सरकारच्या शब्दावर अविश्वास

चिंबलकरांचे उद्या महाआंदोलन

गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी)

चिंबल येथील प्रस्तावित युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ इतरत्र स्थलांतर करण्यासंबंधी पर्यटन खात्याने जारी केलेल्या पत्रकावर विश्वास ठेवता येणार नाही. सरकारने लिखित स्वरूपात आश्वासन देतानाच, याठिकाणी भविष्यात कुठलाही प्रकल्प उभारला जाणार नाही, याची हमी चिंबलकरांना हवी आहे. तूर्त चिंबलकरांचे साखळी उपोषण आंदोलन सुरूच राहणार असून, शुक्रवारी दि. ३० रोजी पणजीत महाआंदोलन होईल, अशी माहिती आंदोलनाचे नेते गोविंद शिरोडकर यांनी दिली.
बुधवारी रात्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चिंबल येथील युनिटी मॉलसंबंधी केलेल्या सर्वेक्षण अहवालावर चर्चा केली. या बैठकीवर चिंबलकरांनी बहिष्कार टाकला. बैठकीत सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पर्यटन खात्याने केवळ पत्रक जारी करून हे दोन्ही प्रकल्प स्थलांतरित करण्याची घोषणा केली. मात्र या घोषणेसंदर्भात मुख्यमंत्री किंवा पर्यटनमंत्री या दोघांपैकी कुणीही अधिकृत घोषणा केलेली नाही. वास्तविक या सर्वेक्षण अहवालासंबंधी आंदोलकांची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही एक दिवसाची मुदत मागितली होती. अहवालातील अनेक त्रुटींवर आंदोलकांची भूमिका मांडण्याचा अधिकार आम्हाला देण्यात आला नाही, असेही शिरोडकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांची भूमिका अमान्य
चिंबल येथील प्रस्तावित दोन्ही प्रकल्प इतरत्र स्थलांतर करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे चिंबलकरांनी स्वागत केले. परंतु हे करत असताना सरकारने आपलीच भूमिका योग्य असल्याचा जो अट्टाहास दाखवला आहे, तो पूर्णपणे चुकीचा असल्याची टीका शिरोडकर यांनी केली. हे दोन्ही प्रकल्प तळ्यार तळ्याच्या प्रभाव क्षेत्रात येत नाहीत, ही भूमिका अमान्य आहे, असेही त्यांनी जाहीर केले. सरकारने या जमिनीसंबंधी मांडलेली भूमिका पाहता भविष्यात इथे कधीही वेगळा प्रकल्प येण्याचा धोका कायम असल्याचे अजय खोलकर यांनी सांगितले.
महाआंदोलनाचा एल्गार
पणजीतील महाआंदोलन हे केवळ चिंबलातील आंदोलनापुरते मर्यादित नसून, राज्यभरातील वेगवेगळ्या विषयांवर सर्व जनता रस्त्यावर उतरणार आहे. दि. ३० रोजी पणजीत विराट महाआंदोलन होणार असून, हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरणार आहेत, असे चिंबलकरांनी सांगितले. या महाआंदोलनातच पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असून, महाआंदोलनात पुढील भूमिका जाहीर केली जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

  • Related Posts

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    मडगाव – “श्री गणेश पॅंडल स्कॅंडल प्रकरणापासून ते आकें रिंग रोडवरील श्री गणेश मंदिराबाहेर समाजकंटकांचा अड्डा तयार करण्यापर्यंत, पक्षबदलू आमदार व सार्वजनीक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी आता सर्व मर्यादा…

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    Panaji: A site inspection conducted by the Goa Coastal Zone Management Authority (GCZMA) in connection with Delta Pleasure Cruise Company Pvt. Ltd.’s proposal to operate a new vessel, M.V. Deltin…

    You Missed

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    Govt Urges Shift to PNG in Tiswadi & Ponda Amid LPG Supply Concerns

    Govt Urges Shift to PNG in Tiswadi & Ponda Amid LPG Supply Concerns

    Objection Filed Against Tillari Command Area Denotification in Dhargalim

    Objection Filed Against Tillari Command Area Denotification in Dhargalim

    FIR Registered in Ponda Land Grabbing CaseAllegations of Forged TCP NOCs and Illegal Sale Deeds

    FIR Registered in Ponda Land Grabbing CaseAllegations of Forged TCP NOCs and Illegal Sale Deeds

    25/03/2026 e-paper

    25/03/2026 e-paper