
नाईक कुलभूषण दामू भाजपाध्यक्ष नूतन
अपेक्षित आता सच्चा भाजपाईंना चैतन्यमय परिवर्तन||धृ||
गत कैक वर्षात भाजपाला आली केवळ असह्य सूज
स्वार्थास्तव पक्षात आलेल्यांचा पदोपदी जाणवतो माज
संघ,तत्व अन् विचारनिष्ठांना वाटते प्रचंड लाज
अश्रू ओघळती त्यांच्या नयनी बदलेला पक्ष पाहून ||१||
प्रचंड प्रतिकुल परीस्थितीतून वर आलेला दमदार नेता
तेणेच तुझ्यावर साऱ्यांच्या एकवटल्या नजरा आता
संघ अपत्य कमल दलाचा ठरावा तूच त्राता
देव दुर्लभ कार्यकर्ते आता आशा बाळगती तुजकडून ||२||
लेखक, नाटककार, चित्रपट निर्माता, संवेदनशील मनाचा कवी
प्रखर राष्ट्र,धर्म प्रितीसवे तुझी साईभक्ती काय वर्णावी
साई मंदिर ही निर्माण केलेस तसेच साईचरित्र आवृत्ती कोंकणीत यावी
तळमळ,धडपडीने तुझ्या ते ही स्वप्न गेले सहज साकार होऊन ||३||
बाणेदार, दमदार, दिलदार, साधा भोळा, सरळमार्गी, निष्कपट
भगवंताने त्यामुळेच तुझ्यावर कृपा केली आज अफाट
हितशत्रुंचे साऱ्या दुष्ट मनसुबे होऊन सारे भुईसपाट
ताठ मानेने तू आज अध्यक्षपदी झाला विराजमान ||४||
तव नव नेतृत्वाखाली भाजपाने घ्यावी आता गगनभरारी
परमत्यागी कार्यकर्त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावी सारी
सच्च्या गोमंतकीयांचा अभिनंदन वर्षाव तुझ्यावरी
शुभेच्छा बळावर निश्चित त्यांच्या शुभशकुनी अध्यक्ष ठरावा सर्वांहून ||५||
(सौजन्य-ऑलराऊंडर)
– संगम गोविंद भौंसुले