नवसाचा ‘नेकलेस’!

वास्तविक देवासमोर भेटीचे निर्बंध लावण्यापेक्षा भक्तानेच आपल्या वर्तणुकीला लगाम लावणे संयुक्तिक ठरेल, असे या दोन्ही घटनांतून अधोरेखित करावे लागेल.

म्हापशाचा श्री बोडगेश्वर म्हणजे आम्हा सर्वांचा राखणदार. या राखणदाराची महती सर्वत्र पसरली आहे. प्रचंड आत्मिक आणि भावनिक ताकद देणारी ही देवता संकटकाळात आधार ठरते. श्री बोडगेश्वराचा धावा केला की संकट दूर होते किंवा किमान ते सहन करण्याची ताकद मिळते. कुणी कितीही याला थोतांड किंवा अंधश्रद्धा म्हणो, ही भक्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे, हे दरवर्षीच्या जत्रोत्सवातील प्रतिसादातून स्पष्ट होते.
श्री देव बोडगेश्वराच्या चरणी सर्वांना प्रवेश आहे. मात्र यंदाच्या जत्रोत्सवात दोन घटना विशेष गाजल्या. कुख्यात गुंड जेनिटो कार्दोझ याचे व्हीआयपी स्वागत आणि सार्वजनिक बांधकाम खात्यात सेवावाढ मिळाल्यानंतर महिला कर्मचाऱ्याने देवाला दिलेली नेकलेस भेट. या दोन्ही घटनांनी प्रश्न निर्माण केला की देवासमोर निर्बंध घालण्यापेक्षा भक्तांनीच आपल्या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
गोव्याचे आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर याला टोळीकडून झालेली बेदम मारहाण सर्वांनी व्हिडिओतून पाहिली. या घटनेमुळे संपूर्ण गोवा हादरला. याच गुन्ह्याखाली जेनिटो कार्दोझला अटक झाली होती. बराच काळ तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला. अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला जेनिटो कुख्यात गुंडांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. अशा व्यक्तीचे मंदिरात जंगी स्वागत होणे आणि त्याला विशेष देवाच्या चरणी स्थान देऊन त्याच्यावतीने गाऱ्हाणे घालणे अनेकांना खटकले.
याच वेळी रश्मी मयेकर, सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंतेपदी सेवानिवृत्त झालेल्या, यांनी श्री बोडगेश्वराकडे नवस केला होता. सेवावाढ मंजूर झाल्यास देवाला भेट देईन. त्यांची सेवावाढ मंजूर झाली आणि त्यांनी नवस फेडण्यासाठी श्रींच्या चरणी नेकलेस अर्पण केला. भाजपच्या उत्तर गोव्यातील एका बड्या पदाधिकाऱ्यांच्या त्या भगिनी असल्याने सेवावाढ मिळणे सहज शक्य होते. तरीही या सेवावाढीमुळे एखाद्या अधिकाऱ्याची बढती रोखली गेली असेल, तर त्याने आता श्री बोडगेश्वराचा धावा करून आपल्यावरील अन्याय दूर करण्याची प्रार्थना करावी लागेल.
या नवसफेडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यासोबत रश्मी मयेकर यांच्या सेवावाढीचा प्रस्तावही चर्चेत आला. रश्मी मयेकर या डिचोलीत वास्तव करतात. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी त्यांना सेवावाढ देण्याची शिफारस सार्वजनिक बांधकाम खात्याकडे केली होती. मुख्य सचिवांनी ही शिफारस फेटाळली होती, कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या निर्देशांनुसार ती स्वीकारता येणार नव्हती. मात्र डॉ. शेटये यांनी नव्याने शिफारस केल्यानंतर प्रधान मुख्य अभियंत्यांनी कंत्राटी पद्धतीवर सेवावाढ देण्याचा शेरा मारला. मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनीही मंजुरी दिली. भक्तीच्या भावनेतून रश्मी मयेकर यांनी हे यश देवाच्या कृपेचे फल मानले आणि नवस फेडला.
त्यांनी सांगितले – “आपण निवृत्त झालो खरे, पण आणखी काम करण्याची इच्छा होती म्हणून विनंतीपत्र दिले. शेवटी देवाने ते यशस्वी केले, म्हणून हा नवस फेडला.”
आता गोंयकारांनी श्री बोडगेश्वराला साष्टांग नमस्कार करून या गोव्याचा सांभाळ करण्याची प्रार्थना करावी लागेल. हा राखणदार आम्हा गोंयकारांचा नवस पूर्ण करेल काय, हा प्रश्न मात्र अद्याप उभा आहे.

  • Related Posts

    कारापूरचा आवाज दाबणार किती?

    लोकांचा आवाज ऐकला नाही तर असंतोष वाढतो. सरकारने तो टप्पा येऊ देऊ नये. संघर्ष दडपण्यापेक्षा त्यामागची कारणे दूर करणे, हाच लोकशाहीचा खरा मार्ग आहे. एखादी रिअल इस्टेट कंपनी राजकीयदृष्ट्या प्रभावशाली…

    गोव्याची आर्थिक प्रगती की अधोगती?

    गोवा खरोखर स्वयंपूर्ण होत असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे. पण त्याचा पुरावा जाहिरातींमध्ये नव्हे, तर गोमंतकीयांच्या घरातील अर्थकारणात दिसायला हवा. दरडोई उत्पन्न, आत्मनिर्भरता, अंत्योदय आणि ‘स्वयंपूर्ण गोवा’, गेल्या काही…

    You Missed

    SIR Citizens’ Monitor Calls ECI Response an ‘Eye-Wash’, Demands Reopening or Scrapping of SIR in Goa

    SIR Citizens’ Monitor Calls ECI Response an ‘Eye-Wash’, Demands Reopening or Scrapping of SIR in Goa

    शेर्लेकरांच्या व्हिडिओची तक्रार अयोध्येत

    शेर्लेकरांच्या व्हिडिओची तक्रार अयोध्येत

    26/09/2026 e-paper

    26/09/2026 e-paper

    कारापूरचा आवाज दाबणार किती?

    कारापूरचा आवाज दाबणार किती?

    राणे दांपत्याला धक्का

    राणे दांपत्याला धक्का

    Fresh Setback for Karapur Project as Court Keeps Title Dispute Alive

    Fresh Setback for Karapur Project as Court Keeps Title Dispute Alive