नंदेश कांबळी, अनिल नाईक यांचा होणार सत्कार

पणजी, ता. १७ (प्रतिनिधी) : जागतिक छायाचित्रण दिन आणि गोवा छायापत्रकार संघटनेचा १९ वा वर्धापन दिन बुधवार, १९ ऑगस्ट रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. गोवा छायापत्रकार संघटना आणि राज्य सरकारच्या कला व संस्कृती खात्याच्या संयुक्त विद्यमाने पणजीतील डॉन बॉस्को शाळेसमोरील संघटनेच्या कार्यालय तथा आर्ट गॅलरीमध्ये हा सोहळा होणार आहे.

यावेळी छायापत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ छायापत्रकार नंदेश कांबळी आणि अनिल नाईक यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, माहिती व प्रसिद्धी संचालक अभिर हेदे आणि कला व संस्कृती संचालक विवेक नाईक यांची सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे.

यानिमित्त राज्यातील छायापत्रकारांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलेल्या निवडक आणि उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तर २० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहील.

संघटनेच्या वार्षिक छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना याच सोहळ्यात पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. तसेच छायापत्रकारांचे कौशल्य आणि ज्ञान वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने २० ऑगस्ट रोजी संघटनेच्या सदस्यांसाठी एकदिवसीय फोटो पत्रकारिता कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे.

छायापत्रकारितेचे संवर्धन, छायापत्रकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि गोव्यातील विविध घडामोडींचे दृश्य दस्तऐवजीकरण करण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत आहे. छायाचित्रणप्रेमी, माध्यम प्रतिनिधी आणि नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन जागतिक छायाचित्रण दिनाच्या उपक्रमांत सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.

  • Related Posts

    ‘Like-minded parties must unite to defeat BJP’; AICC chief asks Goa leadership to continue alliance talks

    President and Leader of Opposition in the Rajya Sabha Mallikarjun Kharge on Tuesday expressed confidence that the Congress, with the support of the people and like-minded political parties, can defeat the BJP in the next Goa Assembly election. He also gave a clear signal to the state Congress leadership to continue talks for forging an opposition alliance.

    फलोत्पादन महामंडळातीलकंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा

    अॅड. अजय प्रभू गांवकर, अमित पाटकर यांचे निवेदन गांवकारी,दि.१८(प्रतिनिधी) गोवा राज्य फलोत्पादन महामंडळात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अॅड. अजय प्रभू गावकर आणि काँग्रेस नेते अमित…

    You Missed

    नंदेश कांबळी, अनिल नाईक यांचा होणार सत्कार

    नंदेश कांबळी, अनिल नाईक यांचा होणार सत्कार

    ‘Like-minded parties must unite to defeat BJP’; AICC chief asks Goa leadership to continue alliance talks

    ‘Like-minded parties must unite to defeat BJP’; AICC chief asks Goa leadership to continue alliance talks

    18/08/2026 e-paper

    18/08/2026 e-paper

    18/08/2026 e-paper

    18/08/2026 e-paper

    गोव्याला प्रसिद्धी नव्हे,उत्तरदायी प्रशासन हवे! जॉन्सन डिसिल्वा

    गोव्याला प्रसिद्धी नव्हे,उत्तरदायी प्रशासन हवे! जॉन्सन डिसिल्वा

    फलोत्पादन महामंडळातीलकंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा

    फलोत्पादन महामंडळातीलकंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा