आरजीपीचा फुटबॉल विरेशच्या हातात

विश्वेश नाईक आणि अजय खोलकर निलंबित
गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी)

रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीतील अंतर्गत वादाचा आता मोठा भडका उडाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी ताबा घेत सरचिटणीस विश्वेश नाईक आणि खजिनदार अजय खोलकर यांना निलंबित केले आहे. तसेच सर्व राज्य, जिल्हा, ब्लॉक, तालुका, वार्ड तसेच इतर सर्व संघटनात्मक समित्या तात्काळ प्रभावाने बरखास्त करण्याचा आदेशही जारी केला आहे.
माजी अध्यक्ष मनोज परब आणि आमदार विरेश बोरकर यांच्यात सरळ फुट पडल्यानंतर गेले काही महिने पक्षात अंतर्गत धुसफुस सुरू होती. मनोज परब गटाकडून आमदार विरेश बोरकर यांची कोंडी होत असल्याचे चित्र दिसत होते. अशा परिस्थितीत अचानक विरेश बोरकर यांनी पक्षाची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने त्यांनी धुरा आपल्या खांद्यावर घेत पक्षाच्या फेररचनेची प्रक्रिया सुरू केली आहे.
संघटनात्मक पुनर्रचना
आमदार विरेश बोरकर यांनी पक्षाच्या संघटनात्मक पुनर्रचनेला सुरुवात केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी हे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या सर्व समित्या बरखास्त करून ४५ दिवसांच्या आत नवीन कार्यकारिणीची निवडणूक घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
विश्वेश आणि अजय निलंबित
पक्षाचे माजी अध्यक्ष मनोज परब यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षावर घट्ट पकड ठेवलेले सरचिटणीस विश्वेश नाईक आणि खजिनदार अजय खोलकर यांना निलंबित करून आमदार बोरकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. पक्षघटनेचे उल्लंघन आणि अनधिकृत कारवायांबाबत त्यांची चौकशी केली जाणार असल्याचे आदेशात नमूद आहे. या दोन्ही नेत्यांना नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांनुसार आणि पक्षघटनेनुसार आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असेही निलंबन आदेशात नमूद केले आहे.
१० जणांचे निलंबन मागे
मागील कार्यकारिणीने विरेश बोरकर गटातील १० पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला होता. मात्र, या सदस्यांचे निलंबन मागे घेण्यात आले असून त्यांच्यावरील शिस्तभंगाची चौकशी सुरू राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यात आदित्य देसाई, प्रेमानंद गावडे, विशाल गाऊस देसाई, प्रशांत पागी, राहुल नाईक, डॅगले फर्नांडिस, मेल्विन दा सिल्वा, लिसिओ रॉन्कॉन, मनीला शिरोडकर आणि संजन श्रीनिवास नाईक यांचा समावेश आहे.

  • Related Posts

    1526–2026: 500 Years of the Foral

    On 16 September 1526, the Foral dos usos e costumes dos Gancares e Lavradores desta Ilha de Goa e outras annexas a ella recorded the uses, customs and practices governing the Gaunkars and cultivators of Goa. Exactly five hundred years later, on 16 September 2026, that history has acquired striking contemporary relevance as questions concerning Communidade land return to the courtroom.

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    This is an emotional plea from a Goan to Lord Ganesha, urging him to awaken the wisdom in the hearts of Goans to protect their land. The author expresses concern about unchecked development, the sale of land, and money-driven politics that threaten Goa’s natural beauty, cultural identity, and the future of its youth. The plea is for discernment, courage, and a collective resolve to prioritize Goa’s future over personal gain, ensuring it remains an invaluable homeland for generations to come.

    You Missed

    1526–2026: 500 Years of the Foral

    1526–2026: 500 Years of the Foral

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    आरजीपीच्या नव्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन

    आरजीपीच्या नव्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन

    ‘गोवा विकू देणार नाही’; काँग्रेसची २७ दिवसीय ‘गोंय राखण यात्रा’

    ‘गोवा विकू देणार नाही’; काँग्रेसची २७ दिवसीय ‘गोंय राखण यात्रा’