डंपला हात लावाल तर पस्तावाल

सुर्लाकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी)

साखळी मतदारसंघातील सुर्ला गावाच्या माथ्यावरील सुमारे ३५ वर्षे जुन्या खनिज डंपच्या हाताळणीस मेसर्स व्ही. एम. साळगांवकर कंपनीला गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता दिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. “डंपला हात लावाल तर पस्तावाल,” असा थेट इशारा सुर्लावासीयांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन दशकांत या डंपवर नैसर्गिक जंगल उभे राहिले असून वन्यजीवांचाही अधिवास निर्माण झाला आहे. डंप हटविला जाणार नाही, या तत्कालीन हमीनंतरच येथे खनिज टाकण्यास स्थानिकांनी मान्यता दिली होती. मात्र आता डंपमधील खनिजाला मोठे आर्थिक मूल्य प्राप्त झाल्याने त्याच्या हाताळणीच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या खनिजाची किंमत सुमारे साडेचार हजार कोटी रुपये असल्याचा स्थानिकांचा दावा आहे.

डंप हाताळणीचा निर्णय घेताना ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतीला विश्वासात घेण्यात आले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. एका बाजूला खनिज मातीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जात असताना दुसऱ्या बाजूला गावाच्या माथ्यावरील डंप पुन्हा हाताळण्याचा प्रयत्न हा विरोधाभास असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

खनिज वाहतूकदारांना पुढे करून रोजगाराच्या नावाखाली डंप हाताळणीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. “आम्ही आजवर मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी राहिलो; मात्र गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यास आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल,” असा इशारा देत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तातडीने हस्तक्षेप करून डंप हाताळणी थांबवावी, अशी मागणी सुर्लावासीयांनी केली आहे.

  • Related Posts

    एसटी राजकीय आरक्षणासंबंधी उद्या सांगेत महत्त्वपूर्ण बैठक

    गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) गोवा विधानसभा निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या, रविवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सांगे…

    ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ३० कोटींचा खर्च

    ८६ देशांतील १५४ चित्रपटांचे प्रदर्शन ————————————————— गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी) : गोव्यात होणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) राज्य सरकार सज्ज झाले असून, यंदाचा महोत्सव ‘स्टोरीज विदाऊट बॉर्डर्स’…

    You Missed

    Panjim Gymkhana Land Misuse Row: Collector Seeks Urgent Inquiry Report After Repeated Delays

    Panjim Gymkhana Land Misuse Row: Collector Seeks Urgent Inquiry Report After Repeated Delays

    मराठीचा अभिमान भाषणापुरता नको, व्यवहारातही दिसावा : डॉ. घनश्याम बोरकर

    मराठीचा अभिमान भाषणापुरता नको, व्यवहारातही दिसावा : डॉ. घनश्याम बोरकर

    नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोव्याच्या समृद्ध वारशाचे दर्शन

    नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोव्याच्या समृद्ध वारशाचे दर्शन

    14/11/2026 e-paper

    14/11/2026 e-paper

    एसटी राजकीय आरक्षणासंबंधी उद्या सांगेत महत्त्वपूर्ण बैठक

    एसटी राजकीय आरक्षणासंबंधी उद्या सांगेत महत्त्वपूर्ण बैठक

    केळशीमधील वाळूच्या टेकड्यांच्या नाशप्रकरणी फौजदारी कारवाई करा : खासदार विरियातो फर्नांडिस

    केळशीमधील वाळूच्या टेकड्यांच्या नाशप्रकरणी फौजदारी कारवाई करा : खासदार विरियातो फर्नांडिस