सोनम वांगचुकने उपोषण सोडले

सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच

गांवकारी, दि. २४

कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)चे आंदोलन देशव्यापी स्वरूप प्राप्त करत असतानाच काल रात्री पर्यावरण व समाजकार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल २६ दिवसांचे बेमुदत उपोषण मागे घेतले. केंद्र सरकारकडून मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद केले आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवरील आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सीजेपीने व्यक्त केला आहे.
गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांनी वांगचुक यांची भेट घेतली. सरकारने शांततापूर्ण आंदोलनात सहभागी झालेल्यांवर दाखल गुन्ह्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे तसेच शिक्षण क्षेत्रातील सुधारणांवर आणि परीक्षा गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. देशात कोणत्याही परिस्थितीत हिंसा भडकू नये, अशी प्रार्थना वांगचुक यांनी केली. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी वांगचुक यांचे कौतुक करत म्हटले, “वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले तरी आमचे आंदोलन सुरूच राहील. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आम्ही माघार घेणार नाही.”

  • Related Posts

    आरजीपीचा फुटबॉल विरेशच्या हातात

    विश्वेश नाईक आणि अजय खोलकर निलंबितगांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीतील अंतर्गत वादाचा आता मोठा भडका उडाला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी ताबा घेत…

    Girish Chodankar Writes Open Letter to BJP Chief Damu Naik, Slams ‘Abusive’ Political Discourse

    Goa Pradesh Congress Committee President Girish Chodankar has penned an open letter to BJP Goa President Damu Naik, condemning the use of derogatory language during a BJP protest and advocating for respectful, issue-based political discourse in Goa.

    You Missed

    24/07/2026 e-paper

    24/07/2026 e-paper

    सोनम वांगचुकने उपोषण सोडले

    सोनम वांगचुकने उपोषण सोडले

    उद्याच्या उध्वस्त गोव्याची नांदी ?

    उद्याच्या उध्वस्त गोव्याची नांदी ?

    आरजीपीचा फुटबॉल विरेशच्या हातात

    आरजीपीचा फुटबॉल विरेशच्या हातात

    Girish Chodankar Writes Open Letter to BJP Chief Damu Naik, Slams ‘Abusive’ Political Discourse

    Girish Chodankar Writes Open Letter to BJP Chief Damu Naik, Slams ‘Abusive’ Political Discourse

    Environment Activist Approaches DySP Over Valpoi Police’s Alleged Inaction on Illegal Stone Quarrying

    Environment Activist Approaches DySP Over Valpoi Police’s Alleged Inaction on Illegal Stone Quarrying