फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

मगोचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकरांचा हल्लाबोल
गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने मतदारसंघनिहाय सर्वेक्षणाच्या माध्यमातून जनमताची चाचपणी सुरू केली आहे. फोंडा मतदारसंघातील सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यात मगो पक्ष पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा मगोचे ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला.
या सर्वेक्षणादरम्यान फोंड्यात धमक्या, दबाव तसेच विविध कामांसाठी कमिशन मागितले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्याचा गंभीर दावा ढवळीकर यांनी केला. दरम्यान, डिचोलीसह एकूण १२ मतदारसंघांत मगो पक्ष सर्वेक्षण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
फोंड्यात मगोच नंबर वन
फोंड्यातील सर्वेक्षणात मगो पक्षच पहिल्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वेक्षणातून केवळ मतदारांचा राजकीय कलच नव्हे, तर स्थानिक पातळीवरील अनेक तक्रारीही समोर आल्या आहेत. विविध कामांसाठी कमिशन मागितले जात असून, अनेक प्रकरणांत धमकी आणि दबावाचे प्रकार सुरू असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. काही पक्ष कार्यकर्त्यांविषयीही अशाच तक्रारी करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
राजेंद्र केरकरांच्या वक्तव्यावर आक्षेप
म्हादईच्या प्रश्नावर पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी केलेल्या वक्तव्यावर जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी, ‘आपण त्यांना गांभीर्याने घेत नाही’, असे वक्तव्य केले. केरकरांची वक्तव्ये अनावश्यक आणि दिशाभूल करणारी असल्याची भूमिकाही शिरोडकर यांनी मांडली.
म्हादईचा प्रश्न गोव्यासाठी अत्यंत संवेदनशील असताना, म्हादईच्या संरक्षणासाठी दीर्घकाळ आवाज उठविणाऱ्या केरकरांविषयी जलस्रोत मंत्र्यांनी केलेल्या या विधानामुळे नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
विधानसभेत अनेक विधेयके
सरकारने जारी केलेल्या अध्यादेशांना विधिमंडळाची मंजुरी मिळविण्यासाठी संबंधित विधेयके विधानसभेत मांडली जाणार आहेत. वकिलांच्या संरक्षणाचा प्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत असून, सरकारने यासंदर्भात अध्यादेश जारी केला होता. आता त्याचे विधेयक विधानसभेसमोर मांडले जाणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    Complaint Accuses Goa Minister Vishwajit Rane, Deviya Rane of Fraud in Karapur Land Mutation

    A serious complaint alleging fraudulent mutation and illegal transfer of ancestral properties at Karapur has been lodged against Goa Minister Vishwajit Rane and Deviya Vishwajit Rane by Vishwasrao L. Rane, who claims to be a co-owner of the properties.

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    South Goa MP Capt. Viriato Fernandes on Monday strongly raised the issue of families who surrendered their land for railway projects, demanding that Konkan Railway give them priority in manpower recruitment as well as allotment of shops at railway stations.

    You Missed

    25/08/2026 e-paper

    25/08/2026 e-paper

    फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

    फोंड्यात धमक्या, कमिशनबाजीला ऊत

    मगोची साथ, भाजपची डोकेदुखी ?

    मगोची साथ, भाजपची डोकेदुखी ?

    Complaint Accuses Goa Minister Vishwajit Rane, Deviya Rane of Fraud in Karapur Land Mutation

    Complaint Accuses Goa Minister Vishwajit Rane, Deviya Rane of Fraud in Karapur Land Mutation

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper