‘दाबोळी’ भाजप रचित कारस्थान !

खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा हल्लाबोल

गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी)

जीएमआर कंपनी नुकसानीत चालली आहे. दुसरीकडे दाबोळी विमानतळाच्या परिक्षेत्रात सत्ताधारी सरकारातील दलालांनी जमिनींची मोठी विक्री केली आहे. मात्र, इमारतीच्या उंचीबाबत निर्बंध लागल्यामुळे ते अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर पद्धतशीरपणे दाबोळी विमानतळ बंद करण्याचे कारस्थान भाजपाने रचल्याचा आरोप दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी केला. दाबोळी बंदचा प्रस्ताव रद्द झालेला नाही, तर स्थगित ठेवण्यात आला आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.
इथे आयोजित पत्रकार परिषदेत कॅप्टन विरियातो फर्नांडिस बोलत होते. दाबोळी विमानतळ बंद करण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे, या खासदार फर्नांडिस यांच्या वक्तव्याचा भाजपने निषेध केला आहे. खासदार फर्नांडिस यांनी पुरावे सादर करावेत, असे आव्हान भाजपने त्यांना दिले आहे. “आपण आपल्या भूमिकेशी ठाम आहोत, पण पुरावे भाजपला का द्यायचे?” असा प्रतिप्रश्न खासदार फर्नांडिस यांनी केला.
पंचायतमंत्री मॉविन गुदीन्हो तथा भाजप नेते तीन वेळा केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना भेटले. दाबोळी विमानतळ बंद करण्यासाठी जीएमआर कंपनी दबाव टाकत आहे, हे विधान पंचायतमंत्री मॉविन गुदीन्हो यांनी स्वतः केले आहे. मग त्यांनी केंद्रीय विमान उड्डाणमंत्र्यांची भेट का घेतली नाही? हे शिष्टमंडळ केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे का गेले? असा सवाल त्यांनी केला.
दाबोळीचा विमानतळ पूर्णतः नौदलाच्या हाती द्यावा, असा प्रस्ताव तयार करण्याचा डाव आखण्यात आला आहे. “दाबोळी बंद होणार नाही” असे भाजपकडून सांगितले जाते, पण त्याचा अर्थ दाबोळी फक्त नौदलासाठीच कार्यरत राहणार, असा आहे काय? दाबोळी विमानतळ हा प्रवासी वाहतूक आणि व्यवसायिक विमान वाहतुकीसाठीही सुरू असावा, अशी आमची मागणी आहे, असेही कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले.
इमारत उंची मर्यादेची अडचण
दाबोळी येथे नौदलाची परवानगी न घेता ओव्हरब्रिजचे काम सुरू करण्यात आले, ते सरकारवर अंगलट आले. तिथे १७ खांब मोडण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. जनतेचा पैसा वापरून हा प्रयोग सरकारने केला. आता या उंचीची मर्यादा कमी करण्यासाठी मॉविन गुदीन्हो हे केंद्रात हेलपाटे मारत आहेत.
दाबोळी परिसरात मोठ्या प्रमाणात जमिनींचे व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांची दलाली सत्ताधारी पक्षातील लोकांनी केली आहे. बिल्डरांना उंच इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा व्हावा, या उद्देशानेच दाबोळी विमानतळावर त्यांची वक्रदृष्टी आहे, असेही खासदार फर्नांडिस म्हणाले.

  • Related Posts

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    Indian squash player Yash Fadte reached the quarterfinals of the PSA Aramis Club Open in Belgium, demonstrating resilience in a grueling five-game battle against Scottish No. 1 John Meehan, following a remarkable comeback victory in the pre-quarterfinals.

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    मडगावातील प्रस्तावित बहुमजली पार्किंग प्रकल्पाच्या पायाभरणीला ११ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधत ‘मडगांवचो आवाज’चे युवा नेते प्रभव नायक यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. कोसळलेल्या शिलान्यास फलकाला पुष्पहार अर्पण करून त्यांनी या प्रकल्पाला ‘अपयशाचे स्मारक’ असे संबोधले.

    You Missed

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    1526–2026: 500 Years of the Foral

    1526–2026: 500 Years of the Foral

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM