डंपला हात लावाल तर पस्तावाल

सुर्लाकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी)

साखळी मतदारसंघातील सुर्ला गावाच्या माथ्यावरील सुमारे ३५ वर्षे जुन्या खनिज डंपच्या हाताळणीस मेसर्स व्ही. एम. साळगांवकर कंपनीला गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता दिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. “डंपला हात लावाल तर पस्तावाल,” असा थेट इशारा सुर्लावासीयांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन दशकांत या डंपवर नैसर्गिक जंगल उभे राहिले असून वन्यजीवांचाही अधिवास निर्माण झाला आहे. डंप हटविला जाणार नाही, या तत्कालीन हमीनंतरच येथे खनिज टाकण्यास स्थानिकांनी मान्यता दिली होती. मात्र आता डंपमधील खनिजाला मोठे आर्थिक मूल्य प्राप्त झाल्याने त्याच्या हाताळणीच्या हालचाली सुरू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या खनिजाची किंमत सुमारे साडेचार हजार कोटी रुपये असल्याचा स्थानिकांचा दावा आहे.

डंप हाताळणीचा निर्णय घेताना ग्रामस्थांना किंवा ग्रामपंचायतीला विश्वासात घेण्यात आले नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. एका बाजूला खनिज मातीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली जात असताना दुसऱ्या बाजूला गावाच्या माथ्यावरील डंप पुन्हा हाताळण्याचा प्रयत्न हा विरोधाभास असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

खनिज वाहतूकदारांना पुढे करून रोजगाराच्या नावाखाली डंप हाताळणीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. “आम्ही आजवर मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी राहिलो; मात्र गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यास आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल,” असा इशारा देत मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी तातडीने हस्तक्षेप करून डंप हाताळणी थांबवावी, अशी मागणी सुर्लावासीयांनी केली आहे.

  • Related Posts

    नटसम्राट नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड!

    गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) आपल्या भारदस्त आवाजाने, बेधडक व्यक्तिमत्त्वाने आणि कसदार अभिनयाने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (७५) यांचे गुरुवारी पहाटे गोव्यात निधन झाले.…

    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर

    २ ऑक्टोबर म्हटले की आपल्याला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री आठवतात. पण मला या दिवशी आणखी एक नाव आठवते — राजाराम रंगाजी पैंगिणकर. आज त्यांची जयंती नाही किंवा पुण्यतिथीही नाही.…

    You Missed

    Supreme Court Sets Aside Bombay HC Order in Goa Weightlifting Coach Selection Dispute

    Supreme Court Sets Aside Bombay HC Order in Goa Weightlifting Coach Selection Dispute

    भाजपच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याची ‘आप’ची रणनीती!

    भाजपच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावण्याची ‘आप’ची रणनीती!

    08/10/2026 e-paper

    08/10/2026 e-paper

    08/10/2026 e-paper

    08/10/2026 e-paper

    नटसम्राट नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड!

    नटसम्राट नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड!

    बेधडक आवाज शांत झाला !

    बेधडक आवाज शांत झाला !