पॅराग्लायडिंगचे हप्ते कुणाला ?

पर्यटन, पोलिस संशयाच्या घेऱ्यात

पेडणे, दि. २० (प्रतिनिधी)

पेडणे केरी-तेरेखोल पंचायत क्षेत्रात समुद्रकिनारी पॅराग्लायडिंगचा आनंद लुटणाऱ्या पर्यटक युवतीसह पॅराग्लायडिंग ऑपरेटरचा पडून मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणामागील अनेक भानगडींचा उलगडा होऊ लागला आहे. पर्यटन खात्याने परवाना न दिलेला हा व्यवसाय नेमका कुणाच्या आशीर्वादाने सुरू होता आणि त्याचे हप्ते नेमके कुणाला जातात, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
या अपघातात पुणे येथील पर्यटक शिवानी दाभाळे (वय २६ वर्षे) आणि पॅराग्लायडिंगचा ऑपरेटर सुमन नेपाळी (वय २५) या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पॅराग्लायडिंग करत असताना अचानक पॅराग्लायडिंगची एक दोरी तुटल्यानंतर थेट ते डोंगरावर कोसळले आणि त्यांचा अंत झाला. याबाबतचा गुन्हा मांद्रे पोलीस स्थानकात नोंदवण्यात आला आहे. ‘हायक अँड फ्लाय’ या पॅराग्लायडिंग कंपनीचे मालक शेखर रायझादा (मूळ उत्तरप्रदेश) यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंद झाला आहे.
पर्यटन खात्याने केले हात वर
या घटनेनंतर पर्यटन खात्याने हात वर केले आहे. अशा या साहसी पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक परवाना पर्यटन खात्याने दिला नाही, असे स्पष्टीकरण खात्याने केले आहे. पर्यटन खात्याने या प्रकरणी हात वर केले असले तरी गोवा किनारी सुरक्षा पोलिसांनी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी पर्यटन संचालकांना पत्र पाठवून केरी-तेरेखोल येथे बेकायदा पॅराग्लायडिंग सुरू असल्याची माहिती दिली होती. या रिपोर्टमध्ये सुमन नेपाळी हाच तिथे हा व्यवसाय करत असल्याचेही नमूद केले होते. हाच सुमन नेपाळी या घटनेत मृत्यूमुखी पडला आहे. किनारी सुरक्षा पोलिसांच्या या पत्रावर पर्यटन खात्याने काय कारवाई केली, असा सवाल आरटीआय कार्यकर्ते आत्माराम गडेकर यांनी केला आहे.
पोलिसांच्या हप्तेखोरीचे बळी
केरी-तेरेखोल येथे पॅराग्लायडिंग व्यावसायिकांकडून किनारी पोलिस सुरक्षा दल हप्ते गोळा करत असल्याच्या आरोपांवरून तत्कालीन तेरेखोल किनारी पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली होती. आता नवीन निरीक्षक आल्यानंतर पुन्हा नव्याने हप्ते सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे हप्ते वरपर्यंत पोहचवले जातात, अशी माहिती देण्यात येते.

  • Related Posts

    सावधान !

    मला आज जो विषय तुमच्याशी बोलायचा आहे, तो अतिशय गंभीर आहे. एक सायकीयॅट्रीस्ट म्हणून तो मला गंभीर वाटतोच, पण एका मुलीचा बाप म्हणून देखील गंभीर वाटतो. त्यासाठी मी तुमच्या पुढ्यात…

    चंगळवादाचे मानसशास्त्र

    (जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक चितन ! ) ‘चंगळवाद’ हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे. एक ‘चंगळ’ आणि दुसरा ‘वाद’. यातील ‘चंगळ’ शब्दाचा अर्थ आहे सुखसाधनांची रेलचेल! आणि वाद शब्दाचा…

    You Missed

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    अरे हे चाललंय काय?

    अरे हे चाललंय काय?

    08/11/2025 e-paper

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    07/11/2025 e-paper

    error: Content is protected !!