म्हादईप्रश्नी दर आठवड्याला अपडेट हवी

विधानसभेत आमदारांची जोरदार मागणी

गांवकारी, दि.२२ (प्रतिनिधी)

म्हादईच्या प्रश्नावर डबल इंजिन सरकार गोव्याच्या हितासाठी अपयशी ठरले असल्याची टीका विरोधी आमदारांनी विधानसभेत केली. कर्नाटक सरकारकडून सातत्याने विविध कुरघोड्या होत असताना, गोवा सरकारने फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे. म्हादईविषयक न्यायालयीन लढा आणि इतर घडामोडींबाबत आमदारांना दर आठवड्याला माहिती पुरवावी, अशी जोरदार मागणी विरोधी आमदारांनी केली.
आजच्या विधानसभेत म्हादई प्रश्नावर जोरदार चर्चा झाली. विरोधी आमदारांनी सभापती रमेश तवडकर यांच्या आसनासमोर धाव घेत चर्चा परवानगीची मागणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंच यांनी सांगितले की म्हादई प्रकरणावर सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. कर्नाटकला केंद्राकडून कोणतीही परवानगी मिळू नये, यासाठी दिल्लीमध्ये सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. कर्नाटक केंद्राच्या परवानगीशिवाय कामे करत आहे, परंतु ती कामे त्यांच्या राज्यात चालू असल्याने गोवा सरकार काहीच करू शकत नाही. यासंदर्भातील याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. अलिकडेच केंद्रीय वन आणि वातावरण बदलमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय मांडल्याचेही मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.
सभागृह समितीबाबत नाराजी
म्हादई प्रश्नासंबंधी स्थापलेल्या सभागृह समितीची बैठक जानेवारीत झाली होती, पण त्यानंतर आजपर्यंत दुसरी बैठक घेण्यात आलेली नाही. “या समितीचा उपयोग काय?” असा सवाल उपस्थित करत आमदार विजय सरदेसाई यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. समिती स्थापूनही अद्याप म्हादईची पाहणी झाली नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. जर समिती स्थापण्यात आली आहे, तर तीने विषयाचा सखोल अभ्यास करावा आणि कर्नाटकच्या कुरघोडीबाबत सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी, अशी मागणी आमदार विरेश बोरकर यांनी केली. आमदार वेन्झी व्हिएगस यांनीही सरकारच्या दुर्लक्षावर तीव्र टीका केली.

  • Related Posts

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांचे खरमरीत पत्र गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी) गोवा विधानसभेने मंजूर केलेले नगर नियोजन कायद्याचे कलम ३९ (ए) हे पूर्णपणे बेकायदेशीर असून मनमानी स्वरूपाचे आहे. या कायद्याअंतर्गत…

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    राजकीय शक्तीचे पाठबळ, स्थानिकांची नाराजी गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) वास्को येथे विरोध झाल्यानंतर फॉर्म्युला-४ स्ट्रीट रेस स्पर्धा आता मोपा विमानतळ परिसरात आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने मोपा भूपीडित…

    You Missed

    Justice Ferdino Rebello Sounds Alarm: Goa’s Agricultural Lands at Risk Under Section 39-A

    Justice Ferdino Rebello Sounds Alarm: Goa’s Agricultural Lands at Risk Under Section 39-A

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    तुयेत एम्सचा विचार व्हावा

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    टीसीपीच्या कलम ३९ (ए) चे वस्त्रहरण

    06/02/2026 e-paper

    06/02/2026 e-paper

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल