१७ (२) नंतर आता ३९ (ए) कायद्याच्या कात्रीत

प्रकरणाच्या निवाड्यावरच भवितव्य अवलंबून

गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी)

राज्य सरकारने ३९(ए) अंतर्गत झोन बदलासंबंधी आलेल्या प्रस्तावांवर अंतिम अधिसूचना जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सर्व प्रस्तावांचे भवितव्य आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निकालावर अवलंबून राहील, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.
गोवा फाउंडेशन आणि फेडरेशन ऑफ रेनबो वॉरीयर्स यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान खंडपीठाने हे स्पष्टीकरण दिले. न्यायमुर्ती भारती डांग्रा आणि न्यायमुर्ती निवेदिता पी. मेहता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.
नगर नियोजन विभागाच्यावतीने मेसर्स वेरितास लीगलच्या टीमकडून वरिष्ठ वकील शरण जगतियानी, प्राची धनानी, रोहीणी जैसवाल आणि रोशन कुमार यांचा युक्तिवाद सुरू आहे, तर याचिकादारांच्यावतीने अ‍ॅड. नॉर्मा आल्वारीस, अ‍ॅड. ओंम कॉस्ता आणि मलिसा सिमोएश यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
गोवा प्रादेशिक आराखडा-२०२१ आणि बाह्य विकास आराखड्यात बदल करून त्या जमिनींच्या रूपांतरणाला परवानगी देण्याची तरतूद नगर नियोजन कायदा दुरुस्ती ३९(ए) अंतर्गत करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आले आहेत.
या दुरुस्तीस याचिकादारांनी खंडपीठात आव्हान दिले असून, प्रादेशिक आराखड्यात अशा प्रकारच्या बदलांचा नियोजनावर गंभीर परिणाम होईल आणि नागरिकांना त्याचा त्रास होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. या याचिकेमुळे अंतिम अधिसूचना रखडली होती.
राज्य सरकारने आता अंतिम अधिसूचना जारी करण्याची तयारी केली आहे, असे या सुनावणीवेळी सांगण्यात आले. मात्र, खंडपीठाने स्पष्ट केले की या सर्व परवान्यांचे भवितव्य या याचिकेच्या अंतिम निकालावर अवलंबून राहील.

  • Related Posts

    Over Two Lakh Women Still Await ₹3,000 Assistance: Vijai Sardesai Slams BJP Government

    Goa Forward Party (GFP) President Vijai Sardesai has criticised the BJP-led Goa government over delays in disbursing ₹3,000 financial assistance to women, claiming over two lakh applicants are still awaiting funds despite grand announcements.

    निवाड्याविरोधात फेरविचार याचिका ?

    आसगाव पंचायत ग्राम विकास समितीचा एकमुखी ठराव गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) आसगाव येथील वादग्रस्त मेगा प्रकल्पाच्या विरोधातील कायदेशीर लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार आसगाव पंचायतीच्या ग्राम विकास समितीने केला आहे.…

    You Missed

    वकिल संघटनेचे अभिनंदन !

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 24, 2026
    • 13 views
    वकिल संघटनेचे अभिनंदन !

    Over Two Lakh Women Still Await ₹3,000 Assistance: Vijai Sardesai Slams BJP Government

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 24, 2026
    • 12 views
    Over Two Lakh Women Still Await ₹3,000 Assistance: Vijai Sardesai Slams BJP Government

    ५०० कोटींचा हिशेब!

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 24, 2026
    • 17 views
    ५०० कोटींचा हिशेब!

    23/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 23, 2026
    • 14 views
    23/10/2026 e-paper

    23/10/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 23, 2026
    • 16 views
    23/10/2026 e-paper

    साडेचार हजार कोटींसाठी सुर्लाचा बळी ?

    • By Gaonkaari
    • ऑक्टोबर 23, 2026
    • 17 views
    साडेचार हजार कोटींसाठी सुर्लाचा बळी ?