भाजप कार्यालयात वास्तू शांती

‘हे कॅसिनो भवन तर नव्हे?’ चोडणकरांचा टोला


गांवकारी, दि. २० (प्रतिनिधी)

चिंबल येथे उभारण्यात आलेल्या भाजपच्या नव्या भव्य कार्यालयात आज वास्तू शांतीचा विधी पार पडला. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ‘हे कॅसिनो भवन तर नव्हे?’ असा सवाल करत भाजपवर टीका केली. भाजप नेते सिद्धेश नाईक यांनी या आरोपांना प्रत्युत्तर देत काँग्रेसच्या टीकेचा निषेध केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी वास्तू शांती विधीचे यजमानपद भूषविले. यावेळी पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चोडणकर यांनी आरोप केला की, भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याने आणि सध्या सरकारमध्ये वरिष्ठ पदावर असलेल्या एका व्यक्तीने पक्षाच्या नव्या कार्यालयासाठी कॅसिनोमधून देणगी मिळवून देण्यास मदत केली. कॅसिनो व्यवसायातून भाजपला नेमका किती ‘वाटा’ मिळाला, हे पक्षाने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
या आरोपांवर सिद्धेश नाईक यांनी काँग्रेसवर पलटवार केला. भाजपच्या नव्या कार्यालयाला ‘चंदा चोरी भवन’ म्हणणे हा पक्षाच्या निष्ठावान आणि समर्पित कार्यकर्त्यांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेस हा ‘नो मिशन, नो व्हिजन’ पक्ष असून भाजप, त्याचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांवर टीका करण्याचा काँग्रेसला नैतिक अधिकार नाही, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते फ्रान्सिस सार्दिन यांनीही कॅसिनोच्या मुद्द्यावर भूमिका मांडली. आपल्या कार्यकाळात पर्यटनाला चालना देण्यासाठी एक-दोन कॅसिनोंना वैयक्तिकरीत्या पाठिंबा दिला होता, असे त्यांनी सांगितले. मात्र, सध्या गोव्यात कॅसिनोंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
फातोर्ड्यात काँग्रेसची मोर्चेबांधणी; आघाडीबाबत उत्सुकता
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने फातोर्डा मतदारसंघात राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ‘फातोर्डा एकूच वाट, काँग्रेसीचो हात’ असा संदेश देत मतदारसंघाचे गतवैभव परत आणण्याचे आवाहन काँग्रेसकडून करण्यात येत आहे. फातोर्ड्याचे प्रतिनिधित्व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई करीत असल्याने या मोहिमेला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, आगामी राजकीय आघाडीबाबत आम आदमी पक्ष आणि आरजीपीसोबत लवकरच चर्चा होणार असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. वीरेश बोरकर आणि वाल्मिकी नाईक व्यस्त असल्याने नियोजित बैठक होऊ शकली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. गोवा फॉरवर्डने आघाडीबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नसल्याने त्यांच्याकडून स्पष्टता आल्यानंतर पुढील चर्चा केली जाईल, असेही चोडणकर यांनी सांगितले.

  • Related Posts

    Do Not Test the Patience of Goans!

    Goa stands at a decisive crossroads, grappling with development projects that threaten its core identity, from land deals and mega projects to the expansion of casinos. Ordinary Goans are actively fighting to protect their land, environment, jobs, and future, questioning the government’s priorities and calling for accountability and a concrete alternative from political parties to safeguard the state’s heritage.

    Gadkari Inaugurates Porvorim–Guirim Elevated Corridor, Announces New Push for Goa’s Road Infrastructure

    Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari inaugurated the Porvorim–Guirim elevated corridor in Goa, emphasizing improved connectivity. He also announced the start of the Bhoma–Ponda project in October 2026 and expressed strong displeasure over delays in the Mumbai–Goa highway project.

    You Missed

    Do Not Test the Patience of Goans!

    Do Not Test the Patience of Goans!

    Gadkari Inaugurates Porvorim–Guirim Elevated Corridor, Announces New Push for Goa’s Road Infrastructure

    Gadkari Inaugurates Porvorim–Guirim Elevated Corridor, Announces New Push for Goa’s Road Infrastructure

    Anticipatory Bail Denied to Former Morjai Devasthan President, Secretary in Temple Valuables Case

    Anticipatory Bail Denied to Former Morjai Devasthan President, Secretary in Temple Valuables Case

    09/09/2026 e-paper

    09/09/2026 e-paper

    विकासाचा उत्सव की सुरक्षेची परीक्षा ?

    विकासाचा उत्सव की सुरक्षेची परीक्षा ?

    कारापूरचा आवाज दाबण्यासाठी ‘मुंबई पॅटर्न’?

    कारापूरचा आवाज दाबण्यासाठी ‘मुंबई पॅटर्न’?