पणजी,दि.२६(प्रतिनिधी)- राज्यातील कॅसिनो व्यवसायाचे गंभीर दुष्परिणाम समाजावर होत असतानाच आता राज्य सरकारने गुंतवणूक प्रोत्साहन मंडळामार्फत धारगळ येथे डेल्टीन कंपनीच्या कॅसिनो सिटी प्रकल्पाला मंजूरी दिल्यामुळे जुगारविरोधी आम औरत, आदमी संघटना (आग) आक्रमक बनली आहे.
धारगळ येथे एकाच ठिकाणी डेल्टीन कंपनीचा एक मोठा कॅसिनो प्रकल्प उभा राहणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ पेडणेच नव्हे तर संपूर्ण उत्तर गोवा जुगाराच्या विळख्यात सापडणार आहे. जुगारासोबत इतर अनेक गोष्टींचा शिरकाव याठिकाणी होणार असल्याने त्याचे गंभीर परिणाम स्थानिकांना भोगावे लागणार आहेत. जुगाराच्या सामाजिक परिणामांचे भोग ह अधिकारतर महिलांनाच भोगावे लागतात आणि त्यामुळे पेडणेच्या महिलांनी सतर्क बनण्याची गरज आहे,असे संघटनेने म्हटले आहे.
या संघटनेतर्फे या विषयावर चर्चा करण्यासाठी सोमवार ३० सप्टेंबर रोजी इन्स्टीट्यूट पिएदाद सभागृहात संध्याकाळी ४ वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीत याविषयी चर्चा करून कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…
टीकाकारांच्या तोंडाला कायदेशीर कुलुप पणजी,दि.२१(प्रतिनिधी)- सनबर्न महोत्सवाचे आयोजक स्पेसबाऊंड वेब लॅब्स प्रा.लिमिटेड कंपनीकडून स्थानिक धारगळ पंचायतीचा ना हरकत दाखला. पर्यटन खात्याची तत्वतः मान्यता आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून सशर्त…