्सीच्या पार्किंग शुल्कात पुन्हा एकदा जाचक वाढ केल्याच्या निषेधार्थ पेडणेतील स्थानिक टॅक्सी व्यवसायिकांनी आज थेट मोपा विमानतळावरील जीएमआरच्या कार्यालयावर धडक दिली. “पार्किंग शुल्क रद्द होईपर्यंत तिथून हटणार नाही,” असा निर्धार आंदोलकांनी केल्यामुळे विमानतळ प्रशासन आणि पोलिसांची बरीच भंबेरी उडाली.
पेडणेतील स्थानिक टॅक्सीवाल्यांच्या विषयावरून जीएमआर कंपनी वेळोवेळी कुरघोड्या करत असल्यामुळे आता टॅक्सीवाल्यांचा संयम संपला आहे. आपल्या बायका-मुलांसह त्यांनी थेट मोपा विमानतळावर धडक दिल्यामुळे वातावरण तापले. यापुढे कुठलीही शुल्कवाढ करताना टॅक्सीवाल्यांना विश्वासात घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आले होते. मात्र, त्याचा आदर जीएमआर कंपनीकडून न केल्यामुळे स्थानिक खवळले आहेत. मोपा विमानतळासाठी स्थानिकांच्या जमिनी घेतल्या गेल्या. अनेक आश्वासने दिली गेली, परंतु त्यापैकी एकाही आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे स्थानिकांचा भ्रमनिरास झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा निर्णय
या आंदोलनाला गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई, आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब, दीपक कळंगुटकर, अॅड. अमित सावंत, अजल खोलकर, टॅक्सी संघटनेचे नेते योगेश गोवेकर, आपचे चेतन कामत तसेच रामा वारंग, निखिल महाले आणि अन्य स्थानिक टॅक्सी व्यवसायिक उपस्थित होते. जीएमआरच्या प्रतिनिधींशी चर्चा करून ही शुल्कवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य न झाल्यामुळे अखेर एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
महिलांचा रौद्रावतार
टॅक्सी व्यवसायिकांच्या कुटुंबियांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. “स्थानिकांना आमिषे दाखवून त्यांच्या जमिनी घेतल्या आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडले,” असा आरोप त्यांनी केला. टॅक्सी व्यवसायिक तसेच विमानतळावर नोकरी करणाऱ्यांची सतत सतावणूक सुरू आहे. “हा अन्याय किती काळ सहन करणार? जेव्हा जगणेच कठीण झाले आहे, तेव्हा निकराची लढाई लढणे भाग आहे,” अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.

  • Related Posts

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    आता न्याय मागणार कुणाकडे; पीडीतांचा सवाल गांवकारी,दि.२७ (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात झालेल्या मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. लेखी परीक्षेत उच्च गुण मिळवूनही…

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    जांबावली – श्री रामनाथ दामोदर संस्थानतर्फे १११ व्या पिंडीकोत्सवा निमीत्त बुधवार २५ मार्च २०२६ रोजी आयोजित कुशावती नदी आरती सोहळ्यास गोवा तसेच कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून आलेल्या भक्तांची भव्य उपस्थिती लाभली.…

    You Missed

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 13 views
    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    ही नेमकी काय भानगड ?

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 19 views
    ही नेमकी काय भानगड ?

    27/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 20 views
    27/03/2026 e-paper

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 17 views
    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    26/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 22 views
    26/03/2026 e-paper

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 23 views
    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण