गोव्याच्या परिवर्तनाचे छायाचित्रांतून दर्शन घडवा

मुख्यमंत्र्यांचे छायापत्रकारांना आवाहन

गांवकारी, दि. २० (प्रतिनिधी)

राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडले आहे. या परिवर्तनाचे छायाचित्रांच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करून जनतेला त्याचे दर्शन घडवावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी छायाचित्रकारांना केले.
जागतिक छायाचित्रण दिन आणि गोवा फोटो जर्नलिस्ट्स असोसिएशन (पीजेएजी)च्या १९व्या वर्धापनदिनानिमित्त कला व संस्कृती विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या अर्थसंकल्पातील वाढीचाही उल्लेख केला. आपण प्रथमच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा तो सुमारे १९ हजार कोटी रुपये होता. मागील वर्षी हा अर्थसंकल्प सुमारे ३० हजार कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थसंकल्पातील ही वाढ राज्याच्या विकासाचे प्रतिबिंब असल्याचे नमूद करताना, पत्रकारांसह जनतेच्या रास्त मागण्यांचा विचार करून त्या पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पीजेएजीतर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. या प्रदर्शनात पीजेएजीच्या सदस्यांसह अन्य वृत्तपत्र छायापत्रकारांच्या छायाचित्रांचा समावेश होता. अशा प्रदर्शनांमधून छायापत्रकारांच्या नजरेतून गोव्याचा इतिहास, विकास, संस्कृती आणि महत्त्वाच्या घटनांचे दर्शन घडते, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते ज्येष्ठ फोटो पत्रकार नंदेश कांबळी आणि काणकोण येथील ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल बी. नाईक यांचा छायाचित्रण व फोटो पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.
तसेच, पीजेएजीतर्फे आयोजित राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. शालेय गटासाठी ‘स्मितहास्य’ आणि खुल्या गटासाठी ‘सुंदर धार्मिक वास्तू’ हे विषय देण्यात आले होते.
छायाचित्र स्पर्धेतील विजेते
शालेय गट – विषय : ‘स्मितहास्य’
• प्रथम पारितोषिक: दीत्या तारी, इयत्ता आठवी, शारदा मंदिर स्कूल, कदंबा, जुने गोवा
• द्वितीय पारितोषिक: डिलन अझावेदो, इयत्ता सातवी, सेंट ब्रिटो हायस्कूल, म्हापसा
• तृतीय पारितोषिक: सानिका दुर्गादास नाईक, शारदा इंग्लिश हायस्कूल, दुर्भाट
• प्रथम उत्तेजनार्थ: श्रेष्ठ नाईक, इयत्ता पाचवी-डी, शारदा मंदिर स्कूल, मिरामार, पणजी
• द्वितीय उत्तेजनार्थ: तन्वी एन. प्रभू, इयत्ता दहावी, गुरुदास पी. गावस मेमोरियल हायस्कूल, साखळी
खुला गट – विषय : ‘सुंदर धार्मिक वास्तू’
• प्रथम पारितोषिक: सिद्धेश शेटगावकर, सांकवाळ-कुठ्ठाळी
• द्वितीय पारितोषिक: दिपेश नाईक, मडगाव, फोंडा
• तृतीय पारितोषिक: चेतन गावस
• प्रथम उत्तेजनार्थ: डॉ. उगम तारी, तारीवाडा, माशेल
• द्वितीय उत्तेजनार्थ: एलरिया फर्नांडिस
या कार्यक्रमाला माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक अभिर हेदे आणि कला व संस्कृती खात्याचे संचालक विवेक नाईक उपस्थित होते.
पीजेएजीचे अध्यक्ष संदीप देसाई आणि सरचिटणीस अतिश नाईक यांनी मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शेटकर यांनी केले.

  • Related Posts

    Casinos in Goa: Political History Cannot Be Rewritten

    The casino debate in Goa has resurfaced, with former Chief Minister Francisco Sardinha acknowledging casinos were introduced during his tenure. This report delves into the complex political history of casinos in Goa, arguing against selective blame and urging a comprehensive assessment of their impact across successive administrations.

    Rajiv Gandhi Would Be Saddened Over Delay in ST Rights in Goa: Chodankar

    GPCC President Girish Chodankar criticizes the BJP government for the delay in implementing constitutional rights, including political reservation, for Scheduled Tribes in Goa, stating that former PM Rajiv Gandhi would be saddened.

    You Missed

    Casinos in Goa: Political History Cannot Be Rewritten

    Casinos in Goa: Political History Cannot Be Rewritten

    Rajiv Gandhi Would Be Saddened Over Delay in ST Rights in Goa: Chodankar

    Rajiv Gandhi Would Be Saddened Over Delay in ST Rights in Goa: Chodankar

    Congress Demands Full Disclosure of BJP Office Funding

    Congress Demands Full Disclosure of BJP Office Funding

    गोव्याच्या परिवर्तनाचे छायाचित्रांतून दर्शन घडवा

    गोव्याच्या परिवर्तनाचे छायाचित्रांतून दर्शन घडवा

    भाजप कार्यालयात वास्तू शांती

    भाजप कार्यालयात वास्तू शांती

    20/08/2026 e-paper

    20/08/2026 e-paper