राज्यातील भूरूपांतरे पेटणार…

आमदार जीत आरोलकरांचा पुढाकार

पणजी,दि.२०(प्रतिनिधी)

मांद्रे मतदारसंघातील वादग्रस्त भूरूपांतरे ताबडतोब रद्द करण्यात यावीत, असे पत्र आमदार जीत आरोलकर यांनी नगर नियोजन खात्याकडे केले आहे. मांद्रेचे माजी सरपंच तथा पंचसदस्य एड.अमित सावंत यांनीही तालुक्यातील सर्व भूरूपांतरे आणि झोनबदलासंबंधी लवकरात लवकर जनसुनावणी घेण्यात यावी, असे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे सादर केल्याने हा विषय आता पेटण्याची शक्यता आहे.
भूरूपांतरावरून तालुक्यात प्रचंड असंतोष
पेडणे तालुक्यातील किनारी भाग तथा मोपा विमानतळाजवळील क्षेत्रात सुरू असलेल्या भूरूपांतरामुळे तालुक्यात प्रचंड असंतोष पसरला आहे. सगळीकडून या लोकांचा गराडाच गावांना पडणार असून लोकांना काही वर्षांनी पळ काढावा लागेल,अशी शक्यता वर्तविण्यात येते. पैशांच्या आमिषांनी गावांतील काही लोकांना हाताशी धरून हे सगळे प्रकार सुरू असल्याने गावांगावातील वातावरण दूषीत बनू लागले आहे. या गोष्टींना आळा घातला नाही तर तालुक्याचे अस्तित्वच धोक्यात येणार असल्याने अनेक समविचारी लोकांनी आता या विषयावरून जनजागृती करण्याचे ठरवले आहे.
एड. अमित सावंत यांचा पुढाकार
पेडणे झोनिंग आराखड्याविरोधातील आंदोलनात पुढे असलेले मांद्रेचे माजी सरपंच तथा पंचसदस्य एड.अमित सावंत यांनी भूरूपांतराच्या विषयावरून पुढाकार घेतला आहे. त्यांनी पेडणेच्या दोन्ही आमदारांना आपली भूमीका जाहीर करण्याचे आवाहन केले होते. आमदार जीत आरोलकर यांनी आपली भूमीका नगर नियोजन खात्याला पत्र पाठवून जाहीर केली आहे तर पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर हे विदेश दौऱ्यावर असल्याने त्यांची भूमीका समजू शकलेली नाही.
पंचायतींत जागृती करणार
एड.अमित सावंत यांनी भूरूपांतराच्या विषयावरून तालुक्यात जनसुनावणी घेण्यात यावी,असे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केले आहे. भूरूपांतरे तथा झोन बदलाबाबत तालुक्यातील सर्व पंचायत मंडळे तथा पेडणे नगरपालिकेतील सदस्यांना एकत्र आणून तालुक्याच्या भवितव्यासाठी ठोस भूमीका घेण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांकडे भेट देऊन याबाबतीत विषय मांडणार असल्याचे एड. सावंत यांनी म्हटले आहे.

बीग डॅडीचे काम बंद
मोरजी येथे बीग डॅडी या कॅसिनो कंपनीच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केल्यानंतर आमदार जीत आरोलकर यांनीही या प्रकल्पाचा परवाना मागे घेण्याची विनंती नगर नियोजन खात्याकडे केली आहे. या प्रकल्पाचे काम सुरू असून तिथे बेकायदा बोअरवेल तथा खोल खोदाई करण्यात आली आहे. या प्रकरणी केलेल्या तक्रारीवरून जलस्त्रोत खात्याने पाहणी करून आपला अहवाल सादर केल्यानंतर पेडणेच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी या गोल्डनग्लोब हॉटेल्स प्रा.लि. या कंपनीला काम बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.

  • Related Posts

    आरजीपीचे टीसीपीसमोर ‘पिंडदान’

    विनाशकारक वृत्तीचा बिमोड करण्याचे राखणदारांना आवाहन गांवकरी, दि. १७ (प्रतिनिधी) सांतआंद्रे मतदारसंघात ठिकठिकाणी मेगा प्रकल्पांच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. तक्रारी व निवेदने सादर करूनही काहीच कारवाई केली जात नाही.…

    सीलबंद लखोट्यात किती कोटींचा हिशेब?

    दक्षता खात्याचा भू रूपांतर शुल्क चौकशी अहवाल खंडपीठाला सादर गांवकारी, दि. १६ (प्रतिनिधी) नगर नियोजन विभागाने कलम १७(२) अंतर्गत झोन बदल आणि भू रूपांतरासाठी अधिसूचित केलेल्या शुल्कापेक्षा कमी दराने शुल्क…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    17/04/2025 e-paper

    17/04/2025 e-paper

    ʻमै झुकेगा नही सालाʼ !

    ʻमै झुकेगा नही सालाʼ !

    आरजीपीचे टीसीपीसमोर ‘पिंडदान’

    आरजीपीचे टीसीपीसमोर ‘पिंडदान’

    16/04/2025 e-paper

    16/04/2025 e-paper
    error: Content is protected !!