तीन वर्षांत गोशाळेतील २ हजार गायी दगावल्या

गोसंवर्धनावर एकूण ५२ कोटी रूपये खर्च

पणजी, दि. १७ (प्रतिनिधी)

राज्यातील विविध गोशाळेतील सुमारे २ हजार गायी गेल्या तीन वर्षांत दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारने भटक्या गुरांच्या संवर्धनार्थ विविध गोशाळांना मान्यता दिली असून, गेल्या तीन वर्षांत गोसंवर्धनावर सुमारे ५२ कोटी रुपयांचे अनुदान खर्च झाले आहे.

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी यासंबंधीचा प्रश्न पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना विचारला होता. या प्रश्नाला दिलेल्या लेखी माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. प्रूडंट मीडियाने यासंबंधीचे वृत्त प्रसारित केल्यानंतर हा विषय चर्चेत आला आहे. राज्यातील ८ गोशाळांत मिळून ५ हजार ६६८ गायी आहेत. मागील तीन वर्षांत या गोशाळांतील सुमारे २ हजार गायी दगावल्याची माहिती पुढे आली आहे. या गायींच्या मृत्यूची चिकित्सा खात्याने केली असली तरी, त्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मागील तीन वर्षांत गोशाळांतून केवळ एकच गाय बेपत्ता झाल्याची माहितीही खात्याने दिली आहे.

विशेष म्हणजे गोशाळांमध्ये एवढ्या गायी असूनही, अनेक ठिकाणी भटक्या गुरांचा प्रश्न जटिल बनत चालला आहे. भटक्या गुरांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सरकारने स्थानिक पंचायत तथा पालिकांवर सोपविली आहे. पंचायत, पालिकांनी थेट गोशाळांकडे करार करून भटकी गुरे पकडून ती थेट गोशाळेत पाठवण्याची सोय केली आहे. गोशाळांमुळे भटक्या गुरांना आधार मिळाला हे जरी खरे असले तरी, त्यांचे संवर्धन आणि सांभाळ जोपर्यंत शेतकरी करणार नाही तोपर्यंत सरकारसाठी अनुदानाच्या पोटी मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

गोशाळेचे नाव एकूण गायी दगावलेल्या गायी अनुदान
गोमंतक गौसेवक महासंघ, मये ४२४५ १४३९ ४०.२५ कोटी
ध्यान फाउंडेशन, गोवा, जांबावली ७०८ ३४८ ६.७८ कोटी
अखिल विश्व जय श्रीराम, केंद्रे ४३५ १०२ ३.२५ कोटी
लीव सीनर्जी, सावईवेरे ११ १७ २३.१५ लाख
वेलफेअर फॉर एनीमल्स, शिवोली ५० ५ ५६.२० लाख
शंकावली तिर्थक्षेत्र, सांकवाळ ७ ० ४.३८ लाख
कामधेनू गौरक्षक संस्था, काणकोण १६० ७ १७.८९ लाख
ऑर्गनायझेशन फॉर पीपल्स अॅण्ड एनिमल्स, फोंडा ५२ ५९ ३३.०३ लाख

  • Related Posts

    बहुजनांचे ‘पात्रांव’ रवी नाईक यांचे निधन

    तीन दिवसांचा दुखवटा; सार्वजनिक सुट्टी जाहीर गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) राज्याचे कृषीमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी खासदार आणि बहुजन समाजाचे लोकप्रिय नेते रवी नाईक यांचे मंगळवारी रात्री ११.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र…

    खरेच आम्ही ”शिकोन ब्रृत” ?

    साक्षरतेत शंभर टक्के उच्चांक गाठलेल्या गोव्यात हे प्रकार पाहिल्यानंतर “शिकोन ब्रृत” ही कोकणी म्हण खरी ठरते आहे, याचे दुःख वाटते. सासष्टी तालुक्यातील गिरदोळी, आंबावली आणि चांदोर पंचायतीत एकाच कंत्राटदाराकडून जीआयए…

    You Missed

    पोलीस निष्क्रियतेवर ‘रासुका’ची मात्रा!

    पोलीस निष्क्रियतेवर ‘रासुका’ची मात्रा!

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    06/11/2025 e-paper

    05/11/2025 e-paper

    राजकीय दबावाने पोलिस खाते कोलमडले…

    राजकीय दबावाने पोलिस खाते कोलमडले…

    वोट चोरी : लोकशाहीलाच सुरूंग

    वोट चोरी : लोकशाहीलाच सुरूंग
    error: Content is protected !!