जीएमसी संलग्न प्रस्ताव नाहीच…

आरोग्य खात्याच्या लेखी उत्तरातून धक्कादायक माहिती

गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी)

पेडणे तालुक्यातील तुये येथे गोवा मेडिकल कॉलेज संलग्न १०० खाटांचे इस्पितळ उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. थाटात भूमिपूजन करून भव्य इमारतही उभारली गेली. मात्र, अधिकृत प्रस्ताव आरोग्य खात्याकडे सादरच झालेला नाही, अशी धक्कादायक माहिती आरोग्य खात्याच्या लेखी उत्तरातून समोर आली आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता आणि अ‍ॅड. कार्लोस फेरेरा यांनी विधानसभेत विचारलेल्या संयुक्त प्रश्नाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिलेल्या उत्तरात ही माहिती नमूद करण्यात आली आहे.
गोवा पायाभूत विकास महामंडळाने उभारलेल्या इमारतीचे ताबा आरोग्य संचालनालयाला देण्यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे. तुये सामाजिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून, ही इमारत प्रत्यक्षात त्या केंद्राचे स्थलांतरण करण्यासाठी वापरण्यात येणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. तसेच, सामाजिक आरोग्य केंद्रातील ९२ कर्मचारी याठिकाणी स्थलांतरीत होणार असल्याचेही स्पष्ट झाले.
कृती समितीकडून नाराजी
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि माजी आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पेडणेकरांना जीएमसी संलग्न इस्पितळ उभारण्याचे आश्वासन दिले होते. गोमेकॉमधील सर्व सुविधा याठिकाणी दिल्या जातील, असे सांगितले गेले होते.
आता भाजप सरकार लेखी उत्तरात असा प्रस्तावच नाही, असे म्हणत असल्यामुळे पेडणेकरांची थट्टाच सुरू आहे की काय, असा सवाल तुये इस्पितळ कृती समितीने उपस्थित केला आहे.
जर फक्त सामाजिक इस्पितळच स्थलांतरित करायचे होते, तर ८० कोटी रुपये खर्च, नव्या इमारतीत साठवलेले साहित्य व भव्य सुविधा यामागचा हेतू काय? हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे, अशीही समितीने टीका केली.
या साऱ्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे, असेही समितीचे म्हणणे आहे.

  • Related Posts

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा हल्लाबोल गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा अभ्यास अपुरा आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    बिल्डरला मदत करण्यासाठी महामार्गात बदल गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)बांबोळी येथील राष्ट्रीय महामार्ग-६६ वर आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले आहेत. या महामार्गाच्या मूळ आराखड्यात गोवा सार्वजनिक बांधकाम खात्याने एका बिल्डरला मदत करण्याच्या…

    You Missed

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    अरे हे चाललंय काय?

    अरे हे चाललंय काय?

    08/11/2025 e-paper

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    07/11/2025 e-paper

    error: Content is protected !!