‘रिमोट न्यूरल मॉनिटरिंग’


म्हापसा पोलिसांत तक्रार

गांवकारी, दि.१९ (प्रतिनिधी)

बेंगळुरू येथील रहिवासी शक्तिधर रेड्डी यांनी आपल्यावर सतत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप करत म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी या प्रकाराला “रिमोट न्यूरल मॉनिटरिंग” आणि “मायक्रोवेव्ह ऑडिटरी टेक्नॉलॉजी”द्वारे होणारा त्रास असे संबोधले आहे.

तक्रारीनुसार, सदर कथित तंत्रज्ञानाचा वापर आपल्यावर २४ तास सुरू होता, त्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे तसेच मानसिक त्रास यांसारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होत असल्याचा दावा रेड्डी यांनी केला आहे. त्यांनी हा प्रकार जैविक दहशतवाद असून मूलभूत मानवी हक्कांचे, विशेषतः गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणात त्यांनी जॉर्ज कार्लिन रोड्रिग्स या व्यक्तीचे नाव संशयित आरोपी म्हणून नमूद केले असून सदर तंत्रज्ञानाच्या गैरवापरात त्याचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तक्रारीत आणखी एका व्यक्तीचा उल्लेख असून ती आरोपीशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित प्रकरण अत्यंत गंभीर व जीवघेणे असल्याचे सांगत तातडीने चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे.
पोलिसांकडून प्रतिसाद नाही
आपण केलेल्या तक्रारीची पोलिस दखल घेत नाहीत असा आरोप रेड्डी यांनी केला आहे. या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यास भीषण परिणाम होणार आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. या तंत्रज्ञानाव्दारे गोव्यात जातीय दंगली घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.

रिमोट न्यूरल मॉनिटरिंग म्हणजे काय?
“रिमोट न्यूरल मॉनिटरिंग” हा एक कथित प्रकार असून त्याद्वारे दूरवरून व्यक्तीच्या मेंदूवर लक्ष ठेवणे, विचार व भावना जाणून घेणे किंवा मानसिक त्रास देणे शक्य असल्याचा दावा केला जातो. मात्र, सध्याच्या वैज्ञानिक व वैद्यकीय पुराव्यानुसार अशी तंत्रज्ञान प्रणाली प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याचे सिद्ध झालेले नाही. अशा प्रकारच्या तक्रारींची चौकशी संबंधित यंत्रणांकडून केली जाते.

  • Related Posts

    गोवा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अधिकारग्रहण

    गोवा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचा अधिकारग्रहण सोहळा पार पडला असून, सुरेश स. नाईक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. पुढील दोन वर्षांसाठी बिनविरोध निवड झालेल्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

    Chicalim Panchayat Secretary Issues Show-Cause Notice to Own Sarpanch Over Alleged Illegal Commercial Complex

    The Chicalim Village Panchayat Secretary has issued a show-cause notice to Sarpanch Kamla Prasad Yadav and five others over alleged illegal construction and unauthorised commercial activities involving 95 shops and residential rooms at a multi-storeyed complex in Dabolim. The notice raises questions about past inaction and administrative accountability.

    You Missed

    गोवा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अधिकारग्रहण

    गोवा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अधिकारग्रहण

    Chicalim Panchayat Secretary Issues Show-Cause Notice to Own Sarpanch Over Alleged Illegal Commercial Complex

    Chicalim Panchayat Secretary Issues Show-Cause Notice to Own Sarpanch Over Alleged Illegal Commercial Complex

    कुणीतरी टॉयलेट द्या हो !

    कुणीतरी टॉयलेट द्या हो !

    पायलटांच्या प्रलंबित योजना आठ दिवसांत सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

    पायलटांच्या प्रलंबित योजना आठ दिवसांत सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

    Goa Government Signs MoU with The Modern Data Company to Introduce AI in Governance

    Goa Government Signs MoU with The Modern Data Company to Introduce AI in Governance

    राज्याच्या ‘केअर्स’ समितीवर मांगिरीश, सुनया यांची नियुक्ती

    राज्याच्या ‘केअर्स’ समितीवर मांगिरीश, सुनया यांची नियुक्ती