पणजी मनपासाठी चुरस


गांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी)

राज्यातील एकमेव पणजी महानगरपालिकेसाठी आज मतदान होत आहे. संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ६२.२४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. भाजप पुरस्कृत आणि महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात समर्थित पॅनलविरोधात उत्पल पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आमी पणजेकार या दोन गटांत चुरस लागली आहे. पणजीकरांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे नेमका कौल कुणाच्या पदरात पडणार याची उत्सुकता राजकीय विश्लेषकांना लागून राहिली आहे. या निवडणुकीत मोन्सेरात कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पणजी मनपाच्या ३० प्रभागांसाठी एकूण ६९ उमेदवार रिंगणात आहेत. २३ प्रभागांत दुहेरी, ६ प्रभागांत तिहेरी तर प्रभाग क्रमांक २६ मध्ये सर्वाधिक ५ उमेदवार आहेत. ताळगांव विधानसभा मतदारसंघातील १ ते ९ आणि पणजी मतदारसंघातील १० ते ३० प्रभाग मनपाच्या कार्यक्षेत्रात येतात. यापैकी २८ ते ३० हे तीन प्रभाग रायबंदर येथील असून २०१२ पासून हे प्रभाग सांताक्रुझ मतदारसंघातून पणजी मतदारसंघात समाविष्ट करण्यात आले आहेत.
एकूण ३२,४९६ मतदार या निवडणुकीत मतदान करणार असून १५,२२५ पुरुष मतदारांच्या तुलनेत १७,२७१ महिला मतदारांचा म्हणजेच २,०४६ महिलांचा अतिरीक्त समावेश आहे. महिलांचे मतदान मनपासाठी निर्णायक ठरणार आहे.
मोन्सेरात कुटुंबाची प्रतिष्ठा
पणजी आणि ताळगांव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व बाबुश मोन्सेरात आणि त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात करत आहेत, तर मागील पाच वर्षे त्यांचा पुत्र रोहीत मोन्सेरात हे मनपाचे महापौरपद सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत मनपाचा कौल हा त्यांच्या कामाची पावती ठरणार आहे.
२०२१ च्या मनपा निवडणुकीत १०६ उमेदवार रिंगणात होते आणि भाजप समर्थक गटाला २५ जागा मिळाल्या होत्या. यावेळी फक्त ६९ उमेदवार रिंगणात असून उत्पल पर्रीकर यांनी उघडपणे मोन्सेरात यांना आव्हान देत आपल्या उमेदवारांचा प्रचार केला आहे.
बाबुश मोन्सेरात यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात पणजी दुर्लक्षित राहिली, असे विधान केले होते. तर रोहीत मोन्सेरात यांनी उत्पल पर्रीकर यांच्याकडे वडिलांचे कोणतेही गुण नाहीत, असा टोला हाणला. महापौर रोहीत मोन्सेरात यांनी मात्र आपल्या वडिलांचे सर्व गुण स्वतःकडे असल्याचे सांगून, निवडणूक निकाल सगळे काही स्पष्ट करेल, असे मत व्यक्त केले.
१३ मार्च रोजी सकाळी दोनापावला येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये मतमोजणी होणार आहे.

  • Related Posts

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    South Goa MP Capt. Viriato Fernandes on Monday strongly raised the issue of families who surrendered their land for railway projects, demanding that Konkan Railway give them priority in manpower recruitment as well as allotment of shops at railway stations.

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    खासगी बस वाहतूकदारांची सरकारला नोटीसगांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्यातील खासगी बस व्यावसायिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या सात दिवसांत सोडवाव्यात; अन्यथा गोव्यात येणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना…

    You Missed

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    कारापूरवासीयांची सुटका करा

    कारापूरवासीयांची सुटका करा

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार