दिलेश तेली याला ओमानमधून सुरक्षित मायदेशी आणण्याचे प्रयत्न

खासदार विरियातो फर्नांडिस यांचे परराष्ट्रमंत्र्यांना पत्र
गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) : होर्मुझ सामुद्रधुनीत क्षेपणास्त्र हल्ल्याचा फटका बसलेल्या ‘तारा गॅस’ या एलपीजी जहाजावरील गोमंतकीय खलाशी दिलेश चंद्रकांत तेली यांना ओमानमधून सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दिलेश यांच्यासह अन्य २२ खलाशांच्या परतीसाठी आवश्यक प्रवास कागदपत्रे तयार झाल्याची माहिती मंत्री संकल्प आमोणकर यांनी दिली.

१६ व १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्यातून दिलेश तेली यांनी समुद्रात उडी मारून आपला जीव वाचवला होता. मात्र, पासपोर्ट, मोबाईल आणि वैयक्तिक कागदपत्रांशिवाय ते ओमानमध्ये अडकले आहेत.

दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांना पत्र लिहून दिलेश यांच्यासह सर्व भारतीय खलाशांना तातडीने मायदेशी आणण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना परतीच्या प्रक्रियेची नियमित माहिती देण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, मंत्री संकल्प आमोणकर यांनी दिलेश यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना सुरक्षित परत आणण्याचे आश्वासन दिले. अनिवासी भारतीय आयुक्त ॲड. नरेंद्र सावईकर यांनी केंद्र सरकार आणि ओमानमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्याचेही आमोणकर यांनी सांगितले.

  • Related Posts

    श्री रुद्रेश्वर देवस्थान समितीवर यशवंत माडकर यांच्या पॅनेलचे वर्चस्व

    सांखळी, दि. २३ (प्रतिनिधी) : हरवळे- साखळी येथील श्री रुद्रेश्वर देवस्थानच्या व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत यशवंत माडकर यांच्या पॅनेलने सातही जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. ही निवड २०२५ ते…

    एसटी राजकीय आरक्षणासंबंधी उद्या सांगेत महत्त्वपूर्ण बैठक

    गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) गोवा विधानसभा निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या, रविवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सांगे…

    You Missed

    50 Years of Mining Leave Sirigao With ₹4,000 Crore Environmental and Social Debt: Study

    50 Years of Mining Leave Sirigao With ₹4,000 Crore Environmental and Social Debt: Study

    बिसलेरीचे पाणी पिण्यास सुरक्षित; एफएसएसएआयच्या नोटिशीवर कंपनीचे स्पष्टीकरण

    बिसलेरीचे पाणी पिण्यास सुरक्षित; एफएसएसएआयच्या नोटिशीवर कंपनीचे स्पष्टीकरण

    दिलेश तेली याला ओमानमधून सुरक्षित मायदेशी आणण्याचे प्रयत्न

    दिलेश तेली याला ओमानमधून सुरक्षित मायदेशी आणण्याचे प्रयत्न

    श्री रुद्रेश्वर देवस्थान समितीवर यशवंत माडकर यांच्या पॅनेलचे वर्चस्व

    श्री रुद्रेश्वर देवस्थान समितीवर यशवंत माडकर यांच्या पॅनेलचे वर्चस्व

    अजित कामत शंखवाळकर अखेर शरण

    अजित कामत शंखवाळकर अखेर शरण

    सरकारी कार्यालये कालबाह्य?

    सरकारी कार्यालये कालबाह्य?