फिल्टर कॉफी स्टार्टअपला राष्ट्रीय स्तरावर पसंती

रेझ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीकडे करार

पणजी, दि. २९ (प्रतिनिधी)

गोव्याच्या केपे – असोल्ड्याची युवती कु. तन्वी राऊत देसाई हिने २०२० साली स्थापन केलेल्या फिल्टर कॉफी या स्टार्टअपची पेटीएमचे माजी सीईओ प्रविण जाधव यांच्या रेझ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने व्यावसायिक भागीदारीसाठी निवड केली आहे. यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर कंपनीकडून यासंबंधीची अधिकृत घोषणा झाली आहे.
फिल्टर कॉफी हे स्टार्टअप तन्वी राऊत देसाई हिने आपल्या मित्रांसोबत मिळून २०२० मध्ये स्थापन केले होते. या स्टार्टअपच्या सहाय्याने व्यावसायिक माहिती सुलभ आणि सहजतेने प्राप्त होऊ शकते. फायनान्शियल बाजारात डेटा-आधारित माहिती व्हिडिओ आणि स्टोरीटेलिंगच्या माध्यमातून पोहचवण्यात या स्टार्टअपची मदत घेऊन रेझ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आपल्या व्यवसायाचा विस्तार अधिक प्रभावी पद्धतीने करू शकणार आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकृष्ट करण्यात मदत होते आणि त्यातून व्यावसायिक विस्तारीकरण आणि टार्गेट निर्धारित काम करणे सोपे बनते.
या भागीदारीबद्दल बोलताना रेझचे संस्थापक आणि सीईओ प्रवीण जाधव म्हणाले की फिल्टर कॉफी हा एक विश्वासार्ह ब्रँड आहे. हा ब्रँड भारताच्या उदयोन्मुख गुंतवणूकदार वर्गाशी संवाद साधण्यात मदतगार ठरणार आहे. या स्टार्टअपच्या वाढीस समर्थन देण्यासाठी रेझ उत्सुक आहे, असेही ते म्हणाले. पेटीएमचे माजी सीईओ असलेले प्रवीण जाधव यांनी तिथून राजीनामा दिल्यानंतर रेझ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी स्थापन केली. या कंपनीने स्टॉक ब्रोकिंग क्षेत्रात अनेक वित्तीय सेवा प्रदान केल्या आहेत.
भाऊ-बहिणीचा डंका
केपे-असोल्डा येथील रहिवासी तथा निवृत्त सरकारी वकिल सत्यवान राऊत देसाई यांची कु. तन्वी ही मुलगी आहे. त्यांचा मुलगा तेजस राऊत देसाई याची अलिकडेच अमेरिकेतील सीएनबीसी टेलेव्हीजनवर संरक्षण गुंतवणुकीवरील मुलाखत प्रसारित झाली होती. ग्लोबल एक्स इटीएफ्स मधील थीमॅटिक रिसर्च टीमवर विश्लेषक म्हणून तो काम पाहत आहे. या दोन्ही भाऊ-बहिणीच्या या यशाचे सर्वत्र कौतुक सुरू आहे.

‘माझ्या बेडरूममध्ये सुरू केलेला एक छोटा प्रकल्प भारतातील एका आघाडीच्या कंपनीचा भाग बनत असल्याचा आनंद आहे. दोन महिन्यांपूर्वी मी मुंबई गाठली. एकतर या स्टार्टअपला पुढे न्यायचे किंवा तो प्रकल्प सोडून द्यायचा. कुटुंबियांकडून पैसे जमा केले आणि हे ध्येय साध्य करायचे ठरवले. काही प्रमाणात भीतीने स्टार्टअपची माहिती देणारा एक ईमेल प्रकाशित केला. आश्चर्य म्हणजे वेगवेगळ्या कंपनीचे सीईओ, संस्थापक, कार्यकारी अधिकारी अशा ८ हजार जणांनी तो पाहिला आणि तिथून पुन्हा उमेदीला नवे पंख फुटले. रेझ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने या प्रकल्पाला पसंती दिली आणि पूर्ण सहकार्याची हमी देत हा करार केला.’
कु. तन्वी सत्यवान राऊत देसाई
संस्थापक- फिल्टर कॉफी

  • Related Posts

    फातोर्ड्यात वोट चोरी उघड

    आमदार विजय सरदेसाई यांचा आरोप गांवकारी,दि.१७(प्रतिनिधी) फातोर्डा मतदारसंघातील मतदारयादीतून तब्बल साडेचार हजार पात्र मतदारांची नावे वगळण्यात आली असून, मागील दोन निवडणुकांत कुडतरी मतदारसंघात मतदान केलेल्या ५० मतदारांची नावे फातोर्डा मतदारसंघात…

    उपनिरीक्षक सपना गावस यांच्या तपासाला अखेर यश

    बलात्कारप्रकरणी दोषीला जन्मठेप! गांवकारी, दि.१७ (प्रतिनिधी) अवघ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीला पणजी येथील गोवा राज्य बाल न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून दोन लाख…

    You Missed

    Over 50 Goa University Students Face Academic Uncertainty as Supreme Court Order Sparks Examination Fee Deadline Row

    Over 50 Goa University Students Face Academic Uncertainty as Supreme Court Order Sparks Examination Fee Deadline Row

    South Goa Collector Announces Special Camp to Clear Pending Land Mutation Cases on October 24

    South Goa Collector Announces Special Camp to Clear Pending Land Mutation Cases on October 24

    Goa Unveils AI Policy 2026; CM Sawant Pushes for AI-Ready Education and Governance

    Goa Unveils AI Policy 2026; CM Sawant Pushes for AI-Ready Education and Governance

    राष्ट्रध्वजारोहणाचा मान राजकारण्यांऐवजी स्वातंत्र्यसैनिक, सैनिकांना द्या!

    राष्ट्रध्वजारोहणाचा मान राजकारण्यांऐवजी स्वातंत्र्यसैनिक, सैनिकांना द्या!

    आसगांव पंचायतीला हायकोर्टाचा धक्का

    आसगांव पंचायतीला हायकोर्टाचा धक्का

    22/10/2026 e-paper

    22/10/2026 e-paper