राष्ट्रीय पक्षांकडून जमिनींची दलाली

आरजीपीचे आमदार विरेश बोरकर गरजले

पणजी,दि.५ (प्रतिनिधी)

लोकसभा निवडणूकीत इंडि आघाडीत सामील न होता आरजी पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. यावेळी इंडि आघाडीचे घटक असलेल्या काँग्रेस, आम आदमी पार्टी आदींनी आरजी पक्षावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप केला होता. आता दिल्ली विधानसभा निवडणूकीत इंडि आघाडीतून बाहेर पडून आम आदमी पार्टीने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची घोषणा करून भाजपची बी टीम असल्यावर शिक्कामोर्तब केल्याचा आरोप आमदार विरेश बोरकर यांनी केला.
राज्याला भक्कम प्रादेशिक पक्षच सांभाळू शकेल
गोव्याला भक्कम प्रादेशिक पक्षच सांभाळू शकेल. राष्ट्रीय पक्षांचा आधार घेऊन दिल्लीवाले इथल्या जमिनींची दलाली करत आहेत. सत्तेच्या आधारे इथल्या जमिनींचा व्यवहार आणि परप्रांतीयांना सोयीस्कर कायदे आणि कायदे दुरूस्ती करून त्यांना सांभाळण्याचे प्रकार सुरू आहेत. मुळ गोंयकारांचे विषय अजूनही खितपत पडले आहेत. गोंयकारांचे विषय कायमस्वरूपी सोडवण्याची ताकद या पक्षांत राहीलेली नाही आणि त्यामुळे राज्याला भक्कम प्रादेशिक पक्षाचीच गरज आहे. आरजी पक्षाची स्थापनाच यासाठी झालेली आहे. राज्याचे हीत जपतानाच देशाचे राष्ट्रीयत्व जपण्यासाठी आरजीचे क्रांतीकारी काम करत आहेत,असे विरेश बोरकर म्हणाले.
युवकांची घोर निराशा, तरिही…
राज्याला भ्रष्ट भाजप, काँग्रेस आदींच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी आपल्या नोकऱ्या, व्यवसायांना बाजूला सारून आरजीच्या क्रांतीकारकांनी जागृतीचे रण पेटवले. विधानसभा निवडणूकीत सगळी ताकद पणाला लावून पक्ष उतरला. पण शेवटी जनतेने दिलेल्या कौलात केवळ एकच आमदार विधानसभेत पोहचू शकला. राष्ट्रीय पक्षांना दिल्लीतून निधी मिळतो. इथे जमीन आणि इतर व्यवसायात गुंतलेल्या परप्रांतीय गुंतवणूकदारांकडूनही या पक्षांना फडिंग मिळते. हा निधी वापरून हे पक्ष निवडणूका लढवत असतात. आरजी पक्षाला राज्य, देश आणि विदेशातील गोमंतकीयांनी मदत केल्यामुळेच निवडणूकीतील खर्च करता येणे शक्य झाले, परंतु हा खर्च राष्ट्रीय पक्षांकडे स्पर्धा करण्यासाठी अपुरा पडला. केवळ पैशांकडे पाहुन लोक मतदान करू लागले तर गोवा सांभाळणे कठीण बनणार असल्याचे आमदार विरेश बोरकर म्हणाले.
मनोज परब पूर्ण जोमात परतणार…
आरजी पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब कुठे आहेत,असा सवाल सगळेजणच करतात. सहजिकच आहे कारण मनोज परब याने आरजीच्या माध्यमातून केलेली चळवळ लोकांना माहित आहे. पक्षाच्या रणनितीचा भाग म्हणूनच सध्या मनोज परब सक्रीय दिसत नाही. परंतु हा वाघ पुन्हा जोमाने आणि नव्या उर्जेने प्रवेश करणार आहे. आरजीचे क्रांतीकारी गोवा वाचवण्यासाठी पुन्हा जोमाने राजकीय रणांगणात उतरतील आणि आपला गोवा वाचवण्यासाठी पुन्हा एकदा जीवाची बाजी लावतील,असेही आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.

  • Related Posts

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    टीकाकारांच्या तोंडाला कायदेशीर कुलुप पणजी,दि.२१(प्रतिनिधी)- सनबर्न महोत्सवाचे आयोजक स्पेसबाऊंड वेब लॅब्स प्रा.लिमिटेड कंपनीकडून स्थानिक धारगळ पंचायतीचा ना हरकत दाखला. पर्यटन खात्याची तत्वतः मान्यता आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून सशर्त…

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    खाते विश्वजीतांकडे, सेवावाढीची मेहरनजर मुख्यमंत्र्यांची पणजी,दि.२०(प्रतिनिधी) नगर नियोजन खात्याचे मुख्य नगर नियोजक राजेश नाईक यांच्या सेवावाढीला नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांना जबाबदार धरले जाते. परंतु प्राप्त माहितीवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    21/12/2024 e-paper

    21/12/2024 e-paper

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    20/12/2024 e-paper

    20/12/2024 e-paper

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?
    error: Content is protected !!