येवकार, नितीन नबीनजी !

नितीन नबीन हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने त्यांच्या दृष्टीने सत्तेबरोबरच पक्षाची प्रतिमा आणि विचारधारा ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत ते गोवा भाजपचे शुद्धीकरण करण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गोवा प्रदेश भाजप पक्ष नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. ४५ वर्षीय नितीन नबीन हे भाजपचे पहिले युवा अध्यक्ष ठरले आहेत. गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची गणना युवा नेतृत्वात होत असल्याने नितीन नबीन यांची नियुक्ती आणि गोव्यातील आगमन हे विशेष ठरणार आहे. संघाचे संस्कार आणि पक्षसंघटनेतील त्यांचे कार्य ही त्यांच्या नियुक्तीची पोचपावती ठरली आहे.
गोवा भाजपात आयात केलेल्या भ्रष्ट नेत्यांमुळे त्याचा संसर्ग इथल्या सरकारला आणि पक्ष संघटनेलाही होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अशा वेळी नितीन नबीन हे गोवा भाजपला या संसर्गातून कसे बाहेर काढतात किंवा कुठली ‘लस’ शोधून काढतात, याची उत्सुकता पक्षाच्या अनेक निष्ठावंतांना लागून राहिली आहे.
भाजपने आपल्या संघटनात्मक धोरणात मोठे पाऊल उचलत बिहारमधील पाच वेळा आमदार नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. २० जानेवारी २०२६ रोजी त्यांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला आणि आता गोव्यात त्यांच्या आगमनाची उत्सुकता आहे. विद्यार्थी संघटनांपासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि सातत्याने संघटनात्मक कामगिरीतून पक्षात आपले स्थान मजबूत केले. बिहारमध्ये भाजपचा विस्तार करण्यासाठी त्यांनी युवक कार्यकर्त्यांना संघटित केले, पक्षाच्या युवा मोर्चात सक्रिय राहून तरुणांना राजकारणात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले आणि स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना जोडून पक्षाची ताकद वाढवली.
नितीन नबीन यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी आंदोलनांतून केली. त्यांच्या भाषणशैली आणि थेट संवादामुळे ते तरुणांमध्ये लोकप्रिय झाले. रोजगार, शिक्षण आणि सामाजिक न्याय यांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. युवा कार्यकर्ते म्हणून केलेल्या या योगदानामुळेच त्यांना पक्षात राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली.
भाजपने युवा नेतृत्वावर विश्वास दाखवत नितीन नबीन यांना राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की पक्षाच्या संघटनात्मक बाबींमध्ये नितीन नबीन हेच “बॉस” असतील. केंद्र सरकारने त्यांना झेड-श्रेणी सुरक्षा दिली आहे, ज्यातून त्यांच्या पदाचे महत्त्व अधोरेखित होते. पक्षाच्या नव्या अध्यक्षांचा दौरा हा संघटनात्मक एकात्मतेचा आणि नव्या धोरणांचा प्रारंभ मानला जात आहे.
गोवा हा भाजपसाठी महत्त्वाचा गढ आहे. नितीन नबीन यांच्या आगमनामुळे स्थानिक संघटनाला चालना मिळेल आणि कार्यकर्त्यांना नव्या उत्साहाने काम करण्याची प्रेरणा मिळेल. हा दौरा केवळ औपचारिक नसून, संघटनात्मक उर्जेला चालना देणारा आणि पक्षाच्या नव्या अध्यायाची सुरुवात करणारा ठरणार आहे.
भाजपचे संघटन खूप ताकदवान आहे. प्रत्येक राज्यातील घटना, शासन तसेच बारीक सारीक घडामोडींवर त्यांची नजर असते. गोव्याच्या बाबतीत इत्यंभूत माहिती भाजप संघटनेला असणार यात तिळमात्र शंका नाही. भाजपात आयात केलेले नेते, निष्ठावंतांची नाराजी, सरकार आणि प्रशासकीय पातळीवरील भ्रष्टाचार या सर्व बाबतीत संघटनेचा अहवाल नितीन नबीन यांच्या हाती पडणार आहे. केवळ सत्ता टिकवून ठेवण्यासाठी पक्षाला ही तडजोड करावी लागत आहे, हे जरी खरे असले तरी यापुढे पक्षाची प्रतिमा सांभाळण्याचे आव्हानही पक्षासमोर उभे राहणार आहे.
नितीन नबीन हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने त्यांच्या दृष्टीने सत्तेबरोबरच पक्षाची प्रतिमा आणि विचारधारा ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत ते गोवा भाजपचे शुद्धीकरण करण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलतात, हे पाहणेच महत्त्वाचे ठरणार आहे.

  • Related Posts

    आगीशी खेळ नको…

    नेपाळचा इतिहास गोव्याला इशारा देतो, जनतेच्या भावना दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्या, तर असंतोष आंदोलनात रूपांतरित होतो. नेपाळमध्ये “जनआंदोलन” एका दिवसात उभे राहिले नाही. अनेक वर्षे लोकांच्या मनात साचलेला असंतोष, अन्यायाची भावना,…

    ‘उजो’ मालवायला देऊ नका !

    अजूनही वेळ गेलेली नाही. पक्ष नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून संघटना, विचार आणि गोव्याच्या भवितव्याला प्राधान्य द्यावे लागेल. गोव्यातील राजकारणात प्रादेशिक अस्मिता, भूमिपुत्रांचा आवाज आणि नीज…

    You Missed

    National Steel Giants Tighten Grip Over Goa’s Mining Sector; ‘Swayampurna Goa’ Narrative Faces Questions

    National Steel Giants Tighten Grip Over Goa’s Mining Sector; ‘Swayampurna Goa’ Narrative Faces Questions

    TCP Withdraws Technical Clearance for Tarun Tahilani Project Following Complaints, Supreme Court Undertaking

    TCP Withdraws Technical Clearance for Tarun Tahilani Project Following Complaints, Supreme Court Undertaking

    13/05/2026 e-paper

    13/05/2026 e-paper

    बिट्स पिलानीत मृत्यूंची मालिका

    बिट्स पिलानीत मृत्यूंची मालिका

    आगीशी खेळ नको…

    आगीशी खेळ नको…

    12/05/2026 e-paper

    12/05/2026 e-paper