टीसीपीच्या ३९ (ए) अंतर्गत पेडणेत २१ प्रस्ताव मंजूर

नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांचे लेखी उत्तर


गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी)

नगर नियोजन खात्याच्या कलम ३९ (ए) अंतर्गत एकूण २१ प्रस्ताव झोन बदलासाठी मंजूर केल्याची माहिती नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. या प्रस्तावांबाबत ८१ हरकती सादर झाल्या होत्या. तसेच हे सर्व प्रस्ताव नगर नियोजन खात्याच्या प्रादेशिक आराखडा किंवा बाह्य विकास आराखडा नियम–२०२४ अंतर्गत मंजूर केल्याचेही या उत्तरात नमूद केले आहे.
मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी यासंबंधी प्रश्न नगर नियोजन खात्याला विचारला होता. मात्र हा प्रश्न सभागृहात चर्चेला येऊ शकला नाही. या प्रश्नासंबंधीची लेखी माहिती सभागृहात देण्यात आली. या प्रस्तावांबाबत सादर झालेल्या हरकतींची माहिती गांवनिहाय उपलब्ध नाही, असेही या उत्तरात म्हटले आहे.
सर्वाधिक मोरजीत झोन बदल
विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक झोन बदलाची प्रकरणे मोरजी गावात झाली आहेत. तिथे एकूण ८ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यानंतर कोरगांव–५, मांद्रे–३, पार्से–२, तसेच वझरी, धारगळ आणि पेडणेत प्रत्येकी एक प्रस्ताव मंजूर झाला आहे.
२०२२ पासून झोन बदलाची २१ प्रकरणे मंजूर होऊन एकूण २,३६,३६६ चौ. मी. जमिनीचे सेटलमेंट झोनमध्ये रूपांतर झाल्याची माहिती विधानसभेतील उत्तरात देण्यात आली आहे.

  • Related Posts

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    आता न्याय मागणार कुणाकडे; पीडीतांचा सवाल गांवकारी,दि.२७ (प्रतिनिधी)- मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात झालेल्या मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) भरती प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. लेखी परीक्षेत उच्च गुण मिळवूनही…

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    जांबावली – श्री रामनाथ दामोदर संस्थानतर्फे १११ व्या पिंडीकोत्सवा निमीत्त बुधवार २५ मार्च २०२६ रोजी आयोजित कुशावती नदी आरती सोहळ्यास गोवा तसेच कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून आलेल्या भक्तांची भव्य उपस्थिती लाभली.…

    You Missed

    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 13 views
    न्यायालयाच्या एमटीएस भरतीवर प्रश्नचिन्ह

    ही नेमकी काय भानगड ?

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 19 views
    ही नेमकी काय भानगड ?

    27/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 27, 2026
    • 20 views
    27/03/2026 e-paper

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 17 views
    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    26/03/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 22 views
    26/03/2026 e-paper

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    • By Gaonkaari
    • मार्च 26, 2026
    • 23 views
    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण