१७ (२) नंतर आता ३९ (ए) कायद्याच्या कात्रीत

प्रकरणाच्या निवाड्यावरच भवितव्य अवलंबून

गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी)

राज्य सरकारने ३९(ए) अंतर्गत झोन बदलासंबंधी आलेल्या प्रस्तावांवर अंतिम अधिसूचना जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सर्व प्रस्तावांचे भवितव्य आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निकालावर अवलंबून राहील, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
गोवा फाउंडेशन आणि फेडरेशन ऑफ रेनबो वॉरीयर्स यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान खंडपीठाने हे स्पष्टीकरण दिले. न्यायमुर्ती भारती डांग्रा आणि न्यायमुर्ती निवेदिता पी. मेहता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
नगर नियोजन विभागाच्यावतीने मेसर्स वेरितास लीगलच्या टीमकडून वरिष्ठ वकील शरण जगतियानी, प्राची धनानी, रोहीणी जैसवाल आणि रोशन कुमार यांचा युक्तिवाद सुरू आहे, तर याचिकादारांच्यावतीने अ‍ॅड. नॉर्मा आल्वारीस, अ‍ॅड. ओंम कॉस्ता आणि मलिसा सिमोएश यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
गोवा प्रादेशिक आराखडा-२०२१ आणि बाह्य विकास आराखड्यात बदल करून त्या जमिनींच्या रूपांतरणाला परवानगी देण्याची तरतूद नगर नियोजन कायदा दुरुस्ती ३९(ए) अंतर्गत करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आले आहेत.
या दुरुस्तीस याचिकादारांनी खंडपीठात आव्हान दिले असून, प्रादेशिक आराखड्यात अशा प्रकारच्या बदलांचा नियोजनावर गंभीर परिणाम होईल आणि नागरिकांना त्याचा त्रास होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. या याचिकेमुळे अंतिम अधिसूचना रखडली होती.
राज्य सरकारने आता अंतिम अधिसूचना जारी करण्याची तयारी केली आहे, असे या सुनावणीवेळी सांगण्यात आले. मात्र, खंडपीठाने स्पष्ट केले की या सर्व परवान्यांचे भवितव्य या याचिकेच्या अंतिम निकालावर अवलंबून राहील.

  • Related Posts

    ४३ कोटींच्या दंडाची होणार परतफेड

    स्मार्ट मीटर जनआंदोलनानंतर मुख्य अभियंत्यांची घोषणा गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी)स्मार्ट मीटर प्रकल्पाअंतर्गत ग्राहकांकडून अतिरीक्त वीज वापरासाठी आकारण्यात आलेला तब्बल ४३ कोटी रुपयांचा दंड परत करण्याचे आश्वासन वीज विभागाचे मुख्य अभियंता…

    Bombay High Court Issues Notices in Taleigao Communidade Land Filling Case

    The Bombay High Court at Goa has issued notices to Panaji Mayor Rohit Monserrate and several other respondents in connection with a petition alleging illegal encroachment and dumping of earth on land belonging to the Taleigao Communidade. The matter is scheduled for its next hearing on July 28. The petition was filed by Jose Rodrigues, Eusebio Gomes and Vito Gomes, naming the State Government, Taleigao Panchayat, Taleigao Communidade, Panaji Mayor Rohit Monserrate, and other authorities as respondents.

    You Missed

    स्मार्ट मीटर की स्मार्ट राजकारण ?

    स्मार्ट मीटर की स्मार्ट राजकारण ?

    ४३ कोटींच्या दंडाची होणार परतफेड

    ४३ कोटींच्या दंडाची होणार परतफेड

    GHRC Adjourns Smart Meter Hearing to July 15; Amicus Curiae to Submit Report

    GHRC Adjourns Smart Meter Hearing to July 15; Amicus Curiae to Submit Report

    Bombay High Court Issues Notices in Taleigao Communidade Land Filling Case

    Bombay High Court Issues Notices in Taleigao Communidade Land Filling Case

    23/06/2026 e-paper

    23/06/2026 e-paper

    मान्सूनपूर्व कामांचा पोलखोल

    मान्सूनपूर्व कामांचा पोलखोल