लोकनायक बाबू नायक यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा बुधवारी शुभारंभ

मडगाव, दि. १८ : गोव्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे लोकनायक अनंत (बाबू) नरसिंह नायक यांच्या वर्षभर चालणाऱ्या जन्मशताब्दी सोहळ्याचा शुभारंभ बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. मडगाव क्रिकेट क्लब सभागृहात सायंकाळी ५ वाजता उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जन्मशताब्दी सोहळा समितीचे अध्यक्ष श्रीनिवास व्ही. धेंपे यांनी दिली.

गोव्याचे सुपुत्र आणि प्रख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते बीजभाषण करणार आहेत.

उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण बाबू नायक यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘लोकनायक’ या माहितीपटाचे प्रकाशन असेल. बाबू नायक यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे सार्वजनिक जीवन, मूल्ये, दूरदृष्टी आणि गोव्यासाठी त्यांनी दिलेले योगदान या माहितीपटातून विविध अंगांनी मांडण्यात आले आहे.

माहितीपटात राजकीय नेते, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कलाकार, शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, बाबू नायक यांचे मित्र तसेच कुटुंबीयांच्या मुलाखतींचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय दुर्मीळ छायाचित्रे आणि गोवा विधानसभेतील अभिलेखांच्या माध्यमातून त्यांच्या राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

वर्षभर विविध कार्यक्रम

१९ ऑगस्ट २०२६ ते १९ ऑगस्ट २०२७ या जन्मशताब्दी वर्षात बाबू नायक यांच्या गोव्यासाठीच्या योगदानाचे स्मरण करण्याबरोबरच त्यांच्या सार्वजनिक जीवनाला दिशा देणारी मूल्ये आणि तत्त्वे नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

“बाबू नायक हे केवळ एका राजकीय कालखंडाचे नेते नव्हते, तर गोव्याच्या व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग होते. वर्षभराच्या कार्यक्रमांमधून युवा पिढीला त्यांचे जीवन, मूल्ये, दूरदृष्टी आणि गोव्याप्रती असलेल्या बांधिलकीची ओळख करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे श्रीनिवास धेंपे यांनी सांगितले.

बाबू नायक यांचे चाहते तसेच गोव्यातील नागरिकांनी बुधवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून जन्मशताब्दी वर्षाच्या स्मरणोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जन्मशताब्दी सोहळा समितीने केले आहे.

  • Related Posts

    Do Not Test the Patience of Goans!

    Goa stands at a decisive crossroads, grappling with development projects that threaten its core identity, from land deals and mega projects to the expansion of casinos. Ordinary Goans are actively fighting to protect their land, environment, jobs, and future, questioning the government’s priorities and calling for accountability and a concrete alternative from political parties to safeguard the state’s heritage.

    Gadkari Inaugurates Porvorim–Guirim Elevated Corridor, Announces New Push for Goa’s Road Infrastructure

    Union Road Transport and Highways Minister Nitin Gadkari inaugurated the Porvorim–Guirim elevated corridor in Goa, emphasizing improved connectivity. He also announced the start of the Bhoma–Ponda project in October 2026 and expressed strong displeasure over delays in the Mumbai–Goa highway project.

    You Missed

    Do Not Test the Patience of Goans!

    Do Not Test the Patience of Goans!

    Gadkari Inaugurates Porvorim–Guirim Elevated Corridor, Announces New Push for Goa’s Road Infrastructure

    Gadkari Inaugurates Porvorim–Guirim Elevated Corridor, Announces New Push for Goa’s Road Infrastructure

    Anticipatory Bail Denied to Former Morjai Devasthan President, Secretary in Temple Valuables Case

    Anticipatory Bail Denied to Former Morjai Devasthan President, Secretary in Temple Valuables Case

    09/09/2026 e-paper

    09/09/2026 e-paper

    विकासाचा उत्सव की सुरक्षेची परीक्षा ?

    विकासाचा उत्सव की सुरक्षेची परीक्षा ?

    कारापूरचा आवाज दाबण्यासाठी ‘मुंबई पॅटर्न’?

    कारापूरचा आवाज दाबण्यासाठी ‘मुंबई पॅटर्न’?