पेडणेच्या आखाड्यात डॉ. उदय कुडाळकरांची उडी

मुख्यमंत्री पुरस्कृत उमेदवार असल्याची जोरदार चर्चा

गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी)

राज्यातील एकमेव अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या पेडणे मतदारसंघात आत्तापासूनच आगामी विधानसभा निवडणुकीची चुरस सुरू झाली आहे. गोवा मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. उदय कुडाळकर यांनीही आता या राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे.
डॉ. कुडाळकर हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे खास स्नेही असल्यामुळे, त्यांनीच डॉ. कुडाळकर यांना उमेदवारीसाठी पुरस्कृत केल्याची चर्चा भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये जोरात सुरू आहे. गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी डॉ. उदय कुडाळकर यांचा वाढदिवस मित्रपरिवार आणि ग्रामस्थांतर्फे श्री शांतादुर्गा देवस्थान सभागृह, धारगळ येथे संध्याकाळी ६.३० वाजता साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने आयोजित स्नेहमेळाव्यासाठी अधिकाधिक लोकांना आमंत्रित करून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी डॉ. कुडाळकर यांच्या समर्थकांनी केली आहे. भाजपचे कार्यकर्ते दुर्गाप्रसाद खानोलकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
प्रविण–राणे दोस्तीची चर्चा
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गोव्याबाहेर असताना, पेडणे नगरपालिका इमारतीचे नगर विकासमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन पार पडले. विशेष म्हणजे, या उद्घाटनानिमित्त तयार केलेल्या बॅनर्स आणि पोस्टर्सवर कुठेही मुख्यमंत्र्यांचा फोटो नसल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर आणि विश्वजीत राणे यांच्या दोस्तीच्या चर्चेचे फड पेडणेत रंगले आहेत.
भाजपची उमेदवारी कुणाला?
पेडणे मतदारसंघातील भाजपची उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. आमदार प्रविण आर्लेकर यांचा पक्षाच्या तिकिटावर दावा असणारच. बाबू आजगांवकर हे देखील भाजपातच असल्यामुळे त्यांनीही निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली आहे. भाजपचा एक गट राजन कोरगांवकर यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी जोरदार प्रयत्नात आहे. आता डॉ. उदय कुडाळकर यांनीही या रिंगणात उडी घेतल्यामुळे भाजपच्या उमेदवारीसाठीची चुरस बरीच वाढली आहे.

  • Related Posts

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    South Goa MP Capt. Viriato Fernandes on Monday strongly raised the issue of families who surrendered their land for railway projects, demanding that Konkan Railway give them priority in manpower recruitment as well as allotment of shops at railway stations.

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    खासगी बस वाहतूकदारांची सरकारला नोटीसगांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्यातील खासगी बस व्यावसायिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या सात दिवसांत सोडवाव्यात; अन्यथा गोव्यात येणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना…

    You Missed

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    कारापूरवासीयांची सुटका करा

    कारापूरवासीयांची सुटका करा

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार