कमलाप्रसाद यादव यांच्यामागे नोटिसांचे शुक्लकाष्ठ !

चिखलीनंतर आता वेळसाव-पाळे-इशोर्शी पंचायतीची नोटीस
—————————————————
गांवकारी, दि. १३ (प्रतिनिधी)
दाबोळी मतदारसंघात पंचायतमंत्री मॉविन गुदीन्हो यांच्याविरोधात बंडाचे निशाण फडकावलेले चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांच्यामागे आता पंचायतींच्या नोटिसांचा ससेमिरा सुरू झाला आहे. चिखली पंचायतीपाठोपाठ वेळसाव-पाळे-इशोर्शी ग्रामपंचायतीनेही यादव यांना विनापरवाना हॉटेल, रेस्टॉरंट आणि खोल्या भाड्याने देण्याचा व्यवसाय चालविल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे, २०२२ पासूनचे हे प्रकरण यादव यांनी गुदीन्हो यांच्याविरोधात राजकीय भूमिका घेतल्यानंतरच उकरून काढण्यात आल्याने कारवाईच्या वेळेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

वेळसाव-पाळे-इशोर्शी पंचायतीचे सचिव सुप्रेश एस. मयेकर यांनी ५ नोव्हेंबर रोजी गोवा पंचायत राज कायद्याच्या कलम ७२-अ अंतर्गत ही नोटीस जारी केली. पाळे येथील सर्वे क्रमांक ४८/१, भूखंड क्रमांक ४ मधील जागेत आवश्यक परवान्यांशिवाय व्यावसायिक उपक्रम सुरू असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यादव यांना सात दिवसांत आवश्यक कागदपत्रांसह खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, समाधानकारक उत्तर न मिळाल्यास जागा सील करण्यासह कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

पंचायतीच्या नोंदीनुसार, संबंधित व्यवसाय जून २०२२ पासून सुरू असून परवाना शुल्क, पायाभूत सुविधा कर आणि घरपट्टीची थकबाकी असल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र, इतकी वर्षे पंचायत प्रशासनाने कारवाई का केली नाही, हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कमलाप्रसाद यादव हे यापूर्वी गुदीन्हो यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. आता त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत गुदीन्हो यांच्याविरोधात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानंतर एकापाठोपाठ जुन्या प्रकरणांवर नोटिसा बजावल्या जात असल्याने ही कायदेशीर कारवाई की राजकीय दबावतंत्र, अशी चर्चा दाबोळीच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, नोटिसांमधील आरोपांची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असले, तरी कथित अनियमिततांकडे चार वर्षे दुर्लक्ष करणाऱ्या पंचायत अधिकाऱ्यांची जबाबदारीही निश्चित होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

  • Related Posts

    After Chicalim, Velsao-Pale-Issorcim Panchayat Issues Notice to Kamal Prasad Yadav Over Alleged Illegal Commercial Activities

    Following a notice from Chicalim, the Velsao-Pale-Issorcim Village Panchayat has issued a show-cause notice to Kamal Prasad Yadav regarding alleged unauthorised commercial activities, including unlicensed hotel rooms and a restaurant, and unpaid taxes at a property in Pale village. He has seven days to respond.

    Casino Operations Without Mandatory Permits? Justice Rebello-Led Movement Files Vigilance Complaint Against Senior Goa Officials

    Justice Ferdino Rebello-associated movement, Enough Is Enough, Goa, has filed a vigilance complaint against senior government and police officials in Goa, alleging illegal casino operations, unauthorized advertisements, and regulatory failures under the Goa Public Gambling Act, 1976.

    You Missed

    13/11/2026 e-paper

    13/11/2026 e-paper

    कमलाप्रसाद यादव यांच्यामागे नोटिसांचे शुक्लकाष्ठ !

    कमलाप्रसाद यादव यांच्यामागे नोटिसांचे शुक्लकाष्ठ !

    सरकारी कर्मचाऱ्यांची कसोटी

    सरकारी कर्मचाऱ्यांची कसोटी

    गोव्यात १६ नोव्हेंबरपासून जनगणनेची ऑनलाइन नोंदणी